Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
काल्याचा प्रसाद ...

Hitguj » Cuisine and Recipies » उपाहार » काल्याचा प्रसाद « Previous Next »

Moodi
Monday, August 14, 2006 - 9:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परवाच्या श्री गोकुळाष्टमीनिमीत्त गोपाळकाल्याचा प्रसाद.

२ वाटी ज्वारीच्या लाह्या, १ वाटी दूध, पाऊण वाटी साय, २ हिरव्या मिर्च्या, कोथिंबीर, चवीपुरती साखर, अर्धा टी स्पुन जीरे, १ वाटी दही.

कृती : ज्वारीच्या लाह्यांमध्ये दुध, दही अन साय एकत्र करुन कालवावे. त्यात हिरवी मिर्ची, जीरे अन कोथिंबीर हे तीन पदार्थ एकत्र वाटुन घालावे, चिमुटभर साखर घालावी अन सर्व नीट मिसळून घ्यावे.

मिर्ची, दही, साय यांचे प्रमाण आवश्यकतेनुसार कमी करावे.

ज्वारीच्या लाह्या नसतील तर पोहे चालतील


Surabhi
Monday, August 14, 2006 - 10:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी पोहे चालतील नाही पोहे हवेतच.
श्रीकृष्णाला सुदाम्याचे पोहे किती आवडले होते!

Prajaktad
Monday, August 14, 2006 - 10:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी! माझी बरिच जुनी फ़र्माईश पुर्ण केल्याबद्दल तुला खुप थांकु!!!





Dineshvs
Monday, August 14, 2006 - 2:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडि हा कुठला प्रकार. मी नाहि खाल्ला कधी !!!

Moodi
Monday, August 14, 2006 - 2:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश अहो गोकुळाष्टमीला श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवानंतर देतात हा प्रसाद म्हणून.

सुरभी अगं पोहे तर मुख्यच की गं, पण लाह्या का घालतात हे नाही कळले मला कधी.
प्राजक्ता आभार नको मानु.


Mrinmayee
Monday, August 14, 2006 - 2:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहाहा मूडे, झकास कृती! आई याच काल्यात चांगल २५ वर्ष जुनं, अगदी काळं झालेलं लिंबाचं लोणचं पण घालते.

Moodi
Monday, August 14, 2006 - 2:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी खरच ते लोणचे इतके छान मुरलेले असते ना, की त्याला कुठलीच सर येत नाही.

Upas
Monday, August 14, 2006 - 2:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी खूप खूप धन्यवाद..
गोविंदा रे गोपाळा..
हंडी फोडत भिजलेल्या थरथरत्या अंगाने ओंजळीत काल्याचे दहीपोहे घेऊन खाण्याचा आनंद त्रिखंडात नाही जय हो!!


Prady
Monday, August 14, 2006 - 2:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणी तरी सुंठवडा पण लिहा. गोकुळाष्टमीला कृश्णजन्माचा प्रसाद म्हणून सुंठवडा पण हवाच की.

Bee
Tuesday, August 15, 2006 - 3:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे २५ वर्ष जुने लोणचे मृ.. काय सांगते आहेस.. इतके जुने लोणचे खरच चांगले राहू शकते का आणि खरच इतके दिवस घरात लोणचे राहते तरी का? अशा किती बरण्या लोणचे करायचे मग.. :-) खरच कोण आश्चर्य वाटलय मला..

Kandapohe
Tuesday, August 15, 2006 - 6:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडि हा कुठला प्रकार. मी नाहि खाल्ला कधी !!! >>
काय सांगतोस दिनेश? अरे अरे!! गोकुळाष्टमीचा काला व सुंठवडा आहाहा!

लिंब्या, तू लहानपणी कधी आदर्श विद्यालय समोरील धर्मचैतन्यात गोकुळआष्टामीला गेला आहेस काय? तिथे मिळायचा काला व सुंठवडा.
:-)


Dineshvs
Tuesday, August 15, 2006 - 4:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे मी खरेच लाह्या नाहि खाल्ल्या कधी.
आमच्याकडे एकादशी प्रमाणेच जेवण असते.
कोकणात चपाती, शेवग्याच्या पाल्याची भाजी आणि मुगाची खीर खातात. भात वर्ज्य.
गोव्यात खास आंबाड्याचे रायते असते.

आमच्या लहानपणी दहिहंडीनंतर काकड्या, खरबुज आणि पोहे असा प्रसाद असायचा.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators