|
Priya
| |
| Monday, May 22, 2006 - 3:40 pm: |
| 
|
अगदी बरोबर. दुसरी एक टीप म्हणजे मसाला करतेवेळीच मी धने, जिरे यांची पूडही करुन ठेवते. त्याचवेळी थोडे जास्त धने, जिरे आणायचे म्हणजे एकात एक काम होऊन जाते. फक्त पूड करण्यासाठी मी हे दोन्ही कोरेडे भाजते, तेलावर नाही. आणि दोन्ही पुडी मी वेगळ्या ठेवते. एकत्र धन्या - जिर्याची अशी करीत नाही. घरीच केलेल्या पुडीला वास अर्थातच चांगला येतो आणि मसाला करतेवेळीच केले की कंटाळा येत नाही. भाजून घेतले की टिकायचाही प्रश्न येत नाही.
|
Shonoo
| |
| Monday, May 22, 2006 - 3:51 pm: |
| 
|
आता लॉन्ग वीकेन्ड ला मसाला करीन. पोळीवर ताजा मसाला शिम्पडून त्यावर कच्चे तेल घालून गुन्डाळी करून खायला मिळेल. प्रिया, मूडी पुन:श्च धन्यवाद.
|
Dineshvs
| |
| Monday, May 22, 2006 - 6:00 pm: |
| 
|
तुम्ही सगळ्याजणी मसाले फ़्रीजरमधे का ठेवत नाही ? माझे सगळे मसाले तिथेच असतात. खराबहि होत नाहीत आणि वासहि ऊडुन जात नाही.
|
Priya
| |
| Monday, May 22, 2006 - 7:53 pm: |
| 
|
दिनेश, माझा मसाला फ्रीजमध्ये ठेवला नाही तरी अजिबात खराब होत नाही. आई मुंबईत होती तेव्हा तेव्हाही घरी केलेला मसाला कधी फ्रीजमध्ये ठेवावा नाही लागला. तसाही गोडा मसाला करताना सगळे मसाल्याचे जिन्नस पक्के भाजलेले असतात, त्याम्य्ळे तुम्ही म्हणता तो अनुभव कधीच नाही आला. साठवणीच्या पदार्थाचे मुख्य पथ्य असते ते व्यवस्थितपणे साठवून ठेवणे आणि हाताळणे. म्हणूनच पुर्वी वर्षाचे लोणचेही सोवळ्यात ठेवले / काढले जायचे. वर दिलेली काळजी घेतली की चार वाट्यांचा मसाला टिकायला मला नाही कधी प्रश्न आला.
|
दिनेश!मसाले फ़्रिजर मधे ठेवताना तुम्ही प्लाश्टिक डब्यात / झिपलॉक मधे ठेवता का? इथे us मधे फ़्रिजर अगदिच मोठा असतो आणी तितकासा उपयोगही केला जात नाही.
|
Dineshvs
| |
| Monday, May 29, 2006 - 4:23 pm: |
| 
|
प्राजक्ता, उत्तराला ऊशीर झाला. मी हवाबंद डब्यात ठेवतो. हल्ली फ़्रीझरमधे ठेवण्यासाठी खास डबे मिळतात. चौकोनी डबे घेतले तर जागा छान मॅनेज होते आणि हाताळणे सोपे जाते.
|
Dineshvs
| |
| Monday, May 29, 2006 - 4:31 pm: |
| 
|
वेसवार. कारवारात आणि क्वचित गोव्यात हा मसाला वापरतात. याला मसाला म्हणणे म्हणजे तसे बरोबर नाही. थोडाफार मेतकुटाशी जवळीक साधणारा हा प्रकार आहे. एक वाटी साधे तांदुळ धुवुन सावलीत वाळवावे. लाल मिरच्यांचे तुकडे दोन वाट्या घ्यावेत. पाव वाटी धणे, अर्धी वाटी ऊडदाची डाळ, एक चमचा मोहरी, एकादे हळकुंड तुकडे करुन वा चमचाभर हळद. असे सगळे कोरडेच वेगवेगळे भाजुन घ्यावे. त्यात चमचाभर हिंग घालावा. तांदुळ पण कोरडेच भाजावे व त्यातच मिरच्या घालुन भाजुन घ्यावे. हे सगळे जरा कमीच भाजावे, फार भाजु नये. मग सगळे एकत्र करुन जाडसर दळुन घ्यावे. हा प्रकार मऊ भातावर घेतात. दहि व मीठ घालुन तोंडीलावणे म्हणुन वापरतात. फणस, भेंडी यासरख्या भाज्यात घालतात. यामुळे या भाज्या खमंग व कोरड्या होतात. ऊसळीत पण हा घालतात. त्यामुळे रस्सा मिळुन येतो.
