Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
पनीर भुर्जी / खुल्ल पनीर ...

Hitguj » Cuisine and Recipies » प्रादेशिक » पंजाबी » पनीर भाज्या » पनीर भुर्जी / खुल्ल पनीर « Previous Next »

Arch
Monday, July 03, 2006 - 6:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्धा पौंड पनीर (छाना)
२ कांदे
२ Tomato
आल - लसूण पेस्ट
हळद
तिखट
मीठ
कोथिंबीर
गरम मसाला
एखाद तमालपत्र
जीरे
हिरवी मिरची

तेल गरम करून त्यात जीरे आणि तमालपत्र ताकाव. नंतर बारीक चिरलेला कान्दा परतावा. त्यात आल लसूणाची पेस्ट घालून गुलबटसर होईपर्यंत कांदा परतावा. त्यात बारीक चिरलेला Tomato घालून परत परताव. त्यातच हळद, तिखट टाकाव. हे मिश्रण एकजीव होऊन तेल सुटल की त्यात पनीर टाकाव. हे परत नीट परताव. छान्यातल पाणी निघून गेल आणि तेल सुटायला लागल की गरम मसाला आणि मीठ टाकाव. serving bowl मध्ये काढून त्यावर कोथिंबीर आणि मिरचीचे बारीक तुकडे पेरावेत. मी फ़ोडणीत थोडी मिरची आणि कोथिंबीर घालते त्याचा फ़ार छान स्वाद येतो.



Robeenhood
Monday, July 03, 2006 - 7:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप खूप धन्यवाद आर्च....

(अर्धा पौंड म्हणजे किती मेट्रिक टन (ए.भा.प्र.))


Karadkar
Monday, July 03, 2006 - 7:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्धा पौंड म्हणजे पाव किलो साधारणपणे.

Bee
Tuesday, July 04, 2006 - 6:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माला वाटल ह्यात अंडं पण असेल पण छान नाही आहे. आर्च छाना आणि खुल्ल म्हणजे काय? दोन भा. प्र. :-)

Dineshvs
Tuesday, July 04, 2006 - 4:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, माझी पण हिच पद्धत. यात बाजारी पनीरपेक्षा घरगुति छानाच चांगला लागतो.

Lajo
Tuesday, October 24, 2006 - 1:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

south indian style पनीर भुर्जी

बरीचशी कृती वरील प्रमाणेच फक्त फोडणीत उडदाची डाळ, सुख्या लाल मिरच्या आणि कढीपत्ता घालायचा. लसुण, गरम मसाला, तमालपत्र घालायचे नाही. फोडणीत लाल तिखट न घालता, शेवटी भुर्जी झाल्यावर थोडा सांबार मसाला भुरभुरावा. छान स्वाद येतो.

आशी भुर्जी गरम गरम फुलक्यांबरोबर मस्त लागते :-)


Me_mastani
Thursday, August 21, 2008 - 8:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी पनीर भूर्जी नेहेमी गोळा होते. मोकळी होत नाही. मी घरगुती छाना तसेच बाजारी पनीर दोन्ही वापरून पाहिले आहे.

Lajo
Thursday, August 28, 2008 - 3:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तानी, पनीर अगदी शेवटी घालायच आणि आच बारीक करून अगदी १ मिनीटभरच झाकण ठेवायच. आणि लगेच गॅस बंद करायचा. जास्त परतायच नाही.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators