Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
उंड्याची चाकं

Hitguj » Cuisine and Recipies » ब्रेड, पोळी, पराठे » उंड्याची चाकं « Previous Next »

Bee
Thursday, May 18, 2006 - 4:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पोळीला पर्याय म्हणून हा एक प्रकार समोरच्या आजींनी मला शिकवला. ह्यामुळे पोळ्या करण्याचा त्रास वाचतो. वेळ कमी असेल तर हा प्रकार करण्यासारखा आहे.

पोळीला आपण जेवढा उंडा घेतो त्यापेक्षा थोडा कमी घेऊन त्याला पोळपाटावर हळूच दाबायचा. तो चाकासारखा चपटा झाला की दोन्ही बाजुने त्याला तुपाचा समांतर हात लावावा. ताव्यावर एका वेळी पाच सात चाकं ठेवायची. ताव्याला देखील तुप लावायचे. मंद आचेवर खरपूस होऊ द्यायचे. तुरीच्या डाळीच्या वरणासोबत ही चाक खूप छान लागतात. नाहीतर पिठीसाखरेसोबतची खाऊ शकता.

वरणासोबत खाण्यापुर्वी ही चाकं वरणात थोडावेळ बुडवून ठेवायची त्यामुळे ती थोडी मुरतात आणि वरणात तूप घालायची गरजही भासत नाही.



Prajaktad
Thursday, May 18, 2006 - 11:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खांदेशात " गाकर " करतात ते असेच असतात,पोळी लाटणे हा प्रकार अजिबातच जमत नसेल तर
कन्केचा उंडा घेवुन ताटलीत किवा पोळपाटावर थापावा मधे तेल वा तुप लावुन त्रिकोणी घडी करावी तव्यावर तेल तुप टाकुन भाजावी
दुधाबरोबर खावी.


Maudee
Thursday, May 18, 2006 - 11:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बट्टी याच प्रकारात मोडते.....
तेही वरणाबरोबरच ख़ातात. राजस्थानात जीला दाल्-बाटी म्हणतात तीलाच जळगाव side ला बट्टी असे म्हणतात


Mahashweta
Thursday, November 23, 2006 - 12:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hi chak means Daldhokalicha prakar ahe ki kay ki tich pudhach vergin?

Prajaktad
Tuesday, April 29, 2008 - 6:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गाकर ! कणिक भिजवता येते.. पण, पोळी येत नाही अशा अडचणीतुन निर्माण झाला असावा...किंवा लावायाला घेतलेली कणिक उरली तर तिचा गोळा बनवुन थापुन संपवताना झाला असावा.ऽसो उगम काहीही असो..
रोजची पोळीची कणिक(पीठ) किंवा बट्ट्यासाठी जाडसर दळलेली कणिक (पीठ) घेवुन मिठ,तेल घालुन भिजवावी..ताटलीला तेल लावुन किंवा पोळपाटावर थापुन गोळा पसररावा(रोजच्या पोळिच्या दिड्पट उंडा घ्यावा)..मधे तेल लावुन त्रिकोणी घडी घालावी..तव्यावर तेल किंवा तुप टाकुन मंद आचेवर भाजावे..(पोळिपेक्षा जाड असल्याने भाजायला वेळ लागतोच.)..बट्टिची कणिक नसेल तर पिठाच्या समभाग बारिक रवा (न भाजता)मिसळावा..




Princess
Wednesday, April 30, 2008 - 1:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता, तू खांदेशातली का?

Bee
Wednesday, April 30, 2008 - 2:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण, पोळी येत नाही अशा अडचणीतुन निर्माण झाला असावा...किंवा लावायाला घेतलेली कणिक उरली तर तिचा गोळा बनवुन थापुन संपवताना झाला असावा.ऽसो उगम काहीही असो..
>> :-) may be true!

प्राजक्ता, ही माहिती छान आहे. पण ह्या कृतीत, दही, ओवा, तिळ असे अन्य घटकही असतात. तेंव्हा असे वाटते आहे की अजून काही तरी उरले आहे वरील कृतीत.



Prajaktad
Wednesday, April 30, 2008 - 3:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता, तू खांदेशातली का?>>>
नाही! माझी वहिनी खांदेशातली (जळगाव) आहे, मी नाशिकची आहे..
पण ह्या कृतीत, दही, ओवा, तिळ असे अन्य घटकही असतात. तेंव्हा असे वाटते आहे की अजून काही तरी उरले आहे वरील कृतीत.
बी! हे सगळे घटक पदार्थाची चव आणी खुमारी वाढवतात..पण, मुळ क्रुति साधिच आहे..

Bee
Wednesday, April 30, 2008 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे मात्र अगदी खरे! (खुमारी.. वा काय शब्द आहे :-))

Ajjuka
Wednesday, April 30, 2008 - 4:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुज्जु लोकांची बिस्किट भाकरी पण याच्याच जवळची असते. मात्र तेल तूप दोन्ही भरपूर असतं आणि मंद आचेवर आतपर्यंत शिजेतो ठेवलेली असते.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators