|
Bee
| |
| Friday, March 31, 2006 - 9:11 am: |
| 
|
गेल्या कित्येक दिवसांपासून मला माऊथ अल्सर झाला आहे आहे नि त्यातून सुटका होत नाही. फ़क्त वरण भात खाऊन मला विट आलाय. कुणी थोड्या चवदार कृती सांगू शकतील का जेणेजरून माझे तोंड जिभ झणझण करणार नाही. सध्या अशी अवस्था आहे की तोंडचे पाणी गिळायलाही त्रास होतो आहे. चावणे, बोलणे, तोंड हलवणे तर त्याहूनही कठीण जात आहे.
|
Dineshvs
| |
| Friday, March 31, 2006 - 1:40 pm: |
| 
|
गोड केळ्याचे शिकरण, नाचणीची लापशी,, साबुदाण्याची खीर, आईस क्रीम, फ़ालुदा खाता येईल. पण आधी माऊथ अल्सरवर औषध घे.
|
Moodi
| |
| Friday, March 31, 2006 - 1:44 pm: |
| 
|
दिनेश तो तेवढे सोडुन आपल्याला बाकी विचारतोय. त्याला औषध घ्यायला नका सांगु. त्या Health च्या बीबीवर वाचा या Mouth ulser बद्दल तो काय म्हणतो ते.
|
Nalini
| |
| Friday, March 31, 2006 - 2:04 pm: |
| 
|
बी, तुझ्याकडे तोंडली मिळतात का रे? मिळत असतील तर ती खा. म्हणजे मग बाकिचे लवकर खाता येईल.
|
Moodi
| |
| Friday, March 31, 2006 - 2:59 pm: |
| 
|
बी आता तू जाम रागवशील ना माझे वरचे वाक्य बघुन? मी सकाळी लिहीले पण ते परत खोडले, आता लिहीतेय ते मात्र खोडणार नाही. दिनेश आईस्क्रीम नको याला. बी वरण भात असो आमटी, त्यामध्ये तुप घालुन खा म्हणजे उष्णता कमी होईल तोंडातली. तुरीपेक्षा मुगाचे वरण, मुगाचीच उसळ किंवा खिचडी, पालकासारख्या पातळ भाज्या( मेथी नको) यांच्या फोडणीत मोहरी ऐवजी जीरे, चिमुटभर हिंग घाल. आले लसुण सध्या नकोच. टॉमेटो बीया काढुन आमटी, उसळीत वापर, आमसुले पण चालतील. ताकाची कढी मिर्ची न घालता घे, आले मात्र नखाच्या आकाराचे घाल तुकडे करुन म्हणजे काढता येतील. भाज्या आमटीत काळा मसाला वापर,गरम मसाला नको घालुस. निदान सध्या तरी. जमल्यास गुलकंद मिळाला तर खा. पोहे, ढोकळा सारखे पदार्थात मिर्ची न घालता चिमुटभर लाल तिखट घाल. अन पुढच्या महिन्यात भारतात गेल्यावर आधी पुणे, नागपूर किंवा अमरावतीला असलेल्या चांगल्या वैद्यांकडुन नीट तपासणी करुन घे. अकोल्याला जठार पेठेत डॉ. शुभांगी झोपे या चांगल्या वैद्य आहेत. त्यांचे बरेच चांगले लेख पण येतात आयुर्वेदावर पेपरमध्ये. डॉ. शुभांगी झोपे. धन्वंतरी पंचकर्म हॉस्पिटल, उमरी नाक्याजवळ, अकोला. नाहीतर दुसरे वैद्य बघ.
|
Arch
| |
| Friday, March 31, 2006 - 4:05 pm: |
| 
|
मूडी, तुझ icecream बाबतीत एकदम बरोबर आहे. एकदा मी घरी rose icecream केल आणि आम्ही सगळ्यांनी रोज सकाळ संध्याकाळ त्यावर ताव मारला. आम्हाला कोणालाच कधी अल्सर्सचा त्रास झाला नव्हता पण त्यावेळी सगळ्यांनाच mouth ulsers झाले. तेंव्हा कळल की गोड अती प्रमाणात खाल्यामुळे झाल असाव.
|
Moodi
| |
| Friday, March 31, 2006 - 4:33 pm: |
| 
|
आर्च अग बर्फ वरुन अन स्पर्शाला खुप थंड लागतो, पण तो तसा आतुन उष्णच असतो. त्याने त्याच मुळे घसा पण सुजु शकतो. धणे थंड आहेत, त्याने पोटातील उष्णता कमी होते पण हीच धण्याची डाळ जर चवीला चांगली लागते म्हनुन रोज खाल्ली तर तोंडात लगेच फोड येतात. मला माहीत नव्हते, मी ती सारखी खाल्ली एकदा, पण नंतर तोंडच सुजले आतुन. बी तू असे काही खाल्ले आहेस का रे? म्हणजे धण्याची खारी पिवळी डाळ बाहेर दुकानात मिळते ती?
|
Bee
| |
| Saturday, April 01, 2006 - 2:05 am: |
| 
|
नेमस्तक मला कसलेच पथ्य नाही हो, तुम्ही माझे पोष्ट इथे का हलविले. असो.. उत्तर मिळाली आहे ना मग पुरे. मूडी, मी पंधरा दिवस आज बरे होईल उद्या बरे होईल असे करीत वाट पाहिली. काल मात्र गोळ्या घेऊन आलो. पण त्या गोळ्या घेतल्या की डुलक्या येतात. आताही हे पोष्ट लिहिताना डुलक्या येत आहेत. असो. मूडी, मी रोज सकाळी एक ग्लास सोयाबिनचे दूध त्यानंतर दोन फ़ोडी पपयीच्या. नंतर एक कप चहा. नंतर दुपारी रात्रीचे उरलेले शिळेपाळे गरम करून खायचे. रात्री पोळी भाजी फ़ळ चटणी. फ़ोडणीत मेथी, मोहरी, जिरे, हिंग, लवंगी मिरची इतके साहित्य हमखास असते. पालेभाज्या मला इथे मिळत नाहीत. मी मूगाचीच खिचडी करतो. आमटीही मूगाचीच खात आहे. आज उसळ केली तीही मूगाचीच आहे. शुभांगी झोपेंचा पत्ता दिल्याबद्दल आभारी आहे. तुला सगळी गाव माहिती दिसतात. बरीच हिंडलीस फ़िरलीस का महाराष्ट्रात?
|
Karadkar
| |
| Saturday, April 01, 2006 - 5:24 am: |
| 
|
बी, तु पहिल्यांदा ती पपई बंद कर, पपई प्रचंड उष्ण असते. चहा बंद कर फोडणीतली मेथी बंद कर. दिवसतुन कमित कमी ३ लिटर पाणी तरी पी. रात्री झोपताना १ पेला पाणी घेउन त्यान धने आणि जिरे भिजत घाल ते पाणि उठल्या उठल्या पी. मग मिळला तर गुलकंद खा. बाकिचे जेवण नेहेमीसारखे कर. आंबा, पपई, अननस आजीबात खाउ नको.
|
Moodi
| |
| Saturday, April 01, 2006 - 1:02 pm: |
| 
|
बी कराडकरने अचुक सांगीतलय, आता तरी जरा ऐक आमचे.
|
Mahaguru
| |
| Saturday, April 01, 2006 - 5:08 pm: |
| 
|
बी, इथे वर सर्वांनी सांगितलेले योग्य आहेच. पण त्यांनी सर्वांनी त्यांच्या अनुभवावरुन तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वच जण डॉक्टर आहेत असे नाही. तेव्हा तुम्ही एखाद्या डॉक्टरला अगोदर दाखवा आणि त्याच्या सल्ल्या नुसार औषधपाणी घेत जा.
|
Dineshvs
| |
| Sunday, April 02, 2006 - 11:59 am: |
| 
|
महागुरु, मला हे अगदी पटलं. अश्विनी सोडल्यास कुणीच जाणकार नाही, आणि मूडि, मिनोतीचा अभ्यास आहे. पण अश्या समस्यांवर उत्तर ईथे देणे योग्य नाही. डॉक्टरानी काय खावे काय खाऊ नये ते सांगितले कि आम्ही कृती देऊच. पण वैद्यकिय ऊपचाराना पर्याय नाहीच. मागे एकदा दुबईत असताना, भाजल्यावर काय करावे यावर असाच एक घरगुति सल्ला देऊन, एका बाईने बक्षीस मिळवले होते, पण एका डॉक्टरने त्याला आक्षेप घेऊन, तो सल्ला कसा अयोग्य आहे ते लिहिले होते. आपल्याकडे असे होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.
|
Bee
| |
| Monday, April 03, 2006 - 11:25 am: |
| 
|
मला उपयोगच झालाय वरील सर्व पोष्टचा. घरघुती उपाय आपण आत्ताच नाही तर खूप प्राचीन काळापासून करत आलेलो आहोत. माझ्या आईनी मला ओले खोबरे चाव म्हणजे आग कमी होईल असे सुचविले. ताई म्हणाली नारळाचे पाणी पी म्हणजे उष्णता कमी होईल. कुणी म्हणाला B vitamins घे म्हणजे पुरेसे जीवनसत्व तुला मिळतील. ही सगळी कारणे, त्यावरचे उपाय हे बरोबर निघालेत. मी Doctor ना विचारले त्यावर त्यांनी बी जीवनसत्वाच्या अभावामुळे हे असे होते हे एक लक्षण सांगितले. मग त्यांना मी काय काय खातो हेही सांगितले. तो पोरसवदा हाडाचा मासाहारी वैद्य त्याला काही पदार्थांचे गुणधर्म लक्षात आलेले दिसले नाही. जसे की मेथी, पपयी, लवंगी मिरची, मिरी हे सगळे मी वापरतो जे की उष्ण जळजळ निर्माण करणारे आहेत. पपयीमुळे पचन सुधारते म्हणून मी रोज पपयी खाण्याचा उद्योग सुरू केला. लवंगी मिरची लागतेच, मिरी कधी चहाचा काढा केला तर लागतात. कदाचित ही देखील काही कारणे असतील ज्यामुळे अल्सर फ़ोफ़ावला असेल. पण आता Doctor कडे जावून आलो, medical मधून काही ointments आणलेत आपल्याच हिशोबाने. तेंव्हा अल्सर बाराच बरा कमी झाला आहे. तसे इथले प्रत्येक जण काहीही सांगितले तरी ज्याला त्याची गरज आहे त्याने पडताळून बघावे एकदम कुणाचे सल्ले अमलात आणू नये, ते गैर असतील असेही म्हणू नये इतकेच वाटते. धन्यवाद मंडळी!
