|
बीडाच्या तव्यावर कुणी पोळ्या केल्या आहेत का?नोन स्टीक वापरू नये असे म्हणतात,म्हणौन पर्याय बघत आहे.मी cast iron चा तवा आणला पण त्यात पोळ्या चिकटत आहेत
|
रेणु मी आत्ता ठाण्यातुन Tuffware ची भांडी घेतली, त्यात पदार्थ लागत नाहीत, व कमी तेलात ही करता येतात आणि महत्वाचे म्हणजे लाकडी चमचे वापराची गरज नाही. Nonstick च्या वापरण्या बद्द्ल माहीत नाही, पण माझ्याकडे Nirlepa चे दोन तवे आहेत त्यामुळे मी Tuffware चे तवे आहेत का विचारलच नाही. ह्या बद्द्ल दिनेश, मुडी व ईतर जाणकार सांगु शकतील
|
Jayavi
| |
| Thursday, February 09, 2006 - 12:57 pm: |
| 
|
रेणू, अगं सुरवातीला काही दिवस चिकटतील आणि मग छान व्हायला लागतील. माझा असाच अनुभव आहे. मला असं वाटतं की कुठल्या तरी paint ची layer असते त्यावर. मग छान घासून ती layer निघाली की मग नाही चिकटत.
|
Lalu
| |
| Thursday, February 09, 2006 - 1:39 pm: |
| 
|
बीडाच्या तव्याबद्दल हे माहित नव्हतं. माझ्याकडे साधाच लोखन्डी तवा आहे चपातीसाठी. नॉन स्टिक वापरु नये असं म्हणतात पण ते योग्य रितीने वापरलं तर त्याने काही अपाय होत नाही. त्यावर फ़्लुओरिन असलेल्या पॉलिमरचा थर असतो उदा. टेफ़्लॉन. हे nonporous मटेरिअल असतं म्हणून त्याला काही चिकटत नाही. अशी भांडी फार तापू देऊ नयेत, म्हणजे 600 F वगैरे. एवढ्या तापमानाला आपण कधीच भांडं तापवत नाही. ते वापरुन जुने झाल्याने त्याचे लेयर निघून यायला लागले असतील तर वापरु नयेत. विकत घेताना त्याबरोबर आलेली manuals वाचून त्यात लिहिल्याप्रमाणे भान्ड्यान्ची काळजी घ्यावी. अगदी मागच्याच आठवड्यात हा लेख वाचनात आला - Don't toss the teflon pan - yet .
|
जयावी,मलाही असच वाटतं,की वापरून वापरून तो होईल छान.त्याच्या बरोबर जे मॅन्यूअल आलय,त्यात त्यांनी तवा सीझन करायला संगीतलाय..म्हणजे तव्यावर तेल लाऊन तो ओवेन मधे ३००F ला १ तास ठेवयचा.. असं १-२ वेळा केल्यानी तवा अगदी नॉन स्टीक सारखा वापरता येतो म्हणे..करून बघते आणी सांगते
|
लालू, लेख वाचला माझ्या नॉन स्टीक तव्याचं कोटिंग निघायला लागलय,म्हणून नवीन सर्क्युलॉन चा तवा आणला आहेच,पण लोखंडी किंवा बीडाच्या भांड्यात स्वयंपाक करावा म्हणतात,त्यातले गूण अन्नात उतरतात,म्हणून प्रयत्न करून बघत आहे.
|
Seema_
| |
| Thursday, February 09, 2006 - 5:09 pm: |
| 
|
आता जी काळी भांडी येताहेत market मध्ये ती म्हणजेच का tuffware ची. थोडी महाग असतात ती? तीच असतील तर माझ्याकडे तवा आणि पातेली पण आहेत त्याची.खूप मस्त आहेत वापरायला. " non stick च coating थोड जरी निघाल असेल तरी ते भांड pregnancy मध्ये अजिबात वापरु नका " अस , माझ्याकडे पुस्तक आहे त्यात लिहिलय .
|
Dineshvs
| |
| Thursday, February 09, 2006 - 5:38 pm: |
| 
|
नॉन स्टिक भांडी सिझन करुन घ्यावी लागतात. त्याची साधी क्रिया त्यातल्या बुकलेटमधे असतेच. मंद आचेवर केल्यास आणि कमी तेल वापरल्यास ती अनेक वर्षे टिकतात. कोटिंग निघत असेल तर मात्र ती वापरु नयेत. बाजारात मिळणार्या लोखंडी तव्यावर गंजु नये म्हणुन ग्रीस लावलेले असते. त्यामुळे ते स्वच्छ करुनच तवे वापरावेत. त्याचा वास तापवल्यावर येता कामा नये. लोखंडाच्या भांड्यात जेवण करुन मिळणारे लोह अत्यल्प असते. पदार्थ त्यात जरी शिजवला तरी तो लगेच दुसर्या भांड्यात काढुन घ्यावा.
