|
Moodi
| |
| Thursday, August 24, 2006 - 12:38 pm: |
| 
|
वरईच्या तांदळाचे लाडू. अडिच कप किंवा वाटी( जर वाटी वापरत असाल तर साखर सुद्धा वाटीनेच घ्या) वरईचे तांदूळ( भगर) ४ तास साध्या पाण्यात भिजवा. नंतर ती उपसुन सुकवुन मिक्सरमधून त्याचा रवा काढा.( हा रवा कसा काढतात ते मला माहीत नाही, दिनेश प्लीज सांगा)आणि तो तूपात गुलाबीसर भाजा. दुसरीकडे दीड कप नारळाचा चव(ओले किसलेले खोबरे) आणि दीड कप साखर एकत्र शिजत ठेवा, त्यात थोडे पाणी घाला. पाकासारखे झाले की मग त्यात तो वरईचा भाजलेला रवा घाला, वेलचीपूड घाला आणि मिश्रण घट्ट होत आले की उतरवुन त्याचे लाडू वळा. वाटल्यास त्यात बदाम काप आणि बेदाणे घाला. कृती दै.सकाळ मधून साभार 
|
Dineshvs
| |
| Friday, August 25, 2006 - 1:00 pm: |
| 
|
वारीचे तांदुळ भिजवले आणि सावलीत सुकवले, कि ते जरा नरम पडतात. मुठमुठ मिक्सरमधुन काढले कि रवाळ दळले जातात, मग हे पीठ चाळुन घ्यायचे व अगदी बारिक असेल ते बाजुला काढायचे, आणि रवा तेवढा घ्यायचा.
|
Moodi
| |
| Friday, August 25, 2006 - 4:31 pm: |
| 
|
दिनेश बरयं हो हे. मला घरी तांदळाची कणी सुद्धा काढायचीय, करुन बघते. पण भगर नाही मिळत इथे, भारतात गेल्यावर आणेन. Thanks हो. 
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|