आतापर्यन्त माझ्या पुरणपोळ्यामधे काही ना काही चुकायचेच! आता आज दीमडू, तुझ्याअ टिप्स लक्षात ठेवून केल्या पुरणपोळ्या, एकदम मस्त झाल्या! 
|
Bee
| |
| Monday, March 20, 2006 - 11:24 am: |
| 
|
एकावेळेस एक जायफ़ळ पुरे का?
|
Moodi
| |
| Monday, March 20, 2006 - 11:30 am: |
| 
|
बी अरे तुला नक्की काय विचारायचय? मला खरच कळले नाही रे. जायफळाची अगदी अर्धा चमचा पुड सुद्धा पुरते पावशेर पुरणासाठी. १ किलो असेल तर मग म्हणजे डाळ १ किलो अन गुळ पण तेवढाच वगैरे. छोटा चहाचा १ चमचाभर जायफळ. चणा डाळ ही पचायला जड असल्याने ती बाधु नये अन चव पण चांगली यावी म्हणुन जायफळ घालतात. नवीन विषय दिलास बघ तु काहीजणाना आजच्या चॅटींगला.. 
|
आख्खे जायफ़ळ कशाला आणि हल्ली जायफ़ळाची तयार पावडर मिळते ती का नाही वापरत?
|
अगं मूडी, आपण पावशेर अर्धा शेर या हिशोबात करतो गं पुरणपोळ्या. बी ला कदाचित ५ किलोचं पुरण शिजवायच असेल. मग एक जायफळ लागणार नाही का? 
|
Milindaa
| |
| Monday, March 20, 2006 - 12:36 pm: |
| 
|
झोपेतून केव्हा उठायचंय यावर जायफळ किती घालायचं ते ठरवायचं
|
Bee
| |
| Tuesday, March 21, 2006 - 1:17 am: |
| 
|
मूडी, मला जर पुरण करायचे झाले तर पुरणाच्या प्रमणानुसर मी जायफ़ळाचे प्रमाण विचारत होतो. जायफ़ळामुळे गुंगी येते ना म्हणून मी हे विचारून ठेवतो. धन्यवाद! मैत्रेयी, अमेरिकेत तू होळी वगैरे साजरी करतेस, पुरणपोळ्या आणिक काय काय.. मज्जा आहे बाबा तुझी
|
Baykar
| |
| Thursday, July 06, 2006 - 10:12 pm: |
| 
|
मी ह्या होलिला पूरनपोल्या करून पहिल्या. फ़ारच उत्तम जमल्या होत्या. }
|
Bee
| |
| Monday, August 21, 2006 - 4:27 am: |
| 
|
मी हा बीबी अख्खा वाचला. पुरण कालच केले रविवार होता म्हणून. तर एकच सांगा, पुरण पोळी जर पिठावर लाटली तर ती तव्यावर टाकण्यापुर्वी आधी तव्यावर एक चमचाभर तुप सोडावे लागेल का. म्हणजे तुप लावलेल्या तव्यावर पोळी भाजायची की पोळी पुर्ण भाजुन झाल्यानंतर बाहेरुन तुप लावायचे? प्रत्येक भाग कितीवेळा उलटायचा आणि कितीवेळा त्याला भाजायचा? ही माझी नेहमीची सवय आहे की जर मी तव्यावरच पुर्ण पोळी भाजणार्-शेकणार असेल तर दोन वेळा उलटवितो म्हणजे दोन्ही भाग दोन वेळा उलटून आणि भाजून होतो. तसेच केले तर चालेल का? काल मला एकच कप कट मिळू शकला. मी तसे पाणी बेताचेच घालले होते. कट भरपूर मिळण्यासाठी भरपूर पाणी घालावे लागेल का? उतू जायची भिती वाटते. मी प्रेशर कूकर वापरत नाही. वर साध्या पातेल्यातच शिजवतो. सगळ्यांना आधीच आभार देतो आहे.
