|
Dineshvs
| |
| Thursday, April 06, 2006 - 4:13 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
एक वाटी चण्याची डाळ, अर्धी वाटी ऊडदाची डाळ, दोन चमचे तुरीची डाळ व दोन चमचे तांदुळ. एक चमचा मिरीदाणे, मीठ, हिंग, एक वाटी सुक्या मिरच्याचे तुकडे हे सगळे थोड्या तेलात खमंग भाजुन घ्यायचे व भरड पुड करायची. आवडत असल्यास कडीपत्ता घालायचा. तोहि तळुन घ्यायचा. मिरच्या जास्त घेतल्या तरी चालतील. ईडली डोश्याबरोबर ही चटणी तेलात मिसळुन खायची. खोबर्याच्या चटण्या टिकत नाहीत, हि टिकते, त्यामुळे प्रवासात नेता येते. आवडत असेल तर खोबरेल तेलात हि मिसळावी.
|
Chinnu
| |
| Thursday, April 06, 2006 - 4:42 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेशदा, पुडी नाही हो पोडी ती! पोडी म्हणजे कोरडी पावडर.. Thanks for the recepie .
|
Chandrika
| |
| Thursday, April 06, 2006 - 6:08 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
hya 'podi' madhe thodese 'tiL' paN bhajun ghatale tar chhan khamang chav yete..
|
Moodi
| |
| Thursday, April 06, 2006 - 6:19 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश माझ्या शेजारच्या तामिळ काकुनी हीच चटणी करुन दिली हो परवा मला. छान लागते, फक्त मिरी अन तूर डाळ नाही घातली त्यात. बाकी सेम. हो तीळ घातलेत ग चंद्रिका यात. ![](/hitguj/clipart/happy.gif)
|
Junnu
| |
| Thursday, April 06, 2006 - 6:51 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मजा आहे तुझी मूडी. मला ही कुणीतरी करुन दिली तर पळेल. ![:-)](/hitguj/clipart/happy.gif)
|
Dineshvs
| |
| Friday, April 07, 2006 - 1:29 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मी तीळ घातले होते, पण ईथल्या हवेत ती लगेच खवट झाली, म्हणुन वगळले. पुडि / पोडि या उच्चाराची खात्री नाही, खरे तर तामिळ अक्षरांची ज्याम गडबड आहे. क आणि ग ला एकच अक्षर आहे. आणि प आणि ब ला पण त्यामुळे गोपालन चा उच्चार फ़क्त लिपी माहित असलेला, कोबालन म्हणुन पण करु शकेल.
|
Jayavi
| |
| Friday, April 07, 2006 - 7:24 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेशदा माझी मैत्रीण ह्यात चिंच आणि गूळ पण घालते. खूप छान चव लागते आंबट गोड.
|
Dineshvs
| |
| Friday, April 07, 2006 - 5:12 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
तुरडाळ आणि तांदळामुळे कुरकुरीतपणा येतो. अस्सल तामिळ घरातल्या ईडल्या मऊ असतात. त्याबरोबर हि चटणी जमुन जाते. गुळ घालुन बघितला पाहिजे. तामिळ लोक खुप आंबट खातात. खुप गोडहि खातात. पण आंबटगोड असे क्वचितच काहि असते त्यांच्याकडे.
|
Chinnu
| |
| Saturday, April 08, 2006 - 12:13 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश! तुम्हाला कितितरी गोष्टी तपशीलवार कशा हो लक्षात असतात! कोबालन
|
|
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|