|
Amayach
| |
| Sunday, August 13, 2006 - 5:28 pm: |
|
|
साहित्य- २ वाट्या बारीक चांगले तांदुळ, दोन वाट्या दही, एक वाटी चण्याच्या डाळीचे पीठ, आर्धि वाटी शेंगदाणे, अर्धा नारळ, चार्-पाच ओल्या मिरच्या, चार्-पाच लसणीच्या पाकळ्या, अर्धा चमच मोहरी,कोथिंबीर, फ़ोडणीचे साहित्य, हळद,मीठ. कृती: तांदुळ धुवुन घ्यावेत. तेलात बेसन चांगले भाजुन घ्यावे. नंतर फोडणी करुन त्यात लसणीच्या पाकळ्या, मिरच्यांचे तुकडे टाकावेत. नंतर त्यावर तांदुळ घालुन ते तांबुस होईपर्यंत परतावे. त्यात हळद, चवीप्रमाणे मीठ व हवे असल्यास आणखी थोडे लाल तिखट घालावे व गरम पाणी ओतावे.भात बोट्चेपा होत आला की त्यात भाजुन घेतलेले बेसन, खोवलेले नारळ, दही, शेंगदाणे व कोथिंबीर घालुन भात चांगला हलवुन घ्यावा. नंतर तो मंद विस्तवावर ठेवुन वर झाकणी थेवावी व झाकणीवर निखारे घालुन चांगली वाफ़ येवु द्यावी. वरिल रेसेपी 'रुचिरा' मधुन घेतली आहे.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|