|
वाटली डाळची (मोकळे तिखट) रेसिपी कोणी देऊ शकेल काय?
|
Mrinmayee
| |
| Tuesday, September 05, 2006 - 1:21 am: |
|
|
वाटली डाळ्: साहीत्य: १ वाटी चणा डाळ (२-३ तास भीजत घातलेली) २ हिरव्या मीरच्या चवीनुसार मीठ अर्धी वाटी (होय अर्धी वाटी) तेल मोहरी हिंग एक छोटा चमचा धने पावडर तीखट अर्धा चमचा पाव चमचा हळद अर्ध्या लिंबाचा रस चीरलेली कोथिंबीर डाळ प्रसादाला करणार नसल्यास ४ लसूण पाकळ्या आणि बोटाची २ पेरं लांब आल्याचा तुकडा. कृती: डाळ उपसून एक-दोनदा स्वच्छ धूउन घ्यावी. अगदी वाटण्यापुरतं पाणी घेऊन हिरव्या मीरच्यांसगट वाटावी. (बारिक वाटल्या गेली तर उत्तम). आलं लसूण घेणार असल्यास तेही याच बरोबर वाटावं. या वाटणातच मीठ, तीखट, हळद, धणे पावडर नीट मीसळून घ्यावं. जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करून हिंग मोहरीची फोडणी करावी. त्यातच हा वाटलेल्या डाळीचा गोळा घालून मंद आचेवर परतावं. सगळं तेल शोशल्या जाऊन डाळ मोकळी होईपर्यंत परतावं लागतं. त्यावर पाण्याचे शिपके देऊन झाकण ठेवून दणदणित वाफ येऊ द्यावी. परत एक पाण्याचा शिपका मारून ५-७ मिनिटे झाकण ठेवून डाळ शिजू द्यावी. त्यावर कोथंबीर घालून थंड झाल्यावर लिंबु पिळावं. हवं असल्यास थोडा खोबरं कीस घालावा. ( * आलं लसूण घातलेलं असेल तर त्याचा उग्र वास जाईपर्यंत डाळ परतावी * डाळ शीजल्यावर अर्धा किंवा एक चमचा साखर घालून चव चांगली येते. पण साखर अगदी ऐच्छिक!)
|
Bee
| |
| Tuesday, September 05, 2006 - 8:12 am: |
|
|
मृ, प्रसादाला अशी वाटली डाळ नसते.. ती फ़क्त वाटलेल्या डाळीची चटणी असते.
|
prasadala aashi dal pan kartat kartat Bee...aashi kinva kairichi dal donhi paiki kontihi dal prasadala chalate...mala asha paddhatine keleli dal aathavat navhati...receipe baddal thanks mrinmayee
|
Mrinmayee
| |
| Tuesday, September 05, 2006 - 2:00 pm: |
|
|
बी, गणपती विसर्जनाला ही डाळ हमखास असते बर्याच जणांकडे. फक्त त्यात आलं लसूण नसतं.
|
Prajaktad
| |
| Tuesday, September 05, 2006 - 3:35 pm: |
|
|
म्रु!मस्त क्रुती दिलिस आमच्याकडेही असते प्रसादाला किंवा पारायाण वैगेरे समाप्तिला.
|
Moodi
| |
| Wednesday, September 06, 2006 - 11:55 am: |
|
|
मृण्मयी धन्यवाद. आज मी केली होती थोडी प्रसादाला. बी या डाळीत हिरवी मिर्ची,जीरे, मीठ, साखर घालुन ती वाटुन घ्यायची, त्यात लिंबु पिळुन, कोथिंबीर चिरुन घालुन मग वरुन फोडणी घालायची म्हणजे चटणीसारखी तयार होते.
|
Nalini
| |
| Wednesday, September 06, 2006 - 12:04 pm: |
|
|
मृ. बरी आठवण करुन दिलीस. मला खुप आवडते ही डाळ. परतायचे काम खुपच वेळखाऊ आहे ना? शिवाय ईकडे हॉट प्लेट वर तर लेगेच डागायची शक्यता. त्यासाठी दुसरी सोपी पद्धत. डाळ सर्व मसाल्यासह वाटून घेतली की तिला कुकरच्या डब्यात ठेऊन दोन शिट्ट्या करायच्या. बाहेर काढून जरा मोकळी करायची आणि तेलावर परतायची.
|
Mrinmayee
| |
| Wednesday, September 06, 2006 - 12:22 pm: |
|
|
नलु, ही तर मस्तच trick आहे. नक्की करून बघते!
|
Bee
| |
| Thursday, September 07, 2006 - 5:00 am: |
|
|
काल गणपती विसर्जन होते तेंव्हा प्रसादाला मी ही डाळ करणार होतो. लिंबू पिळून टाकल्यापेक्षा कैरी अधिक छान लागते. माझ्याकडे दोन्ही नव्हते. मग मी ती डाळ तशीच ठेवली. दहीभातसाखरेचा मग नैवेद्य केला.
|
Ksmita
| |
| Sunday, November 12, 2006 - 12:52 am: |
|
|
वा हि छानच युक्ती नलिनि smtimes i cook it in microwave for 5-6 min. after phodni.....डाळ मोकळी होईपर्यत
|
Dineshvs
| |
| Sunday, November 12, 2006 - 4:31 pm: |
|
|
नलिनी, मायक्रोवेव्ह मधे कमी तेलात मोकळी होते. मी सहज सुचलं म्हणुन, अख्खे हरभरे भिजवुन वाटुन घेतले होते. तोहि प्रकार चांगला झाला होता. हरभरे, नेवाश्यालाच घेतले होते, पण तेंव्हा बंधुराजांशी ओळख नव्हती.
|
Upas
| |
| Friday, September 28, 2007 - 2:51 pm: |
|
|
साताळलेली डाळ (गणपतीतला प्रसाद) साहित्य : २ वाट्या चण्याची डाळ, तेल, हळद, हिंग, मोहोरी, ओलं खोबरं, कोथिंबीर, मिरच्या कृती : चण्याची डाळ स्वच्छ धुवून चार तास भिजत ठेवावी. त्यानंतर डाळ हातावर चोळून धुवून घ्यावी. कुकर मध्ये चाळणीत डाळ ठेवून दोनच शिट्ट्या काढाव्यात. अख्खी डाळ रहायला हवी. डाळीचे दाणे अगदी कडकडीत रहाता कामा नयेत किंवा त्यांचे पीठही होता कामा नये. कुकरमधून डाळ काढून फोडणीस टाकावी. चवीप्रमाणे मीठ घालून डाळ परतवावी. खोबरं, कोथिंबीर आवडीनुसार पेरावी. झाली डाळ तयार! हा गणेश विसर्जनाच्या दिवशीचा पारंपारिक प्रसाद..
|
Upas
| |
| Friday, September 28, 2007 - 2:54 pm: |
|
|
मला वाटतं साताळलेली डाळ म्हणजे न वाटलेली वाटली डाळ.. :-)
|
Ashwini_k
| |
| Monday, October 01, 2007 - 6:24 am: |
|
|
उपास, लालू, thanks . उपास, सातळलेली डाळ थोडी वेगळी लागेल कारण ती आधी शिजवलेली आहे. याप्रकारे मी मूगडाळीची उसळ करते (सासूबाई नसतील तर कुकरमधनच शिजवते-वेळेअभावी शॉर्टकट! आणि त्या असल्यास रात्रीच्या जेवणास शिस्तीत कढईवर पाण्याने भरलेला थाळा ठेउन शिजवते-त्यांना डाळ मोडलेली आवडत नाही.-)
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|