Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
उकडीच्या पोळ्या, गवसण्या, पीठपोळ्या ...

Hitguj » Cuisine and Recipies » ब्रेड, पोळी, पराठे » पोळ्या » उकडीच्या पोळ्या, गवसण्या, पीठपोळ्या « Previous Next »

Prady
Friday, July 28, 2006 - 1:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश त्यांची क्रुती देतीलच. मी माझ्याकडे असलेली क्रुती देते आहे.

साहित्य:
१)पाव कप मैदा
२)पाव कप कणीक
३)चवीला मीठ
४)३ टेबलस्पून तेल

उकडीसाठी
५)१ कप तांदळाची पिठी. शक्यतो बासमती अगर चांगला वासाचा तांदूळ धुवून, सावलीत वाळवून त्याची केलेली पिठी असावी.
६)१ टेबलस्पून तेल
७)१ कप पाणी
८)चवीला मीठ

क्रुती:
१)मैदा व कणीक एकत्र चाळून घ्यावी.
२)मीठ व १ टेबलस्पून तेल घालून मऊ भिजवून घ्यावी.
उकड्:
१)पाणी, मीठ, तेल एकत्र करून उकळत ठेवावे. उकळी आल्यावर खाली उतरवून त्यात पिठी घालावी व मिश्रण सारखे करावे.
२)पातेले पुन्हा गॅसवर ठेऊन झाकण ठेवावे.गॅस मंद करावा.
३)दोन चार चांगल्या वाफा आल्यावर गॅस बंद करावा.
४)उकड परातीत काढून तेलाच्या व पाण्याच्या हाताने चांगली मळून घ्यावी.मऊसर करावी.
५)भिजवलेली कणीक उरलेले २ टेबलस्पून तेल व लागेल तसे पाणी घेऊन चांगली तिंबून पुरणपोळीच्या कणके सारखी भिजवावी.
६)आणी आता पुरणपोळी करतो तशीच उकड भरून पोळ्या लाटाव्यात.

सौजन्य: पार्टी पार्टी, निर्मला टिळक









Dineshvs
Friday, July 28, 2006 - 3:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक कप कणीक, नेहमीप्रमाणे तेलाचे मोहन व मीठ घालुन, मळुन ठेवावी. चपातीला भिजवतो त्यापेक्षा थोडी घट्ट भिजवायची.
सव्वा कप पाणी ऊकळत ठेवुन त्यात चमचाभर तुप, व मीठ घालायचे. हवे तर त्यात जिरेपुड, मिरपुड वैगरे अर्धा चमचा घालावे. मग त्यात एक कप भरुन तांदळाचे पीठ घालावे. नीट ढवळुन झाकण ठेवावे, व दणदणीत वाफ़ येऊ द्यावी. मग पेल्याने ती ऊकड नीट मळुन घ्यावी.
या ऊकडीचे चार पाच गोळे करावेत. तितकेच गोळे कणकेचे करावेत. त्याचा ऊंडा करुन त्यात ऊकडीचा ऊंडा भरावा. व लाटावे. मध्यम आचेवर भाजुन घ्यावे. आमरस वा कुठल्याहि रस्स्याबरोबर हा प्रकार छान लागतो.
याची खास बात म्हणजे हा प्रकार लाटायला खुपच सोपा असतो. याला वरुन तेल तुप लावावे लागत नाही, आणि या पोळ्या मऊसर राहतात.
तांदळाच्या पिठा ऐवजी ज्वारीचे पीठहि वापरता येते. चिकनच्या रस्स्याबरोबर खाण्यासाठी ऊकडीत वाटलेली हिरवी मिरची घातली तरी चालते. ती ऊकळत्या पाण्यातच घालावी. थोडा हिंगहि घालावा.


Prajaktad
Thursday, October 12, 2006 - 7:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश्दा ! मी करुन पाहिल्या गवसण्या , छान अगदी मऊसुत होतात. श्रेयालाही खुप आवडल्या.
prady चेही आभार.


Manuswini
Thursday, November 09, 2006 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी प्रथमच काल गवसण्या केल्या फार सुंदर लागतात.
फुलतात पण टम्म.. आणी छान मऊसुत होतात पुरणपोळीसारख्या

मग तिखट कोंबडी अगदी वाटण लावुन केली....

आज पण डब्यात गवसणी आणी तिखट चवळीची उसळ. ...
आपली लसुण लावलेली कोंबडी ऑफ़ीस मध्ये खाऊ शकत नाही.
छान आहे हा गवसणी प्रकार
लाटायला जाम मजा येते मी अगदी पातळ केली


Aashi
Friday, November 10, 2006 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु तुझ्या पोस्ट ने inspire होउन मी ही आज रात्री केल्या. ठरवुन बिघडवयच्या म्हटल्या तरी बिघडनार नाहीत :-) btw हा कुणीकडचा प्रकार आहे? कोकणातला का?