|
Raina
| |
| Monday, August 21, 2006 - 5:15 am: |
| 
|
पुरणपोळी हलक्या हाताने तांदळाच्या पिठी वर लाटावी. आणि तूप तव्यावर आधी घालू नये- पोळी शेकून मग तुपावर परत एकदा शेकावी किंवा माझ्या सासूबाई तर नुस्तीच तव्यावर खमंग शेकतात आणि मग पोळी खाली काढल्यावर त्यावर तुपाची धार ओततात.
|
Dineshvs
| |
| Monday, August 21, 2006 - 6:26 am: |
| 
|
तव्याला आधी तेल तुप लावायची गरज नाही. पण शेवटी लावलेस तर चांगले. प्रत्येक बाजु दोनवेळा शेकली तरी चालेल. गुलाबी तपकिरी डाग पडले कि झाले. कुकर न वापरता बाहेर डाळ शिजवली तर कट जास्त मिळतो, कारण पाणी जास्त घालता येते. पण झार्याने फ़ेस काढावा लागतो. पण अर्धा किलो डाळीला दोन कप दाट कट मिळायला हरकत नाही
|
Bee
| |
| Monday, August 21, 2006 - 6:39 am: |
| 
|
दिनेश मी फ़क्त एकच बाऊल डाळ घातली होती कारण पुरण दुप्पट होईल असे वाटले होते. पण काहीच फ़रक पडला नाही. सव्वा बाऊलच पुरण झाले. पुढल्यावेळी सांभाळून करीन.
|
Bee
| |
| Monday, August 21, 2006 - 7:45 am: |
| 
|
एक अजुन विचारायचे होते पुरण आणि कणकेचा गोळा ह्याचे प्रमाण किती असायला हवे. पुरण : कणीक = १:१ हे गणित बरोबर होईल का? मुम्बईला बर्याच ठिकाणी जी पुरणपोळी विकत मिळते त्यातील पुरण कसे अगदी कोरडे, भुरभुरीत असते. शिवाय पोळीदेखील हात लावला की पुरण खाली पडलेच होय. ती पोळी घेऊन खाताना सगळे लक्ष पुरण खाली सांडते आहे ह्याच्याचकडे असते. दुधात बुडवून जर अशी पोळी खाली तर खाली वाटीत सगळे पुरण जाऊन बसते. पोळी देखील मैद्यासारखी सत्व गेलेली वाटते. त्यापेक्षा आजकाल अशोकाच्या फ़्रोजन पुरणपोळ्या मिळतात. त्या बर्या लागतात. पण त्याचे पुरण कमी, पोळीचे आवरणच जास्त असते. म्हणून मी वर प्रमाण विचारतो आहे.
|
Moodi
| |
| Monday, August 21, 2006 - 8:12 am: |
| 
|
त्या अशोकाच्या काय किंवा परदेशात कुठल्याही कंपनीच्या विकतच्या मिळणार्या पुरणपोळ्या काय शुद्ध फसगत आहे. निव्वळ खारट गुळ आणि तो ही नाममात्र, पुरण एकदम कोरडे आणि मधुन मधुन अख्खी डाळ लागते ते वेगळेच. वरचे आवरण मैद्याचे असल्याने कडक, एकदम नान वगैरे खातोय की काय असे वाटते. मी तर ठरवलेय की असले कधी घ्यायचेच नाही. बाकी चितळे किंवा मुंबईच्या घरगुती उद्योगाच्या(भारतातच परदेशात नाही) पोळ्या चांगल्या असतील कदाचीत.
|
कणकेच्या ४पट किंवा त्यापेक्षाही जास्त घेते मी.आणि कणिक चांगली तिंबली की उंडा छान होतो,सगळपुरण व्यवस्थित भरल जातं. कणिक चांगली तिंबणे महत्वाचे.
