|
Kiroo
| |
| Wednesday, August 02, 2006 - 5:52 pm: |
|
|
मी मेदू वडा असा करते... २ वाट्या उड्दाची डाळ २ हिरव्या मिरच्या १ इंच आलं १ चमचा मीठ तळण्याकरता तेल. उडदाची डाळ निवडून धूवून भिजत घालावी. ५ ते ६ तास डाळ भिजल्यावर बारीक वाटावी त्यातच आलं आणि मिरच्या पण वाटाव्यात. वाटलेल्या डाळीत चवीपूरते मिठ घालून एकजीव करावी.(वाटताना शक्यतो १ ते २ टे.स्पून पेक्शा जास्त पाणी वापरु नये.) एक plastic च्या पिशवीला तेलाचा हात लावावा आणि वाटलेल्यातले थोडे पीठ plastic पिशवीवर ठेवून त्याला मधे बोटाने भोक पाडून वड्याचा आकार द्यावा. आता हा वडा अलगज हाताने ऊचलून तेलात सोडावा. असे २ते३ वडे तळणीत घालून मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळावेत. उडदाची डाळ वाटल्याबरोबर वडे तळावेत. किंवा डाळ वाटुन fridge मधे ठेवलि तरी चालते तसे हि वडे उत्तम होतात फ़क्त डाळ आंबू देवू नये. डाळ वाटल्यानंतर त्यात ओल्या खोबर्याचे बारीक तुकडे करून घालावेत.
|
Miseeka
| |
| Friday, September 15, 2006 - 8:15 pm: |
|
|
मेदु वडा साठी उडदाचि डाळ २ ते अडिच तास च भिजवलि तर तळताना वडा जास्त तेल घेत(पित) नाही.
|
Manuswini
| |
| Friday, September 15, 2006 - 10:57 pm: |
|
|
आणखी एक तीप्स, माझा अनुभव, जरासे रवाळ तांदूळाचे पिठ घालायचे वडा कुरकुरीत होतो,चिकट रहात नाहे आतुन. कढेपत्ता एकदम बारिक वाटुन टाकला की छान लागतो.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|