|
Moodi
| |
| Tuesday, March 28, 2006 - 2:36 pm: |
| 
|
मोडाच्या मेथीचा पुलाव. साहित्य : दीड वाटी तांदुळ, तीन चतुर्थांश वाटी मोड आणलेल्या मेथीच्या बीया, २ मोठे कांदे, ३ ते ४ लवंगा, छोटा दालचिनी तुकडा, २ ते ३ वेलदोडे, 1/4 टीस्पुन जायफळ पुड(ऐच्छीक), दीड वाटी नारळाचे दुध / रस, २ टेस्पुन मीठ, तुप. कृती : तांदुळ धुवुन घ्या. पातेल्यात किंवा कढईत तुप तापवुन त्यात लवंगा टाकुन कांदा घालुन परता. कांदा गुलाबीसर झाला की त्यात तांदुळ अन मेथ्या घालुन परता. तांदळाचा रंग बदलला की त्यात वेलदोडे + दालचिनी हे एकत्र पुड करुन जायफळ पुडी बरोबर घालावे. यांच्या तयार पुड असल्यास चांगले. मीठ पण घालावे. दीड वाटी गरम पाणी घालावे व भात शिजु द्यावा. भात शिजण्याच्या बेतात आला की मग त्यात नारळाचा रस / दुध घालावे व मंद आंचेवर पुलाव शिजवावा. भरपूर कांदा अन नारळाच्या दुधा मुळे मेथ्यांची कडवट चव जाते. तरीही नमुना म्हणुन थोडे मेथी दाणे मोड काढुन खाऊन बघावेत. ते आवडले की हा पुलाव करावा.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|