Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
शिरा

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » शिरा » शिरा « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through July 21, 200620 07-21-06  4:57 pm

Nalini
Saturday, July 22, 2006 - 12:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी, लाप्शीला पहारीचा डाव देणे म्हणजे पहार चुलीत लालसर तापवुन ती शिजणार्‍या लाप्शीत घालणे. ह्याने लाप्शीला जरासा जळकट वास लागतो. ज्यांची खुप मोठे अन्नदान करण्याची परिस्थिती नसे ते अश्याप्रकारे डाव देत.


Maitreyee
Saturday, July 22, 2006 - 2:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओह असा 'डाव' आहे होय:-) मला वाचून अजिबात कळले नव्हते!

Manuswini
Monday, July 24, 2006 - 9:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनि,
असा डाव देणे आणी परिस्थीतीचा काय संबध??

मला नाही समजले


Moodi
Monday, July 24, 2006 - 9:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी ग्रामिण भागात गावजेवणाची पद्धत असते. आर्थीक कुवत असेल नसेल तरी शेतकरी किंवा साधे लोक सगळ्या गावाला लग्नाला बोलवतात. अशा वेळेस त्या शिर्‍याला किंवा लापशीला जळकट वास लागला तर जेवणारे कमी जेऊन ते अन्न उरेल अन सगळ्यांना थोडे का होईना पुरेल. या हेतूने असे करत असावेत.

Nalini
Tuesday, July 25, 2006 - 10:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी, अगदी बरोबर. ग्रामिण भागात लग्नात ग्रामजेवण देण्याची पद्धत असते.
बी, मी शिर्डी जवळच्या एका खेड्यातली आहे. पहार म्हणजेच सराटा का ते नाही सांगता येणार मला. तसेही मी ह्या विषयावर ईथे चर्चा करणे अयोग्य ठरेल.


Princess
Tuesday, July 25, 2006 - 10:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पहार म्हणजे सराटा नही. पहार टोकदार असते. सराटा म्हणजे उलथने जे पसरट असते आणि भाकरी किंवा चपाती उलटी करण्यासाठी वापरतात. मूडी, बरोबर सांगतेय का मी? मूडी तु कुठली आहेस?

Robeenhood
Wednesday, July 26, 2006 - 1:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी सांगते ते बरोबर आहे. त्याला चरका देणे असेही म्हणतात.पहार म्हणजे विहीर खोदायला वापरतात ती टोकदार लोखंडी काम्ब. आता काम्ब म्हणजे काय पुन्हा नका विचारू...

Moderator_9
Thursday, July 27, 2006 - 8:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कृपया विषयाला धरून बोला.
विषयांतर झालेले posts उडवुन टकले आहेत.
उरलेले काही posts विषयाला धरून नसले तरी नलिनीच्या post मध्ये त्याचा संदर्भ असल्याने तसेच ठेवले आहेत.



Amayach
Friday, July 28, 2006 - 3:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम, तु वर दिलेला, रवा आणि गुळ घालुन शिरा काल केला होता. फारच छान झाला होता. बी ने वर सांगितल्या प्रमाणे दुसर्या दिवशी टेस्ट करायचा होता पण लगेच फ़स्त झाला. मी गुळाचा शिरा प्रथमच खाल्ला. छान रेसीपी दिल्याबद्दल धन्यवाद.

Psg
Saturday, July 29, 2006 - 5:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमायच धन्स गं! :-) मस्त लागतो हा गुळाचा शिरा. कधीतरी चवीत बदल.. एकदम खमंग :-)

Moodi
Wednesday, August 23, 2006 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम काल संध्याकाळी तू लिहीलेल्या पद्धतीने शिरा केला. खूपच छान झाला गं. फक्त तूप जरा कमी पडले, पण पुढे परत आणिनच. मी जायफळ नाही घातले फक्त वेलची घातली, तरी मस्तच झाला. मला गूळाचे कोणतेही पदार्थ खूप आवडतात, हा पण आवडलाच.धन्यवाद गं

Psg
Thursday, August 24, 2006 - 5:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद कसले गं? मला फ़ार कमी पदार्थ येतात. इथले पदार्थ आणि त्या करणार्‍या तुमचा उत्साह पाहून मला तुमचा आदर वाटतो :-) म्हणून मला काही लिहायची संधी मिळाली की मी सोडत नाही!

