Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मसुराची खिचडी

Hitguj » Cuisine and Recipies » भाताचे प्रकार » मसुराची खिचडी « Previous Next »

Mrinmayee
Thursday, August 03, 2006 - 3:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साहित्य:
२ वाट्या बासमती (४-५दा पाणी बदलून धुतलेला, कमितकमी १५ मिनिट पाणी निथळून ठेवलेला)
१ वाटी मसूर, रात्रभर भिजवून, उपसून ठेवलेला
१ लहान चमचा आलं लसूण वाटलेलं
२ पळ्या तेल
१ पळी साजुक तुप
२ टोमॅटो
२ कांदे
कोथिंबीर
मसाले: सगळे भर तेलात तळून घ्यावे. तेल टीपून घेतल्यावर बारिक वाटावे. (वाटताना थोडं पाणी घालायला हरकत नाही.)
२ मोठे चमचे धने
अर्धा चमचा मिरे
४-६ लवंगा
१ मोठा दालचिनीचा तुकडा
२ मोठी तमाल पत्र (तेजपान)- ही अख्खी फोडणीत घालायला
हिंग
मीठ चवीनुसार
३ वाट्या आधणाचं पाणी.

कृती: तेल तापवून त्यात तमालपत्र आणि हिंग घालावं.
त्यावर निथळलेले मसूर घालून भरपूर परतावं.
आलं लसूण गोळी घालून आणखी कलसावं
कांदा घालून तो पारदर्शक होईपर्यंत घाटावं.
यावर मसाल्याची पावडर घालून (वाटल्यास तिखट घालावं) आणखी काही वेळ परतून आधण ओतावं. वरून टोमॅटो (एकाच्या ८ फोडी केलेल्या), कोथिंबीर (बारिक चिरलेली) आणि साजुक तुप घालून उकळी आणावी.
पाणी आटत आलं की जाड झाकण ठेऊन शिजू द्यावं.
टोमॅटोचा कच्चा वास लागत नाही.
अर्ध पाणी-अर्ध नारळाचं दूध एकत्र करून त्यात फुलवलेली खिचडी पण खूप छान लागते.


Zakki
Thursday, August 03, 2006 - 8:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि मग ती मसूरी ला जाऊन खायची का? की मसूरीतच करायची?


Mrinmayee
Thursday, August 03, 2006 - 10:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्हाला बोलवून 'फ्लोरिडात' खायला घालणार होते 'मसुरीची खिचडी'! पण असं काही लिहीण्यातला तुमचा 'असुरी' आनंद पाहून म.खी.बाद! :-)

Mepunekar
Thursday, August 03, 2006 - 11:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mrinmayeee, chan vattiye recipe..Yat akkhe masur vaprayche ka masur dal vapraychi?(orange colour chi aste ti)

Vidyasawant
Friday, August 04, 2006 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुणेकर त्यात अक्खि मसुर जास्त चांगली लागते.
मसुरची दाल ही जेव्हा आपण तिखट आमटी करतो तेव्हा त्यात टाकली तर आमटी छान होते. अक्खे मसुर घलुएन पण आमटी छान होते


Mrinmayee
Friday, August 04, 2006 - 2:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुणेकर, विद्यानं सांगीतलंय ते अगदी बरोबर. मसुराला मोड आणून पण हा भात करता येतो (आणखी पौष्टिक!)

Mepunekar
Friday, August 04, 2006 - 11:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Vidya, Mrinmayye thanx g..nakki karun baghen ata:-) Masurala moad anayche mhanje matkisarkhech bhijvun mag tyavar vajan thevayche na? Moad alelya masurachi khichdi tar ankhinach mast lagel..gud..thanx alot

Prady
Saturday, August 05, 2006 - 12:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ सगळं रामायण सांगितलं पण रामाची सीता कुठेय. मसूर, कांदा,टोमॅटो, कोथिंबीर सगळं घालून झालं पण तो तांदूळ कधी घालायचा.विसरलीस की काय.

Mrinmayee
Saturday, August 05, 2006 - 1:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो गं हो प्रज्ञा, मसूर परतल्यावर मग तांदूळ घालायचे. विसरले बघ. (वाटलं नव्हतं इतकं बारकाईनी कुणी वाचत असेल :-) )

Vidya_joshi
Friday, January 12, 2007 - 12:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काॅर्न राइस
१ वाटी स्विटकाॅर्न
२ वाट्या तांदुळ
१ वाटी चिरलेली मेथी किंवा कोथिंबीर
१ हिरवी मिरची आलं, लसूण
४ वाट्या पाणी, चवीपुरते मीठ, साखर
प्रथम तुपावर आलं, लसूण, मिरची परतावे.
त्यावर मेथी परतावी, नंतर काॅर्न तांदुळ, घालुन परतावे
पाणी घालून मीठ घालून शिजवावा.
करून बघीतला की कळवायला विसरु नका.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators