|
Asmaani
| |
| Thursday, August 17, 2006 - 1:11 am: |
| 
|
एक शंका होती. इथे इंडियन स्टोअरमधे किसलेले ओले खोबरे पक मिळते. अर्थातच ते ताजे नसणार. पण ते वापरले तर चालेल का? माझ्याकडे इथे नारळ खोवणी नाहीये.
|
Moodi
| |
| Thursday, August 17, 2006 - 8:12 am: |
| 
|
पातळ पोहे वापरतात पण काही वेळेस ते मोकळे होत नाहीत असा अनूभव आल्याने मी जाड पोहेच घेते. अर्थात आवडीनुसार आपण आपल्या हवे तशा पद्धतीने बनवु शकतो. आर्च आम्ही कधी घातले नाही गं या पोह्यात मेतकूट. आता घालुन बघावे लागेल. आस्मानी तो किस पण चालेल, मात्र परत अगदी थोडे पाणी त्या किसात घालुन मग पोहे त्यात भिजव.
|
Bee
| |
| Thursday, August 17, 2006 - 8:52 am: |
| 
|
शिल्पा तू सासरची कन्नड आहेस हे माहिती नव्हतं मला.. दडपे पोहे दडपून खा :-) मूडी, सुप्रभात! धन्यवाड मी करुन बघेन ही कृती. मला वाटतं ह्यात भिजवलेली चनाडाळ पण छान होईल.
|
Milindaa
| |
| Thursday, August 17, 2006 - 10:36 am: |
| 
|
किसलेले ओले खोबरे असेल (frozen) तर त्यात काही पाणी वगैरे घालावे लागत नाही. फक्त ते freezer मधून काढून defrost करायचे आधी आम्ही पण कायमच पातळ पोहे वापरतो.
|
Mrinmayee
| |
| Thursday, August 17, 2006 - 1:35 pm: |
| 
|
किसलेल्या, फ्रोझन ओल्या खोबर्याचा वेगवेगळा अनुभव आला मला. एकदा नुसते थॉ करून छान मऊ झालं खोबरं आणि व्यवस्थीत ओलं पण होतं. पण एकदा मात्र खूप कोरडं निघालं त्यामुळे जराश्या दुधात बुडवून ठेवावं लागलं. पोहे तर पातळच वापरते मीही. धुवुन घेण्याची गरज नसते. खरतर त्यामुळे पोह्यांचा गोळा होऊ शकतो.
|
Paragkan
| |
| Friday, August 18, 2006 - 3:48 am: |
| 
|
नको नको त्या गोष्टींची आठवण करुन देता तुम्ही लोक. आता पोहे लावावे लागतील ... त्यासाठी आधी पातळ पोहे आणावे लागतील .. छे बुवा .. 
|
Dineshvs
| |
| Saturday, August 19, 2006 - 1:34 am: |
| 
|
फ़्रोझन ओले खोबरे खुपदा तेलकट निघते. कोमट दुधात भिजत घातले तर जरा चव सुधारते.
|
Asmaani
| |
| Monday, August 21, 2006 - 3:59 pm: |
| 
|
मूडी, मिलिंदा, मैत्रेयी, दिनेश सगळ्यांना thanx . ए बी, मी कन्नड वगैरे नाहिये बाबा. but i like dadape pohe very much . बेळगावच्या श्रीहरिमंदिरात खाल्ले होते. ती चव अजूनही जिभेवर आहे.
|
Moodi
| |
| Monday, August 21, 2006 - 4:08 pm: |
| 
|
अगं अस्मानी धन्यवाद नको देऊस, मला बरी आठवण झाली त्यानिमीत्ताने. आणि बी Storvi ला म्हणालाय बहुतेक. कारण तिचे नाव पण शिल्पाच आहे. 
|
Sami
| |
| Monday, August 21, 2006 - 4:32 pm: |
| 
|
दडप्या पोह्यात माझी आई सांडगी मिरची चुरून घालते. कुटाची मिरची म्हणतात काहीजण त्याला. आम्ही कोकणात तिला सांडगी मिरची म्हणतो. मस्त लागते पोह्यात. तळून घ्यायची आणि मग चुरायची.
|
Bee
| |
| Tuesday, August 22, 2006 - 3:18 am: |
| 
|
आणि ती मैत्रेयी नाही मृ आहे :-) मूडी तुझ बरोबर आहे..
|
Asmaani
| |
| Tuesday, August 22, 2006 - 3:47 pm: |
| 
|
सॉरी बी आणि मृण्मयी. next time i will take care.
|
Shonoo
| |
| Tuesday, August 22, 2006 - 4:29 pm: |
| 
|
कुमटा, सिर्सी या भागात ( उत्तर कर्नाटकात ) या पोह्यांमधे साम्बार मसाला पण घालतात. चहा पांडुरंगाचे पोहे ( च्या पान्डरन्गालो फोवु ) या नावाने नेहेमी माझ्या आई वडिलांना ( आणि त्यान्च्या मित्र मैत्रिणींना) तोंडाला पाणी सुटतं. जरासा कोवळा शहाळ्या कडे झुकणारा नारळ खोवून, भरपूर, ओलसर खोबर्यात कालवलेले non machine made पोहे, सोबत निखार्यावर भाजलेले पापड! अहाहा आजोळच्या आठवणींचा अविभाज्य भाग. आता lunch meeting मधले कोरडे बेचव chicken wrap कसे खाऊ मी? :-(
|
पातळ पोहे,टमाटे बारीक चिरलेले,हिरव्या मिरच्या बारीक चिरून, बारीक चिरलेला कांदा,ओला खोवलेला नारळ, साखर आणि मीठ चवीनुसार,कोथिंबीर,फ़ोडणीसाठी जीरे,मोहरी(आवडीप्रमाणे) दडपे पोहे हे दडपुनच करायचे असतात आणि ते धुवायचे नाहीत. आई म्हणते टमाटे,ओले खोबरे यांच्या रसात पोहे भिजायला हवेत त्यासाठी (वरीलप्रमाणे बनवून) ताटात ठेऊन त्यावर पोळपाट आणि खलबत्ता ठेऊन ते दडपायचे, अक्षरशः दाबून टाकायचे यामुळे टमाटे दबले जाऊन त्याचा रस पोह्यात मिसळतो आणि पोहे भिजतात. मी फ़क्त mechanism of दडपिंग दिलंय. बनवायची पद्धत वरीलप्रमाणे कोणतीही असू शकते
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|