|
Mahaguru
| |
| Monday, April 03, 2006 - 1:43 pm: |
| 
|
बी , तुझा अल्सर हा कमी होतोय हे चांगलेच झाले. मला उपयोगच झालाय वरील सर्व पोष्टचा. >> कसा ते सांगशील का? तुझ्या अनुभवांचा इतरांनाही फ़ायदा होवु दे. कदाचित ही देखील काही कारणे असतील ज्यामुळे अल्सर फ़ोफ़ावला असेल >> म्हणजे तुलाही नक्की माहिती नाही. फक्त ऐकीव माहीतीच्या आधारे तु उगीच अंदाज बांधुन मनाची समजुत करुन घेत आहेस. तो पोरसवदा हाडाचा मासाहारी वैद्य ... > तो पोरसवदा असला तरी त्याला तुझ्या पेक्षा त्या क्षेत्रातले knowledge /experience निश्चितच जास्त आहे. उगीच कुणाची विशेषतः डॉक्टरची कारण नसताना मापे काढणे ही आजकालची फॅशन असावी. medical मधून काही ointments आणलेत आपल्याच हिशोबाने. >> म्हणजे परत तो डॉक्टर वेडा (उगीच ८-१० वर्षे शिकत राहीला)...आणि तुच हुश्शार. ...आपल्या हिशेबाने कारभार करायला .. ते गैर असतील असेही म्हणू नये ...> मी गैर आहे असे कुठेही म्हणालेलो नाही , फक्त त्या क्षेत्रातील तज्ञ लोकांकडुन मार्गदर्शन घे असे सांगितले. वर जे सांगितलेले आहेत ते त्यांच्या अनुभव आणि त्यांना मिळालेली माहिती आहे. त्यातले सगळेच तुला लागु होइलच असे नाही आणि अर्धवट ज्ञानाच्या आधारावर स्वतःवर प्रयोग करु नयेत असे वाटते. याउपर तुझी मर्जी असो .. एक चांगुलकीच्या भावनेने तुला सल्ला दिला होता.
|
Dineshvs
| |
| Monday, April 03, 2006 - 4:05 pm: |
| 
|
Bee खुपदा ब जीवनसत्वाच्या अभावीच तोंड येणे वैगरे प्रकार होतात. म्हणुन वैद्यकीय ऊपचाराना पर्याय नाहीच. आता ते अलोपथिक घ्यायचे का आयुर्वेदिक हे ज्याने त्याने ठरवायचे. आणखी माझा अनुभव सांगु, आपल्याला काय लागु पडते, ते आपल्यालाच बरोबर कळते. त्यामुळे आधीचे अनुभव लक्षात ठेवायचे.
|
माउथ उल्सर वर सगळ्यात सोप्पा उपाय म्हणजे मोड आलेल्या उसळी मग ते मठ, मुग अथवा इतर कडधान्ये कच्ची खावित, मोउथ अल्सर चे मुख्य कारण vita B ची कमतरता! बीकासुल्स या सध्या tab जोडीला घेतल्या ना तर रात्रीतुन फ़रक पडतो. उसळी चा प्रयोग करुन बघ. जादु झाल्यासारखा परीणाम दिसतो. आणि जेवणात जर उसळींचे प्रमाण वाढवले ना तर कधीच माउथ अल्सर चा त्रास होणार नाही.
|
Bee
| |
| Tuesday, April 04, 2006 - 11:07 am: |
| 
|
मला खालील गोष्टींचा फ़ायदा झाला आहे - १. अल्सर होण्याची मुख्य कारणे कळली. २. अल्सर झाल्यानंतर काय खाऊ नये हे कळले. ३. अल्सरच्या वेदना सुसह्य करण्यासाठी घरगुती उपाय समजले. ४. अल्सर कमी करण्यासाठी ointments उपयोगी पडतात हे कळले. Ointments जर अल्सरवर उपाय म्हणून बनविले असेल तर ते विकत घ्यायला काय हरकत आहे. कित्येकदा खोकला, पाठदुखी, डोकेदुखी, मामूली ताप ह्यावर आपण मेडीकलमधून औषध आणती ती Dr. च्या सल्ल्यानुसार असतातच असे नाही. म्हणून मी माझ्या हिशोबानी बाटल्यांवरचे वाचुन एक ointment विकत आणले. Doctor चे उपाय जर गुण आणत नसतील तर कुणीही नावे ठेवतील ना त्यांना. आपण म्हणत नाही का अमका डाॅटर चांगला आहे. ह्याचाच अर्थ असा होता की इतर कुणीतरी चांगला नाही. हुश्श!
