|
Bee
| |
| Thursday, May 18, 2006 - 4:36 am: |
| 
|
हा प्रकार मी ह्या उन्हाळ्यात समोरच्या आजीकडून शिकलो. रताळ्याच्या शिजतील अशा बारीक चकत्या करून त्या वाटीभर पाण्यात टाकायच्या. नंतर पातेल्यात चार चमचे तूप घ्यायचे, ते गरम करायचे, वरुन जिर्याची फ़ोडणी द्यायची. बाकी इतर काहीच घालायची गरज नाही. नंतर लगेच पाण्यासहीत चकत्या सोडायच्या. वर एखादे झाकण ठेवून मंदशा आचेवर ह्या चकत्या शिजू द्यायच्या. शिजल्या की त्यात हवा तेवढा गुळ घालायचा. चकत्या मधेच तुटायला नकोत. गुळाचा पाक चकत्यांच्या आत शिरला की गॅस बंद करायचा. पातेले उतरवून त्यात काठाने दोन चमचे तूप परत सोडायचे. खाताना ह्या चकत्या कोमट करुन खा नाहीतर गुळामुळे जिभ पोळण्याची शक्यता आहे. लहान पोरांना हा प्रकार खूप आवडण्यासारखा आहे.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|