|
Vnidhi
| |
| Tuesday, June 13, 2006 - 3:09 pm: |
|
|
आप्पम व चटणी मी इथे एक कर्नाटकी स्पांज दोश्याचा प्रकार सांगते. आप्पम सहित्य: एक वाटी जाड तांदुळ,आर्धा वाटी उडीद,आर्धा वाटी जाड पोहे,आर्धा चमचा मेथ्या,दही,चवी पुरती साखर मीठ. कृती: आदल्या दीवशी तांदुळ,उडीद,पोहे वेगवेगळे भीजत ठेवणे..र्आत्री सगळे वेगवेगळे मीक्सर वर वाटुन घेणे. नंतर सर्व एकत्र करणे.(वेगवेगळे वाटले तरच नीट बारीक होते) सकाळी त्या मध्ये एक मोठा चमचा दही,साखर,मीठ घालून नीट मीक्स करणे.त्याचे तव्यावर जाड दोसे घालणे.(खाताना वरून लोणी घेणे)...थंडी मधे थोडा सोडा गरजे पुरता घालणे.(पीठ फ़ुगुन येण्यासाठी) चटणी साहीत्य:एक वाटी खीसलेले ओले खोबरे,थोडी कोथींबीर,२३ मीरच्या,आर्धा कांदा,एक मोठा चमचा दाण्यचे कूट,एक चमचा जीरे,चवी पुरते मीठ,साखर,लिम्बू. कृती:मीक्सर मधे खोबरे,मीरच्या,कोथींबीर,कांदा,जीरे बारीक करणे.त्या मधे दाण्याचे कूट,मीठ,साखर घालून पुन्हा एकदा मीक्स करणे.वरून लिम्बू पिळ्णे. ही चटणी आप्पम व आप्पे बरोबर छान लागते.
|
Chinnu
| |
| Wednesday, June 14, 2006 - 1:36 pm: |
|
|
निधी कृती छान वाटतेय. मी पोहे mix करुन पाहीन. तु दिलेल्या चटणीमध्ये लिंबाऐवजी दही घालुन पण चांगली लगते चटणी.
|
Vnidhi
| |
| Wednesday, June 14, 2006 - 3:05 pm: |
|
|
चिनू,पोहे रात्री मिक्सर मधून वाटून घेताना पाणी काढून मग बारीक कर. नाही तर पोहे लवकर बारीक होत नाहीत.
|
Ninavi
| |
| Wednesday, June 14, 2006 - 3:33 pm: |
|
|
उडीद की उडदाची डाळ गं?
|
Vnidhi
| |
| Wednesday, June 14, 2006 - 4:36 pm: |
|
|
निनावी, उडीद डाळ बरं का....
|
Amayach
| |
| Sunday, June 18, 2006 - 12:50 am: |
|
|
VNIDHI,तुझी रेसीपी छान आहे पण माझ्या केरलाईट मैत्रिणीने मला आणखिन एक सांगितले की, अप्पमचे पिठ दळतांना नारळाच्या दुधात दळायचे आणी, हा प्रकार मधे जाड आणी कडेला पातळ असतो म्हणुन खोलगट तव्यावर किंवा कढईत करायचा असतो. आणी मी तिच्याकडे अप्पम बरोबर वेजीटेबल स्टु खाल्ला होता. अर्थात इतर जाणकर मंडळी आणखिन भर घालतीलच.
|
Dineshvs
| |
| Sunday, June 18, 2006 - 3:42 pm: |
|
|
Amayach ने सांगितलेला केरळी प्रकार वेगळा असतो. तो एका वेगळ्या प्रकारच्या खोलगट तव्यात करतात. त्याला हॅंडल असते. पीठ घातल्याबरोबर तो तवा गोल फिरवायचा असतो, अर्थात त्यासाठी मनगटात भरपुर बळ आणि कौशल्य लागते. बाजुला जाळीदार कुरकुरीत कडे आणि मधे फुगीर मऊसर डोसा असे त्याचे स्वरुप असते. वर लिहिलेले आप्पे वेगळे, ते आपल्याकडे, कर्नाटकात व तामिळनाडुमधे करतात. याचे आप्पेपात्र असते. नागपुरकडे त्याला गुलपांकडी असेहि म्हणतात. N.B. वरच्या पोस्टखाली लिहिले म्हणुन मी जाणकार ठरत नाही, ते कुणी दुसरेच आहेत.
