|
Savani
| |
| Wednesday, June 07, 2006 - 6:17 pm: |
| 
|
मला नुकताच एक crockpot भेट मिळाला आहे. पण त्याचा उपयोग कसा करावा हे मात्र मला माहित नाही. veg पदार्थ काय काय करता येतील. रोजच्या भाज्या त्यात करता येतात का? कोणी वापरत असाल तर रोजच्या स्वैपाकात कसा उपयोग करता?
|
Savani
| |
| Thursday, June 08, 2006 - 5:49 pm: |
| 
|
crockpot कुणीच नाही का वापरत? सांगा नं कुणीतरी
|
Moodi
| |
| Wednesday, June 14, 2006 - 5:28 pm: |
| 
|
सावनी कुणाला जर याविषयी माहिती नसेल तर गुगलभाऊ जिंदाबाद. नुसते नाव टाक गुगलवर crockpot resepies म्हणुन, अन बघ जादू. http://southernfood.about.com/library/crock/blcpidx.htm http://www.recipegoldmine.com/crockpot/crockpot.html http://crockpot.allrecipes.com/ . आता हसरा चेहेरा कर बघु. 
|
Mrinmayee
| |
| Wednesday, June 14, 2006 - 7:34 pm: |
| 
|
सावनी, मूडिनं दिलेल्या लिंक्स छान आहेत. त्यातल्या काही रेसिपीज आपल्याला हवे तसे बदल करून तयार करता येतील. मी त्यात छोले, राजमा (आधी नेहेमीसारखे भिजवून) करते. मसाले मुरत शिजलेलं कडधान्य खूप छान लागतं. रोजच्या साठी वापरायचं तर त्यात वरण, बटाटा भाजी(रस्सेदार) पण चांगलं होतं. त्यातली दाल मखनी पण बढिया. पुलाव, मसाले भात करून बघितले. तेही चांगले लागले. पण चवीत विषेश फरक जाणवला नाही. त्याशिवाय मटण, मटण बिरयानी सारखे पदार्थ फारच छान होतात. चिकन कडे लक्ष द्यावं लागतं नाहीतर पिठलं होतं चिकनचं!
|
Shonoo
| |
| Thursday, June 15, 2006 - 12:43 pm: |
| 
|
crockpot मधे मटण बिरयानी कशी करायची जरा सविस्तर लिहा नं. म्हणजे मसाला, मटण, कांदे इ. आधी परतून मग crockpot मधे घालायचे का? किती वेळ लागतो?इत्यादी. इथे चांगले मटण आणायला दीड-एकशे मैलांची चक्कर पडते. तेंव्हा त्यावर trial & terror करायला धीर होत नाही!
|
Ninavi
| |
| Thursday, June 15, 2006 - 1:15 pm: |
| 
|
>>> trial & terror xxx xxx xxx
|
Savani
| |
| Thursday, June 15, 2006 - 1:26 pm: |
| 
|
मूडी, चांगल्या वाटताहेत गं त्या रेसिपीज. मृण्मयी, अगं मला इथल्या(मायबोली नाही बरं) एक दोन जणींनी सांगितलं की आपल्या पद्ध्तिने काही भाज्या वगैरे नाही होत चांगल्या. खुपच गाळ शिजतात म्हणे आणि पांचट चव लागते. म्हणून मला हवं होतं की कश्या पदध्तिने उपयोग करावा? तू म्हणतेस त्याप्रामाणे छोले, कडधान्यं करून बघेन. मी पूर्ण शाकाहारी असल्याने, मटण, चिकन नाही...
|
शोनू, टाकते रेसिपी मटण बिर्यानीची. ट्रायल यशस्वी होईल तेव्हा टेरर बाळगू नये मॉड, crock pot रेसिपीजचा वेगळा BB उघडला तर चालेल का? सावनी, सगळ्या भाज्या नाही ग शिजवता येत. अगदी गळून जातात. पण बटाट्याचा रस्सा,दम आलू,भरली वांगी फार छान होतात.
|
Milindaa
| |
| Thursday, June 15, 2006 - 3:02 pm: |
| 
|
योग्य त्या सदरात, योग्य त्या नावाने उघडा, उगाच Crockpot recipes असा नको. तसे केले तर त्यावर हजारो रेसिपीज येतील आणि लोकांना त्या काही काळानंतर सापडतील याचा भरवसा नाही. किंवा Crockpot Recipes चा बीबी उघडा व त्यात योग्य त्या रेसिपीचा नवीन बीबी उघडा.
|
Shonoo
| |
| Tuesday, June 27, 2006 - 11:41 am: |
| 
|
ती crockpot मधल्या बिरयाणी ची रेसिपी crockpot मधेच तयार होत आहे की काय? लवकर टाका नं. मी सर्वांना जाहीर करून बसलेय लवकरच नवीन पद्धतीची बिरयाणी करणार म्हणून :-) आगाउ धन्यवाद.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|