|
Dineshvs
| |
| Friday, June 02, 2006 - 5:02 pm: |
| 
|
आठ ते दहा आक्रोड फ़ोडुन त्याचा गर किंचीत भाजुन घ्यावा. तुकडे मोठेच असावेत. प्रत्येक आक्रोडातला छोटासा तुकडा खाऊन बघावा, एखादा आक्रोड कडु निघतो. असे तुकडे एक कप घ्यावेत. एका सॉसपॅनमधे अर्धा कप बटर, अर्धा कप साखर व अर्धा कप ईव्हॅपोरेटेड मिल्क एकत्र करावे. सतत ढवळत पाच मिनिटे ऊकळु द्यावे. हवे तर त्यात चिमुटभर मीठ घालावे. गॅसवरुन खाली ऊतरुन त्यात आक्रोडाचे तुकडे, अर्धा चमचा व्हॅनिला ईसेन्स घालावा, व दीड कप आयसिंग सुगर घालुन लाकडी चमच्याने हलक्या हाताने घोटावे. लोणी लावलेल्या ताटात ओतुन थंड करावे. व धारदार सुरीने तुकडे करावे. यात हवे तर एक चमचा कोको घालावा. किंवा मिश्रण गरम असतानाच कुकिंग चॉकलेटचे तुकडे घालावेत. आणि ढवळावे. याने मार्बल ईफ़ेक्ट येतो.
|
Vadini
| |
| Sunday, June 11, 2006 - 8:17 pm: |
| 
|
evaporated milk mhanaje 'milk powder' ka?mala kharokhar mahit nahiye.kalale mhanaje tyala German bhashet kay mhantat te shodhave lagel-mhanun vicharle.
|
Dineshvs
| |
| Thursday, July 06, 2006 - 4:38 pm: |
| 
|
सॉरी, वादिनी, लक्ष नाही गेले ईकडे. ईव्हॅपोरेटेड मिल्क म्हणजे आटवलेले दुध. ते रबडी ईतके नसते आटवलेले आणि त्यात साखर पण नसते. दाटसर असते आणि छोट्या टिनमधे मिळते. नेस्ले कंपनीचे असते. बाकिहि कंपन्या आहेत.
|
Vadini
| |
| Thursday, July 06, 2006 - 8:11 pm: |
| 
|
Oh,accha.mhanaje aapan jyala 'condenced milk' mhanto te na? thank you.aata ha prayog karun baghate.
|
Dineshvs
| |
| Friday, July 07, 2006 - 4:00 am: |
| 
|
नाही वादिनी कन्डेन्स्ड मिल्क फ़ार गोड असते. एवॅपोरेटेड मिल्कमधे साखर नसते. तसेच ते तितके दाटहि नसते. कन्डेन्स्ड मिल्क वापरले तर साखर वापरायची गरज नाही.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|