|
Dineshvs
| |
| Monday, February 27, 2006 - 4:59 pm: |
|
|
यावर्षी भारतात टोमॅटोचे वेडे पिक आलेय बहुदा. टोमॅटो सुकवुन साठवता येतात. त्यासाठी लाल दळदार घट्ट टोमॅटो बघुन घ्यावेत. आणताना पिवळे आणले तर दोन चार दिवसात घरी पिकतात. मग त्याच्या एक सेमी जाडीच्या चकत्या कराव्यात. बिया काढुन टाकाव्यात. त्याना एक किलो टोमॅटोला एक चहाचा चमचा या प्रमाणात मीठ लावावे. ताटात पसरुन ताट तिरके करुन जरा पाणी निथळु द्यावे. मग एका जाड दोर्यात त्या चकत्या ओवुन घ्याव्यात. हा दोरा ऊन्हात व वार्यावर पाच सहा दिवस ठेवावा. अगदी कडकडीत झाल्या कि मिक्सरमधुन फ़िरवुन फ़्लेक्स करावेत. दोन टोमेटोच्या जागी एक चमचा फ़्लेक्स वापरता येतात. परतत बसायचे श्रम वाचतात. ऊनच पाहिजे असे नाही, वारे वहात असतील तरी ते वाळतात. ओव्हन वापरत असाल तर जेवण झाल्यावर या चकत्या बंद ओव्हनमधे ठेवुन द्याव्यात. लवकर वाळतील. पित्झा, पिकल, सालसा अश्या अनेक पदार्थात हे सन ड्राईड टोमॅटो वापरता येतात.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|