Shonoo
Friday, November 10, 2006 - 2:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मन:स्विनी:

तिखट कोम्बडी कशी केली ते लिहिणार का
मला Graduate Students Recipe for Everything ने केलेलं चिकन खाऊन वैताग आलाय अगदी.


Dineshvs
Friday, November 10, 2006 - 4:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू, मी कुठेतरी गावरान चिकनची कृति लिहिली होती. ती पण यासाठी योग्य ठरेल.

Paragkan
Friday, November 10, 2006 - 5:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Graduate Students Recipe for Everything ने केलेलं चिकन खाऊन वैताग आलाय अगदी.>>>>>>>

अपमान ... अपमान ... अपमान

Rachana_barve
Friday, November 10, 2006 - 7:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण करणार आज ही गवसणी

Manuswini
Friday, November 10, 2006 - 7:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शूनू,

मी माझी घरची रोजची पद्धत लिहिते. इथे ही जवळपास तशी Recipe लिहिली आहे बहुतेक दिनेश म्हणतात तसे पण generally पण तिखट कोंबडी केली तर 'ही' तयारी करावी लागते. आणि त्यात कधीच tomato हा प्रकार आम्ही टाकत नाहि.


लिहिते जरा थोड्या वेळाने. ..............
आरामत छान लिहुन काढते


Savani
Friday, November 10, 2006 - 7:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनू, मी पण करणार आहे उद्या. तुझं ऐकून मला पण झणझणीत उसळ खावीशी वाटली म्हणून मटकी भिजत टाकलीये.

Dineshvs
Saturday, November 11, 2006 - 3:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोंबडी कोंबडी काय करता रे ? या गवसण्या खास करुन आमरसासोबत खायला करायची पद्धत होती, असे कै दुर्गा भागवत यानी लिहुन ठेवले आहे. याचे ओरिजिन माहीत नाही, कदाचिय कोकणातलेच असावे.
पण या लाटण्याचा अनुभव वेगळाच असतो. आपोआप गोल आकार येत जातो. आणि लाटायला फार श्रम पडत नाहीत.
काहि कारणाने उकड सैल झाली तर त्यात बारिक रवा मिसळुन घ्यावा.


Swa_26
Saturday, November 11, 2006 - 7:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशी, मनू, दिनेश... तुमचे सगळ्यांचे पोस्ट्स वाचून मलाही गवसण्या कराव्याशा वाटतायत, करुन झाल्या कि सांगेन कशा झाल्या ते.
दिनेश, तुम्ही म्हणताय तसा आमरस काही आता मिळ्णार नाही कारण सीझन पण संपलाय आणि सध्या गावी जाऊन पल्प सुद्धा आणता येणार नाही. त्यामुळे झणझणीत उसळीची कल्पना चांगली वाटतेय.


Manuswini
Sunday, November 12, 2006 - 7:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शूनू,

बघ ही link

/hitguj/messages/103383/93122.html?1163315921

Actually फार काही फरक नाही मालवणी कोंबडी नी मी लिहिलेली नाहीतरी कोकणात कोंबडी ही अशीच 'वातण' लावुन बनवतात.


Varshac
Monday, November 13, 2006 - 3:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल गवसण्या केल्या होत्या. सही झाल्या होत्या! चीकनचा रस्सा आणि तळलेल्या फ़िशबरोबर चापुन टाकल्या.
एक प्रश्न्न उरलेल्या उकड्लेल्या तांद्ळच्या पीठचे मोद्क करता आले असते का? की मोद्कासाठी वेगळ्या प्रकारे उकड करतात?


Aashi
Monday, November 13, 2006 - 6:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी भाकरी केल्या होत्या लाटुन. तान्दळाच्या उकडीच्या भाकरी अशाच करतात लाटुन किन्वा थापुन

Shmt
Monday, November 13, 2006 - 8:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी काल गवसण्या केल्या, मस्त झाल्या होत्या. तिखट कांदा बटाटा रस्या बरोबर छान लगल्या. एक वेगळाच प्रकार खाला.
हा प्रकार कुठला आहे?


Varshac
Monday, November 13, 2006 - 9:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण ऊरलेल्य पीठाच्या भाकरी केल्या लाटुन. आधि मी मोदक करणार होते पण खात्री नव्हती की मोदकासाठी अशीच ऊकड लागते का?

Rachana_barve
Tuesday, November 14, 2006 - 7:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण केल्या बरका :-) सही झाल्या आणि..
आमच्याकडे आमरस असायचा ह्या पोळ्यांबरोबर. पण मी पालक पनीर बरोबर खाल्ली :-O


Swa_26
Wednesday, November 15, 2006 - 4:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण केल्या काल गवसण्या खूप छान झाल्या, एकदम मऊसूत झाल्या. सगळ्यांना खूप आवडल्या. आणि अनायसे पप्पांनी गावाहून येताना आमरस आणला त्यामुळे तर मज्जाच आली खायला.

Swa_26
Friday, November 17, 2006 - 4:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पीठपोळीची रेसिपि इथे कुठेच दिसत नाहीय, आहे का कोणाकडे?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators