|
Manuswini
| |
| Tuesday, September 12, 2006 - 8:43 pm: |
|
|
mod हे योग्य ठिकाणी हलवा. मला कल्पना नाही की इथे डोसा bb आहे का नाही ते. मी माझी fav recipe . अतीशय उत्तम करते असे माझे friends म्हणतात. ३ वाट्या रवा कच्चा, १ वाटी छान आंबलेली उडदाची वाटलेली डाळ.(१ वाटी डाळ सकाळी भिजवायची आणी रात्री Separate वाटायची), मिठ, थोडी वाटलेली मेथी, कच्चा रवा ह्यात mix करायचा. डाळ छान आंबलेली असलेली असते त्यातच रवा फुलतो. जरासेच सरसरीत पिठ ठेवायचे पाणी गरम घालुन. हा paper thin डोसा असल्याने पिठ पातळ नाही करायचे. आणी एक्दम घट्ट सुद्धा नाही. रात्रभर ठेवुन द्यायचे. थंडी असेल तर oven 350 C degree वर करुन १५ ते २० मिनुटे झाली की बंद करायचा मग हे पिठाचा टोप झाकुन आत ठेवुन द्यायचा, oven बंद करुन हो सकाळी डोसा तवा गरम करायचा, अजिबात तेल किंवा पाणी लावायचे नाही. आणी एक सपाट वाटीत पिठ घेवुन मध्ये टाकुन कडेने गोल गोल फिरवत जायचे. कडा पातळ पाहिजे. जरासा शिजला की शुद्ध तूप टाकुन कुरकुरीत काढायचा. ह्याच्याबरोबर madrasi बटाटा भाजी Recipe: २ मोठे कांदे, चार उकडलेले बटाटे, तिखट हिरव्या मिरच्या paste , चणाडाळ,उडीद डाळ प्रत्येकी ३ चमचे tsp , कढीपता, आले, लसुन paste हिन्ग, मोहरी, लाल मिरच्या आणी मस्त फोडणी करुन भाजी बनवायची. आतील लाल मसाला चटणी : लाल मिरच्या, सुखे बारिक खोबरे भजलेले, थोडीशी वाटलेली उडद डाळ शिजवून घ्यायची Separate कढीपत्ता टाकुन, भजलेले शेंगदाणे बारिक वाटलेले,आले paste टोमटो paste (गरम पण्यात उकडवून paste करायची, सगळे एकत्र अगदी बारिक वाटुन तयार डोस्यावर लावुन आत वरची बटाटा भाजी भरायची. सांभार : सगळ्या सांभार mix भाज्याचे पाकिट आणायचे, लाल मिरच्य, उकडलेली घोटलेली तूर डाळ, फोडणी साहित्य(हिंग,कढीपत्ता वगैरे), MTR सांभार मसाला फोडणी द्यायची आणी MTR सांभार मसाला, उकडलेल्या भाज्या, डाळ mix करुन मस्त सांभार तयार.
|
Safaai
| |
| Friday, September 15, 2006 - 2:35 pm: |
|
|
ओ बाई, त्यात कल्पना कसली असायची? थोडा विचार करा की डोसा बीबी आहे की नाही शोधा की जरा परवा तुमची अळूवडी पण अशीच हिंडत होती.. ओ मूडी ताई, ओरडा की जरा इकडेपण, नुसतं त्या बी च्या मागे कशाला जाता
|
Moodi
| |
| Friday, September 15, 2006 - 2:50 pm: |
|
|
अय्या! हो की. मनु मॉडना परत सांग हं. btw सफाई तुम्ही इतके छान मराठी कसे लिहीता हो? मी तर मिंग्लिशमधूनच सुरुवात केली.
|
Safaai
| |
| Friday, September 15, 2006 - 3:25 pm: |
|
|
यात काय मोठेसे? मला मराठी आधीपासूनच लिहीता येते. फक्त इथे कसे लिहायचे ते शिकलो आणि मगच आलो तुम्ही मूडी आहात म्हणून मिंग्लिश लिहीलेत... खराब मूड असेल
|
टाईमपास पुरे. हा बीबी आता बंद करण्यात येतो आहे पुढील लिखाणासाठी डोश्याचा बीबी वापरा
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|