|
Dineshvs
| |
| Saturday, April 01, 2006 - 2:38 pm: |
|
|
या चटणीचा महत्वाचा घटक म्हणजे सोलापुरची कोरडी थंड हवा. त्या हवेतच हि चटणी खुटखुटीत कोरडी राहते. पुण्या कोल्हापुरला पण राहिल. मुंबईत मात्र तिचे गोळे होतात. दाणे खमंग भाजुन सोलायचे. ( खमंग भाजल्यावर मी ते वर्तमानपत्राच्या घडीत ठेवतो, त्यामुळे दाण्याना वाफ धरत नाही. ) मग त्याची जाडसर पुड करायची. मिक्सरमधे केल्यास व्हीपर बटण वापरावे. दाणे जास्त फ़िरवले कि त्याला तेल सुटते. मग त्यात तिखट व मीठ घालुन परत घुसळावे. आवडत असेल तर भाजलेल्या जिर्याची पुड व साखर घालावी.
|
Anjali28
| |
| Tuesday, April 04, 2006 - 5:40 pm: |
|
|
सोलापूरची दाण्याची अस्सल चटणी: साहित्य: अर्धा किलो सोलापूरी दाणे (हे दाणे थोडे आकारने मोठे व जास्त लालसर असतात. यांना गावरान दाणे असेही म्हणतात. घुंगरु दाणे वापरले तर चव बदलते.) पाव वाटी सोललेला लसूण तिखट २ चमचे अथवा आवडीप्रमाणे. मीठ कृती: दाणे खमंग भाजून घेउन गोणपाटावर एक बेडशीट अंथरुन त्यावर पसरुन टाकावेत. गार झाल्यावर साले काढून पाखडून स्वच्छ करावेत. त्यात बाकी सर्व साहित्या मिसळून मिक्सर्मध्ये भरड वाटावे. खरेतर हि चटणी उखळात कांडून करतात. मिक्सरमध्ये बारिक केलेल्या चटणीला एवढी चव येत नाही. तसेच ही चटणी ताजीच चांगली लागते, त्यामुळे फार प्रमाणात करुन ठेवू नये. या व्यतिरिक्त दाणे मातिच्या मडक्यात मीठाच्या पाण्यात भिजवून ते मडके जमिनीत तीन ते पाच दिवस पूरतात. नंतर बाहेर काढुन वालवुन, भाज़ुन मग त्याचे चटणी करतात. ही चटणी मात्र खुप दिवस टिकते आणि अतिशय खमंग लागते. दिनेश, सोलापूरची हवा थंड नाहीये हो.. तुम्ही एप्रिल म्ध्ये सोलापूरला कधी गेला आहात का हो?
|
Dineshvs
| |
| Wednesday, April 05, 2006 - 1:38 am: |
|
|
आता कसला जातोय मी एप्रिलमधे सोलापुरला ? ऊखळ बिखळ आता बघायलाहि मिळणार नाही. तिथे कोणी गेलं कि मोठे पाकिट त्या चटणीचे आणायला सांगतो. पण मुंबईत ती टिकत नाही, हे खरं
|
खलबत्त्यत केलेल्या चटणी ची चव खरच खुप वेगळी आणि छान होते, मिरचिचा ठेचा सुध्द्दा कुटुन चान्गला होतो, mixer ची चव वेगळी लागते, मला इकडे सुध्दा खलबत्ता, मिळालाय..
|
Suparna
| |
| Thursday, November 22, 2007 - 3:20 pm: |
|
|
काल मैत्रीणीने डब्यात दाण्याची चटणी आणली होती. क्लास झाली होती. तिची आई माहेरची सोलापुरची आहे त्यामुळे असेल बहुतेक . दाणे सालासकट घेऊन त्यांना आधी म्हणे पाण्याचा हात फिरवावा. मग मंद गॅसवर भाजावे व भाजताना पुन्हा दाण्यांना तेल थोडे से सोडून भाजायचे. मिरची पूड गॅस ऑफ करून मग घालावी व कच्चा लसून मीठ घालून मिक्सर मधे रवेदार होईपर्यंत फिरवायचे. सालासकट घेतल्याने मस्त लाल भडक रंग आला होता.
|
Dineshvs
| |
| Thursday, November 22, 2007 - 5:08 pm: |
|
|
सुपरणा, या चटणीला खरी चव सोलापुरच्या हवेतच येते. तिथल्या पातळ भाकर्या आणि हि चटणी. तिकडे रस्तोरस्ती हि मिळते. पण तिथे खुटखुटित असणारी हि चटणी मुंबईच्या हवेत आली कि तिचे घट्ट गोळे होतात.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|