|
Prady
| |
| Thursday, August 17, 2006 - 1:43 pm: |
|
|
मी आलू पालक असा करते. साहित्य: १) १ जुडी पालक २) १ मोठा कांदा ३) २ मध्यम टोमॅटो ४) १ वाटी काजू किंवा मगज ची पेस्ट. ५) २ चमचे क्रीम ६) १ चमचा आलं लसूण पेस्ट ७) चवीला मीठ ८) १ लहान चमचा तिखट ९) फोडणी साठी तूप जिरं हिंग १०) १ मोठा बटाटा ११) १ चमचा धणे जिरे पूड कृती: १) पालक blanch करावा. म्हणजे ३०-४० सेकंद उकळीच्या पाण्यात टाकावा आणी लगेच पाणी निथळून बर्फाच्या पाण्यात टाकावा. याने छान रंग येतो. मग ही पानं mixer मधे वाटून पेस्ट करावी. २) कांदा व टोमॅटो उकडून पेस्ट करून घ्यावी. ३) बटाटे मध्यम फोडी करून तळून घ्यावे व बाजूला ठेवावे.त्यावर थोडे मीठ शिवरावे. ४) तुपाची जिरे हिंग घालून फोडणी करावी. ५) त्यात क्रमाने आलं लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो घालून परतावे. ६) तूप सुटायला लागलं की तिखट, धणे जिरे पूड घालावी. ७) आता पालक घालावा. थोडं ( साधारण वाटीभर) पाणी घालून उकळू द्यावं ८) आता काजू पेस्ट घालावी व मंद गॅस वर ठेवावं बटाटे घालावे.बटाटा घालून फार वेळ उकळू नये. बटाटा शिजलेलाच असतो. ९) चवी प्रमाणे मीठ घालावं. १०) उतरवताना क्रीम घालून उतरवावं.
|
Prady
| |
| Thursday, August 17, 2006 - 1:52 pm: |
|
|
/hitguj/messages/103383/57586.html#POST435327 इथे दिनेश नी पालक पनीर ची रेसेपी दिली आहे त्यात पनीर ऐवजी बटाटे घालून पण करता येईल.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|