|
Savani
| |
| Tuesday, August 29, 2006 - 4:39 pm: |
|
|
साहीत्य: २ वाट्या मुगाची डाळ. ४-५ हिरव्या मिरच्या ४-५ लसूण पाकळ्या आलं मूठभर कोथिंबीर, मीठ तळणीकरता तेल कृती: मुगाची डाळ ४-५ तास भिजत घालायची. जेव्हा भजी करायची असतील त्याच्या अर्धा तास आधी मुगाची डाळ( उपसून पाणी काढून टाकायचे), हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, कोथिंबीर, मीठ हे सगळं मिक्सर मधे एकत्र वाटायचं. भरड वाटायचं. एकीकडे तेल तापवायला ठेवायचं. आणि चमच्याने छोटी छोटी भजी तेलात सोडायची. मंद आचेवर तळायची. सर्व्ह करताना चिंचेच्या चटणीबरोबर छान लागतात. यात मह्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची म्हन्जे डाळ वेळेवर वाटायची. खूप आधी करू नये.
|
Prady
| |
| Tuesday, September 05, 2006 - 8:58 pm: |
|
|
सावनी सहज आठवलं म्हणून सांगते, या भजांमधे अख़्ख़े काळे मिरे पण घालतात. खाताना एखादा दाणा दाताखाली आला तर ती चव पण छान झणझणीत लागते.
|
पौश्टिक मूग भजी एक वाटी सालासहित मुगडाळ एक हिरवी मिरची २-३ काळी मिरी मिठ तळण्यासाठी तेल दोन तास डाळ भिजवावी बाकी सर्व घालून वाटावी. छोटी छोटी भजी तळावीत. केचप बरोबर सर्व्ह करावे.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|