Moodi
Tuesday, September 19, 2006 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेमस्तक मनुस्विनीने याच बीबीवर आधीच्या पानावर प्रसादाचा शिरा लिहीलेला आहे, त्यात हा जयावीने लिहीलेला शिरा इथे टाकाल का?

/hitguj/messages/103383/116528.html?1158653681

Bee
Tuesday, September 19, 2006 - 8:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसे करणे उलट होईल. त्यापेक्षा मनुची कृती त्या बीबीवर हलवली तर जास्त योग्य होईल. तिची कृती थोडी आधुनिक आहे. मला पारंपारिक हवी होती.

Manuswini
Tuesday, September 19, 2006 - 5:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोबर मूडी

माझी सत्यनारायण कृती 'सत्यनारयण प्रसाद bb वर हलवली तर बरे होईल.

बी,
अरे ही आधुनिक म्हणजे फक्त त्यात खवा टाकला आहे.

तु खवा काढ, बाकी केळ, शुद्ध तूप आणी दूधात शिजव.

माझी आई खवा टाकत नाही पण मी नेहमी प्रमाणे research करते आईच्या dishes वर तत मला खवा टाकून yummy लागला.
तूपाचे प्रमाण हे ज्यास्तच असते तेव्हा कमिच खावा.
पारंपारिक मध्ये हे असे कर खालील प्रमाणे,
तू आधी रवा कोरडा भाज. मग तूपात भाजुन घे रवा.
२) मग केळ छान तूपात छान परत. केळ शिजले की तूप सुटते आणी घरभर सुंगध येतो. मग त्यात वेलची,केसर टाक. केळीचे तूप तोपातच ठेवून केळी काढुन टाक. मग त्यात रवा टाक. तो पर्यन्त दूध केसर टकून उकळ बाजुला २ वाटी रवा असेल तर तीन वाट्या दूध हे प्रमाण घे. हळु हळु सोड रव्यात. मग शिजव रवा आधी झाकुन आणी नंतर साखर टाक अडीच वाट्या. झाकून ठेव मग शेवटी पुन्हा वेलची,जाय्फल,बदाम काप.
अतीशय Tasty असा प्रसाद बनतो. हल्ले एक spoon खाते मी. लहन्पणी bowl भर खायचे मी प्रसाद वाटायला बसायचे घरी पूजा असताना. गेले ते दिवस.


Orchid
Tuesday, February 05, 2008 - 7:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अननसाच्या शिर्‍याची रेसिपी मिळेल का प्लीज!

Dineshvs
Wednesday, February 06, 2008 - 3:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक वाटी बारिक रवा साजुक तुपावर पांढराच भाजुन घ्यावा.

टिनमधला ( शक्यतो हेवी सिरपमधला ) अननस घेऊन त्याच्या फ़ोडी कराव्यात.या फ़ोडी वाटीभर असाव्यात. पाक साधारण वाटीभर घ्यावा. या पाकात थोडासा पिवळा रंग घालावा.
भाजलेल्या रव्यावर पाण्याचा वा दुधाचा हबका मारुन घ्यावा. पण नेहमीच्या शिर्‍या एवढे पाणी घालु नये. रवा साधारण शिजला कि त्यात वरचा पाक घालावा. टिनमधला पाक किती गोड आहे, यावर आणखी साखर घालायची कि नाही ते ठरवावे.
नीट आळुन आला कि झाकण ठेवुन वाफ़ येऊ द्यावी. मग मंद आचेवर जरा परतुन अननसाच्या फ़ोडी घालुन नीट मिसळुन घ्यावे. फ़ोडी शिजवलेल्याच असतात त्यामुळे जास्त शिजवु नये. हवाच असेल तर यात थेंबभर अननसाचा इसेंस घालावा. बदाम वा पिस्त्याचे बारिक काप घालावेत.


Orchid
Wednesday, February 06, 2008 - 3:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभार दिनेशदा, लवकरच करुन बघिन!

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators