Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Dishwasher

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » आधुनिक उपकरणे आणि भांडीकुंडी. » Dishwasher « Previous Next »

Tanya
Wednesday, June 14, 2006 - 3:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या, रोजच्या वापरातील स्टिलची भांडी धुण्यासाठी कोणत्या कंपनीचा डिशवॉशर घ्यावा याबद्दल कोणाला मार्गदर्शन करता येईल का? तसेच नविन डिशवॉशर घेण्यापुर्वी त्याबद्दल कोणत्या गोष्टी तपासुन बघाव्यात याबद्दलही मार्गदर्शन हवे आहे.

Sayonara
Wednesday, June 14, 2006 - 5:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तान्या, स्टीलची भांडी कुठल्याही डिशवॉशरमध्ये टाकलेली चालतात. infact ती त्यात धुतल्यावर जास्त चमकतात. सरसकट सगळी भांडी त्यात टाकायची असली तर मात्र US सारखा मोठा built-in dishwasher असणं जास्त फायद्याचं ठरतं. नाहीतर जपानमध्ये विकत घेऊन countertop वर ठेवायचा dishwasher हा एक मोठा जोक आहे.

Storvi
Wednesday, June 14, 2006 - 7:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी सध्याच माझ्या रिमोडेल केलेल्या स्वयंपाकघरात Bosch चा डिशवाशर बसवला. काय सुरेख भांडी निघतात त्यात. सही आहे हा. ह्याला इतर डीशवाशर्स सारखी खाळी हीटींग कॉईल नसल्याने Dishwasher safe, top rack only भांडी खालच्या rack मध्येही ठेवता येतात:-)

Shonoo
Wednesday, June 14, 2006 - 7:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Check if the dishwasher has a delayed start- so you can run it late at night - electricity is cheaper at night in a lot of places, also you don't have listen to it right after dinner.
Check how much noise it makes anyway ? Check how much water it uses for typcial load ? How long is a normal cycle? How long is a quick cycle? How many different types of cycles it has - at least 3-4 options are good. Safety features - to make sure your kitchen doesn't get flooded if any food gets stuck in the water outlet.

What are the internal shelves made of - longer lasting , rust proof, or rust resistant materials are better.


How many configurations can you change internally to allow bigger, smaller pots etc?

Some models have water sprayed only from top, only from bottom, both from top and bottom and some have three levels of water spray. multiple water temperature settings are nice too

Miele, Boschs are some good names .

Sorry for writing in english :-(

Lalu
Wednesday, June 14, 2006 - 7:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याकडे एक दोन हात दोन पाय असलेला डिशवॉशर आहे. कुठलीही भांडी चालतात. तो घेण्यापूर्वी कोणत्या गोष्टी तपासून बघाव्यात हे आत्ता विचारुन काय उपयोग तान्या? उशीर झालेला आहे... ~d :-)

Tulip
Wednesday, June 14, 2006 - 9:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालू .. तुझा SOH केवळ जबरी

Sayonara
Wednesday, June 14, 2006 - 11:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालू
आणि तसंही तुला विचारुन काय उपयोग? तुझ्या नवर्‍याला मेल टकायला सांग तिला.

Tanya
Thursday, June 15, 2006 - 11:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायो स्टोर्वी शोनु thanks!
लालु...


Shonoo
Thursday, June 15, 2006 - 12:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे दोन हात पाय वाले डिशवाॅशर अतिशय बेभरवशाचे, लहरी, दर वेळेस काम पूर्ण करतील याची खात्री नाही. कुणासमोर कौतुक केले की भडकतात.
शिवाय परत करता येत नाहीत :-)


Seema_
Thursday, June 15, 2006 - 3:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालु , शोनु अगदी अगदी


Rupali_county
Monday, September 25, 2006 - 12:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणून तर मी माझ्या सासु बाई ना सान्गितल कि डिश वॉशर इज माय सेकन्ड हसबन्ड...

Lajo
Monday, September 25, 2006 - 1:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन एक महत्वाची गोष्ट चेक करुन घ्यावी... चाईल्डलॉक! अत्यंत जरुरी आहे, मुख्यत्वेकरुन ज्यांच्या घरी लहान मुले आहेत त्यांच्यासाठी.

हल्ली असेही डिशवॉशर मिळतात ज्यांना दोन वेगवेगळे कप्पे असतात. थोडे महाग असतात पण एकावेळी जर थोडीच भांडी असतील तर एकच कप्पा लावता येतो. पाण्याची आणि डीटर्जंटची बचत होतेच शिवाय डिशवॉशर पुर्ण भरेपर्यंत थांबायची ही गरज नाही.

बाजारात अनेक प्रकारचे डीटर्जंट्स मिळतात, शक्यतो काहीही सुगंध नसलेल्या वड्या किंवा पाउडर वापरावी. कारण काही भांड्याना हा सुगंध अनेक दिवस रहातो आणि जाता जात नाही आणि मग ते भांडे वापरणे अगदी अशक्य होते.

डीशवॉशर मधे कधीही आल्युमिनीयमची भांडी किंवा पॅनची झाकणे टाकु नयेत. त्यांचा रंग बदलून नीळसर छटा येते आणि कधीच जात नाही.

प्लस्टिकची भांडी सुद्धा सगळीच डिशवॉशर सेफ असतात असे नाही त्यामुळे भांड्यावर लिहीले अहे का ते चेक करुन मगच ती टाकावीत.





Orchid
Wednesday, September 02, 2009 - 7:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नुकतेच आम्ही नव्या घरात रहायला आलो. ईथे डिशवॉशर आहे. यापुर्वी मी कधीच डिशवॉशर वापरलेला नाहीये. घराच्या ओनरनी त्याचे मेन्युअलही ठेवलेले नाही. त्यामुळे मला त्याचा वापर कसा करावा ते कळत नाहीये. त्यात काही वड्या आनि rinse aid दिसतय. तर प्लीज मला मार्गदर्शन करा. हा डिशवॉशर Bosch company चा आहे

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators