|
Nandita
| |
| Wednesday, April 12, 2006 - 11:39 am: |
| 
|
मी Philips चा जुसर घेतला. अप्रतिम आहे! छानपैकी फिल्टर म्हणजे अगदि वस्त्रगाळ जूस काढता येतो
|
Maitreyee
| |
| Wednesday, April 12, 2006 - 12:43 pm: |
| 
|
माझ्याकडे Jack LaLane Power juicer आहे. अधिक माहिती इथे पहा माझा अनुभव अतिशय छान! ते readymande आंबट ऑरेन्ज ज्यूस मला मुळीच आवडत नाहीत. या ज्यूसर मधे इतका सुरेख होतो ज्यूस! यात मला आवडलेली गोष्ट म्हणजे फ़ळे(सन्त्रे सोडले तर) न सोलता चिरता तशीच नुस्ती टाकयची! नाहीतर ते साले, बिया काढणे, फ़ोडी करणे हे काम इतके कंटाळवाणे होते की ज्यूस करणे च नको असे वाटते! ज्यूस ची चव, रंग अतिशय सुन्दर!चोथा(पूर्ण कोरडा!) दुसर्याबाजूने बाहेर येतो. मात्र नन्तर पूर्ण juicer साफ़ करावा लागतो, ते एक काम असते पण सगळी भांडी dishwasher मधे लावता येतात. याबरोबर एक रेसिपी बुक येते, त्यात खूप छन छान ideas आहेत, Orange+carrot, fresh Apple, Apple- carrot, Apple -ginger- asparagus, Fresh tomato असे कितीतरी प्रकारचे ज्यूस प्या आणि आरोग्य आणि चवीचे संतुलन साधा आणि मुलांना पण इतके आवडतात हे ज्यूस! त्यांना fruit-vegetables चा दिवसभराचा dose दिल्याचे आपल्याला पण समाधान मिळते हा ज्यूसर Bed bath and beyond, Costco ला मिळतो. 100$ च्या आस पास किम्मत आहे. आमच्याकडचा ज्यूसर पाहून अनुभवून आमच्या अनेक मित्र मैत्रिणींनी घेतलेत. 220v वर चालतो त्यामुळे देशात पण काही लोक घेऊन गेले.तिथला अनुभव माहित नाही कसाय.
|
Tanya
| |
| Wednesday, April 12, 2006 - 3:54 pm: |
| 
|
माझ्याकडेही Jack La Lanne's Juicer आहे, आणि मैत्रेयीने म्हंटल्याप्रमाणे, apple, celery, संत्री,द्राक्षे वगैरेचें मस्त ज्युस निघतात. सुरुवातीला मी जरा साक्षंक होते, कारण इथल्या t.v.products advt. बघुन घेतला होता, पण पुर्ण वसुल.
|
Bee
| |
| Thursday, April 13, 2006 - 6:29 am: |
| 
|
तान्या, इथे कुठे मिळेल हा ज्यूसर? मालाही एक घ्यायचा आहे.
|
Tanya
| |
| Thursday, April 13, 2006 - 6:38 am: |
| 
|
बी... मी तो OG. मधुन घेतला. तिथे तुला मिळेल. orchard rd. वर असलेल्या OG त 4th floor तुझा फोन नं मला मिळत नाही, जमेल तेव्हा फोन करता येईल का?
|
Nandita
| |
| Thursday, April 13, 2006 - 8:10 am: |
| 
|
मैत्रयी हो philips चा जुसर ही अगदी तस्साच आहे. अणि खरच होटेल मधल्या जुस पेक्षा कित्तितरी पटिने छान जुस मिळतो. पण तो जो कोरडा चोथा बाहेर येतो त्याचा म्हण्जे गाजराचा चोथा किंवा दुधी चा याचा काहि उपयोग करू शकतो का? गाजराचा किंवा दुधी चा हलवा होउ शकतो का? 
|
Maitreyee
| |
| Thursday, April 13, 2006 - 12:04 pm: |
| 
|
हलवा वगैरे नाही होणार गं. कारण त्या चोथ्याला काहीही चव नाही उरत!
|
Prady
| |
| Thursday, April 13, 2006 - 12:44 pm: |
| 
|
नंदिता तुझ्या घरात झाडं असतील तर त्या झाडांना घाल तो चोथा. छान खत म्हणून उपयोग होईल. तसाच्या तसा नसेल घालायचा तर एका बादलीत त्याला compost खताचं culture घाल. रोज घरातला थोडा ओला कचरा( भाज्या, फळं यांची सालं, देठ,निर्माल्य etc. ) या बादलीत घालायचा आणी थोडं हलवायचं. compost culture फ़क्ता एकदाच घालावं लागतं. बादली झाकून ठेवावी. बादली भरली की ८-१० दिवसांत खत पूर्ण तयार होतं. पण अर्थात हे सगळं करण्या साठी तेवढी आवड हवी. हल्ली मुंबई मधे कचर्याची management करण्यासाठी बर्याच societies हा project हाती घेतात. मैदानात मोठा खड्डा करून पण असं खत करता येतं. आम्ही घरी gallery मधेच छोटी बादली ठेऊन हे केलं होतं. भारता बाहेर असशील तर हे कितपत जमेल माहित नाही पण हौशी कलाकारांनी देशात करून बघायला हरकत नाही.
|
Ninavi
| |
| Thursday, April 13, 2006 - 2:47 pm: |
| 
|
पण असे ज्यूसेस निःसत्व नसतात का? म्हणजे हा सगळा ' चोथा' ( फायबर्स) काढून नुसती शुगर प्यायची का?
|
Dineshvs
| |
| Thursday, April 13, 2006 - 3:01 pm: |
| 
|
निनावि, हे लिहायचे धाडस तु केलेस ते छान झाले. जेंव्हा तुरंत शक्ती येण्याची गरज असते, ( म्हणजे आजारपणानंतर, थकवा आला असेल तर ) तेंव्हा असे रस पिणे योग्य आहे, पण एरवी हे रस न गाळताच प्यावेत. चोथा टाकु नये. निसर्गात जिथे जिथे साखर आहे, तिथे तिथे ती चोथ्याबरोबर आहे. व ती चावुनच खाल्ली जावी अशी योजना आहे. चिकु, आंबा सारखी फळे मानवनिर्मीत असल्यामुळे तिथला गर जास्त गोड असतो. व फ़ायबर कमी असते. चोथ्याचा ऊपयोग करायचा असेल तर तो पराठे वैगरे मधे घालुन संपवता येईल.
|
Seema_
| |
| Thursday, April 13, 2006 - 3:43 pm: |
| 
|
निनावी,दिनेश तुमचे मुद्दे योग्य आहे . पण खरतर मग तस बघायला गेल तर फ़ळ खाणच चांगल . पण मुल बरेच वेळा फ़ळ खात नाहीत . आणि त्याना बरेचदा जे तयार juice मिळतत ते प्यायला त्याना फ़ार आवडत . अशावेळी हा पर्याय चांगला आहे . फ़ळ आवडीन खात असतील तर मग काही प्रश्नच नाही . मी हे माझ्या मुलीच्या आणि तीच्या इतर बरोबरीच्या मुलांच्या अनुभवावरुन लिहिते आहे . तीला फ़ळ आवडतात . juice नाही आवडत . पण तीच्या मैत्रीनीला juice आवडतो . दुसरा एक मुद्दा भाज्यांचा . पालकाचा रस किती जण आवडीन पितील ? पण जर का तो या juicer मधुन काढुन त्यात गाजराचा रस वैगरे mix करुन दिल तर नक्कीच उपयोगी आहे . मोठ्यासाठी ही अलिकडे भारतात कार्ल्याचा , कोरफ़डीचा,गव्हाच्या त्रुणांचा juice सकाळी फ़िरायला गेल कि लोक घेतात . अर्थात dr च्या सल्ल्यानेच . अशा juice साठी पण हा उपयोगी पडेल .
|
Dineshvs
| |
| Thursday, April 13, 2006 - 4:37 pm: |
| 
|
फळे चावुन खाणे कधीही चांगले. फळांचे आकर्षक सलाद, किंवा तत्सम काहि करता येतेच. लहान मुलाना साखरेचाहि तसा सहसा प्रश्ण नसतो. पण सध्या ज्या परिस्थीतीत भाज्या वाढवल्या जातात, ते बघता, कच्चे ज्युस पिणे मला तरी आवडणार नाही. सकाळी फिरायला जाताना जे ज्युस विकायला असतात व प्यायले जातात, त्यातहि मला जरा फ़ॅडच दिसते. नुसत्या गाजराचा रस पिऊन अनेकाना त्रास होवु शकतो. पालक म्हणजे फार थोर भाजी आहे, हेहि तितकेसे बरोबर नाही, ती सहज शिजते, हिरवी दिसते, जास्त निवडावी लागत नाही, या कारणानेच जास्त वापरली जाते. काहि जणाना तर पालक टाळावाच लागतो. असो, आवडत असेल तर ज्युस अवश्य प्यावा. पण तो फळे खाण्याला पर्याय नाही, हेच मला म्हणायचे होते.
|
Ninavi
| |
| Thursday, April 13, 2006 - 5:32 pm: |
| 
|
>>>>> चिकु, आंबा सारखी फळे मानवनिर्मीत असल्यामुळे म्हणजे?