|
Amayach
| |
| Sunday, June 18, 2006 - 7:12 pm: |
|
|
दिनेश, वर अप्पमच लिहिले आहे हो. आप्पे माहित आहेत मला आप्पेपात्रात करतात. या बीबी वर अप्पमच लिहिले आहे. ईथे यु. एस. ए. मधे ईन्डीयन ग्रोसरी स्टोअर्स मधे ईडिअप्पम म्हणुन शेवयांसारखा प्रकार मिळतो तो सुद्धा मी खाल्ला आहे. तो प्रकार मात्र श्रीलंकन करी आणि कांदा टोमेटोच्या कोशिंबीरीबरोबर छान लागतो. कोणाला हवे असल्यास मी शोधुन रेसेपी टाकते.
|
Chinnu
| |
| Sunday, June 18, 2006 - 7:28 pm: |
|
|
अमयाच, अप्पमचे पीठ नारळाच्या दुधात grind केले तर चव छान वेगळी लागते. आप्पमबरोबर वेजीटेबल स्ट्यु नायतर एगकरी, किन्वा कुठलीही रस्साभाजी घेतात. निधी. तु सांगितल्याप्रमाणे करुन पाहीन. धन्यवाद.
|
Vnidhi
| |
| Sunday, June 18, 2006 - 8:58 pm: |
|
|
मला काही सांगायचे आहे... आप्पम व आप्पे हे दोन वेगळे प्रकार आहेत.मी दोन्ही पदार्थ नेहमी बनवते. अप्पे बनवताना त्या साठी चिरमुरे भिजवते. त्या साठी आप्पे पात्र लागते,आप्पम साठी साधा तवा लागतो. हा कर्नाटकी पदार्थ आहे.माझे आजोळ कर्नाटक मधे असल्यामुळे मला आप्पे व आप्पम छान जमतात,धन्यवाद....
|
Itsme
| |
| Monday, June 19, 2006 - 8:44 am: |
|
|
पुण्यात 'शिवसागर' मधे अप्पम छान मिळते ...
|
Veenah
| |
| Saturday, August 05, 2006 - 8:56 am: |
|
|
vnidhi,अप्पम साठी वेगळा कढई सारखा तवा मिळतो. nonstick मधे पण मिळतो. त्याला south indian लोक "appachati" म्हणतात. दिनेशनी लिहिल्याप्रमाणे ह्यात अप्पमचे पीठ घातल्यावर गोल फिरवून झाकण ठेवून एक बाजू भाजली की शिजलेला अप्पम काढून घेतात. ह्या खेपेला कोल्हापुरला गेल्यावेळी तिथली खासियत म्हणून "दावणगेरे लोणी डोसा किन्वा स्पंज डोसा" खाल्ला होता. त्याची कृती कोणाला माहीत आहे का?
|
Prr
| |
| Wednesday, March 05, 2008 - 2:46 pm: |
|
|
केरळचे अप्पम साहित्य - तांदूळ २ वाट्या, तयार भात १ वाटी, ओल्या नारळाचा चव २ वाट्या, नारळाचे पाणी १ वाटी, यीस्ट, साखर, मीठ. कृती - तांदूळ ५ तास भिजवून नंतर पाणी काढा. त्यात तयार भात व चव घालून वाटून घ्यावे. १० मिनिटे नारळाच्या पाण्यात चिमूटभर यीस्ट मिसळून ठेवावे. हेच पाणी अप्पमचे मिश्रण पातळ करण्यासाठी वापरावे. मीठ व साखर घालून, मिश्रण ५ ते ६ तास ठेवून द्यावे. कढई तापवून त्यात एक डाव मिश्रण घाला आणि लगेच गोल पसरून घ्या. मिश्रण कडेला पातळ व मधे जाड राहते. २ ते ३ मिनिटे झाकण ठेवून अप्पम वाफवा. झाकण काढल्यावर अप्पम कडेने सुटतो आणि पूर्ण निघतो. ... (सकाळ पेपर)
|
Prr
| |
| Wednesday, March 05, 2008 - 2:47 pm: |
|
|
ओल्या नारळाचा चव म्हणजे काय?
|
Sonalisl
| |
| Wednesday, March 05, 2008 - 10:35 pm: |
|
|
ओला नारळ वाटुन त्यातील सर्व दुध काढुन जो ऊरतो तो चव.
|
Prr
| |
| Thursday, March 06, 2008 - 4:47 pm: |
|
|
Sonalisl ... धन्स ग!
|
Arch
| |
| Monday, March 10, 2008 - 2:44 am: |
|
|
नाही ग तो चोथा. खवलेल्या नारळाच्या खोबार्याला चव म्हणतात.
|
Sonalisl
| |
| Monday, March 10, 2008 - 5:47 pm: |
|
|
हो का? बरं झालं सांगितलंस... मला तर आत्तापर्यंत तसच वाटत होतं. धन्यवाद.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|