|
मसाल्यांच्या बाबतीत नेहमी 'ते आरोग्याला कसे घातक आहेत' याचीच चर्चा होत असते. पदार्थांची स्वागतार्हता वाढवण्याव्यतिरीक्त मसाल्यांचे आरोग्याच्या दृष्टीने किती महत्व आहे? शरीराला त्यांची आवश्यकता असते का?
|
Bee
| |
| Tuesday, May 30, 2006 - 11:08 am: |
| 
|
प्रिया तू दिलेली माहिती खूपच छान आहे. मी करून पाहीन हा मसाला घरी. पण इथे आपल्या भारतासारखे जाड तीळ नाही मिळत. माझ्याकडे काळे तीळ आहे पण पांढरे नाहीत. आणि हो.. welcome back!!! प्रिया. दिनेश, मला नागकेशर म्हणून एक मसाला मिळतो तो कसा वापरावा तेवढे सांगाल का?
|
Bee
| |
| Tuesday, May 30, 2006 - 11:13 am: |
| 
|
हा खडा मसाला काय प्रकार आहे. मला फ़क्त काळा मसाला, गोडा मसाला आणि गरम मसाला हे ३च प्रकार माहिती आहे.
|
Moodi
| |
| Tuesday, May 30, 2006 - 11:32 am: |
| 
|
दिनेश मसाला छानच आहे हो. गजानन दिनेश अन आश्विनी याबाबतीत त्यांना वेळ होईल तेव्हा मार्गदर्शन करतीलच. पण खरच भारतीय मसाले अन त्यातील एकेक वस्तु अतिशय मौल्यवान आहे. मोहरी उष्ण असली तरी आव( संग्रहणी), सांधेदुखी अन बर्याच अशा गुणांवर उपयुक्त आहे. हळदीचे गुण सांगाल तेवढे कमी. हिंग पोटातील वात दूर करतो, पचनाला मदत करतो. जरी फोडणीत लसुण असेल तरी मी हिंग आवर्जुन टाकते कारण वास नाही आला तरी गुण तर आहेच की. जीरे पचनाला मदत करतात. हे झाले फोडणीचे. दालचिनी योग्य प्रमाणात घेतली तर कोलेस्टेरॉल कमी करते. अर्थात अनुभवी वैद्यांच्या सल्ल्यानुसारच घ्यावी. म्हणुनच आपण ती मसाल्यात वापरतो. वेलदोडा पण पचनाबरोबर वात दूर करतो, पदार्थला सुगंध आणतो. मेथीच्या बीया फोडणीत घातल्या की त्या पण तूरीसारख्या वातुळ डाळी सहज पचवायला मदत करतात. अजुन जर माहिती हवी असेल तर सकळचा आरोग्य विशेषांक Family Doctor बघा. कढीपत्ता पण पचनाला तेवढीच मदत करतो. शेवटी वापरणे आपल्या हातात. हे मसाले योग्य प्रमाणात वापरले तर भारतीय जेवणाला तोड नाही जगात.
|
Prady
| |
| Tuesday, May 30, 2006 - 12:33 pm: |
| 
|
बी खडा मसाला म्हणजे अ:खा मसाला. म्हणजे powder न केलेला. यालाच साबूत मसाला पण म्हणतात.
|
Dineshvs
| |
| Tuesday, May 30, 2006 - 1:37 pm: |
| 
|
Bee नुसते नागकेशर कश्यात वापरत नाहीत. ते ईतर मसाल्यात घेतात. आपल्या मसाल्यातील कुठलाच घटक ऊगाचच आलेला नाही. प्रत्येकात ऊपयोगी तत्वे आहेतच. पण एखादा मसाल्याचा जिन्नस सोडला तर बहुतेक मसाले ऊष्ण कटिबंधातच होतात. सगळ्यात पहिली मिरी युरपमधे नेली ती अरबानी. पण त्यानी ती कुठुन आणली हे मात्र गुपितच ठेवले होते. पोर्तुगीजाना तिची चटक लागली म्हणुन ते त्या शोधमोहिमेवर निघाले, आणि सगळा ईतिहास घडला.
|
मूडी खूप धन्यवाद .... 
|
Bee
| |
| Wednesday, May 31, 2006 - 4:32 am: |
| 
|
मला Evrest चा पावभाजी मसाला सोडला तर इतर इतके सगळे मसाले मिळतात त्यापैकी एकही आवडत नाही. त्यामुळे आता इथली माहिती गोळा करुन आवडेल तसा मसाला घरी करण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे. दिनेश, ह्या संपूर्ण बीबीवर तुमच्या मसाल्याची कृती मी वाचली नाही जशी प्रिया, मूडीने लिहिली आहे तशी. तुम्ही पण लिहा ना जर काही खास कृती माहिती असेल तर. सोया साॅस माझ्याकडेही आहे पण तो तसाच पडून आहे. मी कधीकधी पोळीवर एखाद चमचा फ़िरवतो पण मला त्याची चव फ़ारशी आवडली नाही.