|
Mahaguru
| |
| Tuesday, April 04, 2006 - 1:31 pm: |
| 
|
ठीकेना भो ... माझ्याशी कशाला वाद घालत बसतोस ... तुला काय करायचय ते कर ...अगदी म्ह.शे. सुध्दा कुणी सांगितले तर ते सुध्दा खा डॉक्टर मुर्ख तर मुर्ख ... उद्या अगदी तुला वाटले तर दवाखान्यात न जाता 'I need Help' नावाचा BB काढुन बस. सगळे जण तुला प्रेमाने नेहमी सारखी मदत करतीलच.
|
Dineshvs
| |
| Tuesday, April 04, 2006 - 3:58 pm: |
| 
|
Bee मी काहि महागुरु सारखा रागावणार नाही, पण OTC म्हणजेच ओव्हर द काऊंटर अशी औषधे वेगळी असतात. त्या बद्दल दुकानदाराला माहिती विचारायलाच हवी. आणि त्यानेहि ती द्यायला पाहिजे. जी औषधे प्रिस्क्रिपशन शिवाय विकु नयेत, अशीहि औषधे सहज ऊपलब्ध असतात. आणि खुपदा ऑईनमेंट मधे स्टेरॉईड्स असतात. त्यापैकी काहि एखाद्याला अपायकारक असु शकतात. काहिंचे परिणाम काहि काळानंतरहि जाणवु शकतात. चेहर्यावरच्या मुरुमांसाठी ट्रीटमेंट घेतल्यानंतर हाडे ईतकी ठिसुळ झाली, कि पुढे लग्नहि करु शकली नाही, अशी एक केस मला माहित आहे.
|
Mahaguru
| |
| Tuesday, April 04, 2006 - 5:08 pm: |
| 
|
दिनेश - पुर्ण सहमत ! माझ्या मित्राचा पण असाच किस्सा आहे आणि म्हणुन मी त्याला सल्ला देत होतो. माझ्या मित्राने कुणाचे तरी ऐकुन/ वाचुन , डोळे चांगले होण्यासाठी डोळ्यात मध घातले. नंतर त्याचे डोळे लाल व्ह्यायला लागले आणि चुरचुरायला लागले. म्हणुन डॉक्टरला मुर्ख ठरवुन दुकानातुन (आपल्या हिशेबाने) कसलेसे ड्रॉप्स आणले. त्याने त्याचे डोळे जवळ्पास कामातुन गेले आहेत. ऐकेकाळी त्याला चांगले दिसत होते आता मोठे ढापण लावुन फ़िरतो आणि कदाचित ऑपरेशन पण करावे लागेल. BB चा विषय 'पथ्थ' आहे. पथ्थ हे तज्ञांच्या/ जाणकाराच्या सल्ल्यानुसार हवे, असे माझे मत आहे. पटेल तितके घे अथवा सोडुन दे.
|
Bee
| |
| Wednesday, April 05, 2006 - 1:41 am: |
| 
|
महागुरु, तुम्ही उगाच राईचा पहाड करत अहात. मी कुठे हो तुम्हाला रागवलोय आणि तुम्ही मला रागवत आहात किंवा डोस पाजता आहात असे मला मुळीच वाटले नाही. उलट तुम्ही माझे शुभचिंतक आहात हेच मला जाणवलय. मी वाद वैगरे नाही घालत आहे. तसा जर माझा टोन वाटत असेल तर क्षमस्व. पण मनातून हे कायमचे काढून टाका की मी वाद घालतोय. Doctor पुढे मी मोठा असाही माझा स्वर नाही. मला वाटतय आपल्या दोघांना एकमेकांच्या पोष्ट वाचायची सवय नाही म्हणून असे होत असावे. बरे मी आता इथेच थांबतो म्हणजे बीबीचा हेतू ढासळणार नाही. दिनेश, धन्यवाद माहितीबद्दल.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|