|
Zakki
| |
| Monday, August 21, 2006 - 12:47 pm: |
| 
|
पुण्यामुंबईकडे पुरणपोळी पातळ व पुरण साखरेचे असते. नागपूर, विदर्भ येथे पुरणपोळी जाड व पुरण गुळाचे असते. हे सर्व मी फक्त ऐकले आहे. इथे मला कुठलाहि वाद चालू करायचा नाही. केवळ ऐकले ते लिहिले.
|
Dineshvs
| |
| Monday, August 21, 2006 - 4:23 pm: |
| 
|
बी नवशिक्याने पिठाच्या दीडपट पुरण घ्यावे. पहिल्यांदाच जास्त घेतले तर लाटताना पोळी फाटते. बाजारात मिळणार्या पुरणपोळ्या टिकण्याच्या दृष्टीने फार कोरड्या केलेल्या असतात, खाताना त्याचा तोठरा बसतो. मी स्वतः झक्कीनी लिहिल्याप्रमाणे जाडसरच करतो. या पोळ्यांवर तुप लावुन खाल्ले कि तिसरी पोळी मागायच्या आधी माणुस झोपेने आडवा झालाच पाहिजे, पण अजुनहि गावाला रुखवतावरच्या पोळ्या अश्याच मोठ्या व कोरड्या केलेल्या असतात. त्या लाटायला कौशल्य लागते. हाताने उचलुन त्या तव्यावर टाकणे अशक्यच असते. अनुभवी बायका त्या लाटण्यावर गुंडाळुन तव्यावर टाकतात. हल्ली एक पत्रा मिळतो. त्यावर लाटुन पत्राच उचलुन तव्यावर पोळी टाकता येते. एक बोल डाळीच्या मानाने मिळालेला कट पुरेसा आहे.
|
पुरण पोळी अन साखरेची? ऐ. ते. न. च... आमच्याकडे अहमदनगरला पुरणपोळी गुळाची अन जाडच असते. ह्या: ! त्या पुण्याच्या पुरणपोळ्याना का पोळ्या म्हणायचे? म्हणे साखर! हे पुणेकर ना साखरेत देखील साखर टाकतील!! (सुरुंगाची वात पेटवून धूम ठोकणार्या कामगारासारखा मी आता जीव घेऊन पळत सुटत आहे....)
|
Raina
| |
| Tuesday, August 22, 2006 - 2:19 am: |
| 
|
झक्कीकाका- उलटे आहे. पुण्यातले पुरण गुळाचे असते- विदर्भात साखरेचे पुरण असते. आणि RH ते Ultimate होते.. पुण्यातल्या (विकतच्या) पुरणपोळीसारखी पोळी वेगळी आणि पुरण वेगळे (भगराळे) असे होत नाही- साखरेचे पुरण खाउन बघाच. challenge आहे. साखरेcय पुरणाची पुरणपोळी तुपात अक्षरश: बुडवून खातात्- पुण्यातल्यासारखी दुधाबरोबर खात नाहीत.
|
Bee
| |
| Tuesday, August 22, 2006 - 3:03 am: |
| 
|
काल मी घरी दोनच पुरणपोळ्या केल्यात त्या कुठेही फ़ुटल्या नाहीत की लाटताना उलटताना त्रास झाला पण. फ़क्त त्या कडक आल्यात आणि आतले पुरण जरा कोरडे पडले. मला वाटत प्रत्येकाचे पहिलेवहिले अनुभव जरा असेच असावेत माझ्यासारखे. एकदम यश हाती पडत नाही. पुरण आतून कोरडे का झाले असावे. मी तर आधीच थोडे पातळ केले होते. रैना, नाही विदर्भात कधीच साखरेचे पुरण नसते. ते गुळाचेच असते. त्या पोळीचा रंगही कसा गुळवट दिसतो. आमच्याघरी आम्ही एकतर तुप पोळीवर घेउन किंवा दुधात तूप आणि मग त्यासोबत पोळी असे असते.
|