|
Seema_
| |
| Thursday, April 13, 2006 - 6:34 pm: |
| 
|
बरोबर दिनेश . पण मी फ़ळांच juice शी comparision करत नाही आहे तर बाजारात जे तयार juice मिळतात त्यापेक्षा ह्यातला juice कधीही चांगला अस मला म्हणायच आहे . म्हणुणच मी म्हटल कि फ़ळ खाण कधीही चांगलच पण ..... सकाळी फिरायला जाताना जे ज्युस विकायला असतात व प्यायले जातात, त्यातहि मला जरा फ़ॅडच दिसते. नुसत्या गाजराचा रस पिऊन अनेकाना त्रास होवु शकतो. >>>>> हे मात्र मला पटल नाही दिनेश . पण इथे उगाच विषयांतर होईल . वेळ झाला कि आरोग्य मध्ये लिहिन ता . क . दिनेश माझी तुमच्याशी वाद घालण्याची योग्यता सुद्धा नाही . मी फ़क्त माझ मत सांगितल . रागावु नका 
|
अर्थात फ़ळे खाणे रसापेक्षा चांगले, पण फ़ळाचा रस केला तर त्यात फ़ळामधली Vitamins येतातच ना? fiber part नाही येणार खरय, पण फ़ळाचा रस = नुस्ती sugar एवढेच कसे काय? CBDG..
|
Nandita
| |
| Monday, April 17, 2006 - 4:00 am: |
| 
|
वा छान चर्चा होतेय, सगळ्यांना धन्यवाद दिनेश पराठ्याची कल्पना बरी आहे, गव्हाच्या त्रुणाचा रसाचा बराच फायदा होतो माझा अनुभव आहे
|
Tanya
| |
| Monday, April 17, 2006 - 4:43 am: |
| 
|
नंदिता.... jucer मधुन जो कोरडा चोथा बाहेर येतो, त्यात बहुता:शी बिया, फळांची सालेही असतात. त्यामुळे prady म्हणते त्याप्रमाणे चोथ्याचा उपयोग झाला तर जास्त चांगले.
|
दिनेश, आंब्यात fibre नाही असं का म्हणताय आंब्यातील गाठि व शिरांचे काय? मी तरी त्यातून fibre मिळते असे समजत होते. CBDG
|
Supriyaj
| |
| Monday, April 17, 2006 - 5:58 pm: |
| 
|
I just found this link. http://www.whfoods.com/genpage.php?tname=george&dbid=24
|
Karadkar
| |
| Monday, April 17, 2006 - 6:54 pm: |
| 
|
There is something called Masticating Juicers which juice like we chew our food. Best brands are Champion Juicer and Omega Juicer. Comparisons can be foundin the link below http://www.harvestessentials.com/whatjuicisri.html
|
Dineshvs
| |
| Tuesday, April 18, 2006 - 2:56 am: |
| 
|
सायली, आंब्याचे आपले देशी वाण आहेत त्यात भरपुर चोथा असतो, पण हापुसमधे तो नसतो. सीमा, नविन माहिती मिळाली तर मला हवीच आहे कि. तिथे योग्यतेचा कुठला सवाल आहे. आणि मी तरी अशी माहिती वाचुन वैगरेच मिळवतो. त्यामुळे अवश्य लिहा. पण तरिही, हे जे ज्युस विकायला असतात, ते कितपत हायजिनीक असतात याची मला शंकाच आहे. एकतर ज्या तर्हेने भाज्या पिकवल्या जातात व बाजारात आणल्या जातात, त्याकडे बघता कच्चे ज्युस मला तरी धोकादायक वाटतात. शिवाय गाजर शिजवुन त्यातले ब जीवनसत्व नष्ट होत नाही. पण कच्चा रस प्यायला तर पचायला जड जाते हे नक्की. आयुर्वेदात फ़ांट नावाचा एक प्रकार असतो, तोहि थंड पाण्यात केलेला काढाच असतो. म्हणजे ज्युसच म्हणा ना. गुळवेलीचे सत्वहि असेच काढतात. म्हणजे ज्युस हि संकल्पना आपल्याला नविन आहे, वा अमान्य आहे असे नाही, पण ज्या तर्हेने हे ज्युस काढुन ठेवलेले असतात, ते बघुन मला ते प्यावेसे वाटत नाहीत.
|
रस्त्यावर विकायला ठेवलेले even restaurent मधले juice. बनवणारे खरच हयजेनीक असतात का याबाद्दल वाद नाहि, ते ज्या पाध्दतीने काढतात, आणि त्यात जे पाणि वापरत्तात त्या मुळे ते पिउ नये... पण जुस सगळेच वाईट नसतात गाजराच्या रसाच्या treatment मुळे cancer बरा होतो असे सिध्द झालेय.. ईतरही बरेच रस उपयुक्त असतात. फ़ळे खाणे केव्हाहि चांगलेच पण कधीतरी आवड म्हनुन आणि मुले बाहेर कि.वा TV त पाहुन हट्ट धरतात तेव्हा घरचा जुस केव्हाहि चान्गला.
|
Manuswini
| |
| Saturday, April 05, 2008 - 10:53 pm: |
| 
|
मैत्रीयी आणि इतर, jack lalane juicer? madhye Cabbage,celery,spinach असा जुइcए निघतो का? आणखी कोणी अश्या भाज्यांचे juice काढले आहेत का? कृपया मला असा juicer कोणी सुचवेल का जो इथे US मध्ये मिळेल नी तो फळ्भाजी तसे greens जूस काढेल.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|