|
Maitreyee
| |
| Wednesday, May 31, 2006 - 11:18 am: |
| 
|
बी अरे सोया सॉस पोळीशी कसा चांगला लागेल!! चायनीज पदार्थात घालतात तो फ़क्त. केचप सारखा general purpose नसतो तो
|
Shonoo
| |
| Wednesday, May 31, 2006 - 12:36 pm: |
| 
|
बी तुला जर बॉक चॉय ( bok choi ) सारख्या पालेभाज्या मिळत असतील तर त्याची पाने निवडून स्वछ धुवून घे. आमच्याइथे भरपूर वाळू असते ह्या भाज्यांमधे. मग एका पसरट भांड्यामधे थोडे तेल घाल असेल तर चिनी लोकांचे काळ्या तिळाचे तेल अर्धा चमचा घाल. तेल कडकडीत तापले की त्यात एक पाकळी बारीक चिरलेला लसूण टाक ( minced ) . लसूण जरासा ताम्बूस झाला की धुतलेली पाने टाक आणि प्रखर आचेवर भराभर परत. एक्-दोन मिनिटात पाने wilt होतात. मग एक चमचा लाइट सॉय सॉस टाक आणि हलवून घे. झटपट, पौष्टिक भाजी तयार. गरमच चांगली लागते म्हणून एका वेळी सम्पेल येवढीच कर. आवडत असेल तर तेलात लसणीच्या पाठोपाठ सुक्या मिरचीचा चुरा एक चिमूट टाक. चिनी दुकानात मिळणार्या सर्व पालेभाज्या अशा प्रकारे करता येतात
|
Bee
| |
| Thursday, June 01, 2006 - 4:09 am: |
| 
|
मैत्रेयी मग तो बहुदा सोया बटर असेल. अमुल बटर सारखाच रंग असतो त्याचा आणि त्यावर लिहिले आहे की स्प्रेड करून खा म्हणून शोनू, तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. तुझ्या पोष्टची संख्या वाढव ना जरा ह्या बीबीवर. म्हणतात ना जिथे पिकतं तिथे विकत नाही! मी चिनी बाजारात फ़िरलो पण खायच्या बाबतीत कधी चव घेऊन बघावी इतका धीर झाला नाही. इथे मिळणार्या पालेभाज्या मी कधी घरी आणून करून बघितल्या नाही. आत्तापर्यंत फ़क्त इथली पालक आणि ब्रोकुली इतक्याच नविन भाज्या करुन बघितल्या. नाशिकवरुन इथे ज्या भाज्या येतात त्या इतक्या जून झाल्या असतात की आपल्याकडच्या मंडईसाठी माझा जीव झुरतो.
|
Shonoo
| |
| Thursday, June 01, 2006 - 1:18 pm: |
| 
|
आमच्या इथे चिनी आणि व्हिएटनामी दुकानात ताज्या भाज्या इतक्या छान मिळतात की तिथे जाउन भरपूर वेळ घालवून, प्रत्येक भाजी निवडून आणणे म्हणजे पर्वणीच वाटते मला. लाल माठ, मायाळू, पालक, शिराळी ( दोडके), रताळे, भाजीची केळी, लाल भोपळा, चवळीच्या शेंगा, कोथिम्बीर, ओल्या लाल मिरच्या, कमलकाकडी, अरवी आणि तसलेच मोठे कंद ज्यांना कोकणीत माड्डी म्हणतात, टॅपिओका चे कन्द, कोहळे, पेरु, चिकू, क्वचित भाजीचा फणस, करमलं, ओल्या चिन्चा छे! शनिवार सकाळ फार दूर आहे अजून :-( भाज्यांसाठी मला तरी भारतीय दुकानापेक्षा ही चिनी, कोरिअन,व्हिएटनामी दुकानेच बरी वाटतात.
|
Bee
| |
| Thursday, June 01, 2006 - 2:55 pm: |
| 
|
शोनू.. पण शेवटी ह्या भारतीयच भाज्या झाल्यात.. ह्या भाज्या जर नसेल मिळत, ह्यातली एखाददुसरीच काय मिळत असेल तर दरवेळी काय करावे हा एक प्रश्न पडतो मला. इथे भारतीय भाज्यांची विविधता खूप कमी आहे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|