|
Psg
| |
| Friday, February 10, 2006 - 7:23 am: |
| 
|
पुण्यात फक्त पोळी साठी निर्लेप चा तवा मिळतो.. त्यावर रोजच्या पांढर्या आणि गोड पोळ्या, परोठे छान होतात असे ऐकले आहे. कोणाकडे आहे का? मी पोळ्यासाठी साधा तवा वापरते आणि त्यावर छान पोळ्या होतात.. हा तवा कित्येक वर्ष टिकतो! निर्लेप वर पोळी जरी छान फुगली तरी नंतर गार झाल्यावर कडक होते!
|
psg , माझ्याकडे Krishna या कंपनीचा anodised तवा आहे. खूप छान आहे. मी तो गेली ५ वर्षे वापरत आहे, अजून व्यवस्थित आहे. त्यावर रोजच्या पोळ्या, पराठे आणि चक्क पुरणपोळ्या पण छान होतात. shallow fry पण मी त्यावरच करते. आता ही कंपनी अस्तित्वात आहे कि माहीत नाही. पण anodised तवे मिळतात मार्केट मध्ये.
|
आणि हो, यावर केलेल्या पोळ्या गार झाल्यावर कडक होत नाहीत निर्लेप सारख्या !
|
sharmila,तू हा anodised तवा कुठून घेतलास..तशाच प्रकाराची कढई पण मिळते ना?साधारण किंमत काय सांगशील का?
|
रेणु, हा तवा मी दादर ला घेता होता. अशीच कढई पण आहे माझ्याकडे तु म्हणतेस तशी. मला आता नक्कि किंमत आठवत नाही पण २०० रुपयाच्या आसपास मिळाली होती. but please check the price now . भारतात हल्ली सगळीकडे मिळतात अशी भांडी.
|
Psg
| |
| Monday, February 13, 2006 - 5:10 am: |
| 
|
शर्मीला, मी केली चौकशी.. tuffware चा anodised तवा आहे.. मोठा आहे Rs. ४४०/- ला, लहान Rs २३०/-ला. आणि scheme चालू आहे.. जुना कोणतही तवा दिला तर २५% discount ! मी या योजनेचा लवकरच लाभ घेणार आहे! इथे नंतर सांगिनच कसा आहे तवा ते..
|
Nandita
| |
| Monday, February 13, 2006 - 6:23 am: |
| 
|
मला तर Hawkins var puNa- ivaXvaasa vaaTtÜÊ AMjalaI AaiNa inarlaop poxaa hÜikMsa caa futura tvaa Canaca Aaho²²²² ikMmat Rs.575-675
|
नंदिता बघते मी तोच. मला वाटते की cooker पण आहे ना? तु किंवा कुणी वापरला आहे का? माझ्या कडे आपला नेहमी सारखा आहे.
|
Nandita
| |
| Monday, February 13, 2006 - 8:24 am: |
| 
|
hÜ hÜ hÜiknsacaa kukr hI maI vaaprtoÊ Aatlyaa JaaknaacaaÊ pNa ihMDailayamacaa Aaho. tU naivana GaoNaarca
Aahosa tr F,yaucaura ca Gao 
|
Jayavi
| |
| Monday, February 13, 2006 - 8:48 am: |
| 
|
अंजू, मी हॉकिन्सचा futura कुकर वापरतेय. एकदम बढिया आहे. पण चुकुनही Dish Washer मधे टाकू नकोस, मी Dish Washer मधे टाकल्यामुळे माझ्या नव्या कोर्या कुकरचं वरचं पॉलीश निघालं गं. रंग उडालेल्या भिंतीसारखा दिसतो त्यामुळे
|
Psg
| |
| Friday, February 17, 2006 - 5:18 am: |
| 
|
मी घेतला tuffware चा तवा आणि छान पोळ्या होत आहेत.. अजिबात करपत नाहीत. i recommend it to whoever is looking out for a good tava . आणि हो, 25% discount च गाजर आहेच! so, its worth it!
|
पूनम, त्यावर आता पुरणपोळ्या करुन पहा. बघ कशा छान होतील ते ! आणि हो कामवालीला घासायला देउ नकोस. वाट लावून टाकेल ती. मी माझा तवा mild liquid soap ने धुते.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|