|
Dineshvs
| |
| Friday, December 02, 2005 - 1:35 am: |
|
|
आपले मरठी पोह्याचे पापड देशाबाहेर कुठे बघितले नाहीत. ऊडदाच्या पापडापेक्षा करायला हे सोपे आहेत. हे पापड म्हणजे कोकणची खासियत. एक किलो भाजके पोहे घेऊन ते कुरकुरीत होईपर्यंत भाजुन घ्यावेत. मग दळुन त्याचे पीठ करावे. मिक्सरवर सहज होते. फ़ार बारिक दळायची गरज नाही. मग सर्व पिठात चवीप्रमाणे मीठ, तिखट, ३० ग्रॅम पापडखर व २५ ग्रॅम हिंग घालावा. या पिठापैकी जवळ जवळ अर्धे पीठ लाटताना लावावे लागते. एका खोलगट भांड्यात एक कप ऊकळते पाणी घ्यावे. त्यात एक चमचा तेल घ्यावे. मग त्यात एक कप वर तयार केलेले पीठ घालावे. नीट मिसळुन कुटुन घ्यावे. कुटण्यासाठी बत्ता नसेल तर जड बाटली किंवा जाड लाटणे वापरता येते. मग पीठ लावुन त्याचे पापड लाटावेत. तयार मिळणारे पापड फ़ार पातळ असतात. घरी तेवढे पातळ लाटले नाहीत तरि चालतील. या पीठाचे पापड लाटुन झाले कि आणखी पीठ भिजवावे. सगळे एकदम भिजवले तर त्याला विरी जाते व पापड लाटता येत नाहीत. हा पापड तळुन छान हलका होतो. ऊडद्याच्या पापडासारखा चिकट व जड होत नाही. मी तर न तळताहि खातो. ऊरलेल्या कोरड्या पीठाचे तेल किंवा दहि घालुन डांगर करता येते. या पापडाचे चौकोनी तुकडे करुन तळले कि त्याला मिरगुंड म्हणतात.
|
Savani
| |
| Wednesday, March 29, 2006 - 4:04 pm: |
|
|
दिनेश, मला पण पोह्याचे पापड फ़ार आवडतात. आणि तुम्ही दिलेली रेसिपी बघून असं वाटतयं की घरी करता येतील. मला फ़क्त प्रश्न होता तो म्हण्जे इथे यु. एस. मध्ये भाजके पोहे मिळणे जरा अवघड वाटते, निदान मी जिथे रहाते तिथे तर मी कधीच पाहिले नाहीत. तर त्याला दुसरा पर्याय आहे का काही? साधे नेहमीचे पोहे वापरले तर चालतील का?
|
Savani
| |
| Wednesday, March 29, 2006 - 4:11 pm: |
|
|
अजून एक प्रश्न, हे पापड उन्हात वाळवावे लागतात का? की घरात चालतात.
|
Savani
| |
| Wednesday, March 29, 2006 - 4:11 pm: |
|
|
अजून एक प्रश्न, हे पापड उन्हात वाळवावे लागतात का? की घरात चालतात.
|
Pinkikavi
| |
| Wednesday, March 29, 2006 - 8:14 pm: |
|
|
दिनेशदा,माझा पण एक प्रश्न.... अगदी बेसिक आहे..... भाजके पोहे म्हणजे आपले कांदेपोह्यांसाठी वापरतो तेच ना? मलाही पोह्यांचे पापड फ़ार आवडतात पण करण्याआधी खात्री केली बरी म्हणुन विचारले...... thanks in advance ...
|
Junnu
| |
| Wednesday, March 29, 2006 - 8:25 pm: |
|
|
अग भाजके पोहे म्हणजे नशिकच्या चिवड्यासाठी वापरतो ते.
|
Pinkikavi
| |
| Wednesday, March 29, 2006 - 10:16 pm: |
|
|
मग सावनिच्या सगळ्या प्रश्नांना माझी रीऽऽ
|
Dineshvs
| |
| Saturday, April 01, 2006 - 2:28 pm: |
|
|
आपले कांद्या पोह्याचे पोहे चालतात, पण जाड भाजके पोहे वेगळे मिळतात. ते जरा भट्टीत फ़ुलवलेले असतात. साधे पोहे घरीच भाजले तरी चालतील. हे कुरकुरीत भाजले कि पीठ चांगले होते. हे पापड खुप पातळ लाटले तर घरी पंख्याखाली वाळतात. कधी कधी पोहे जुने असले तर पापड नीट लाटता येत नाहीत. त्यासाठी पोह्याबरोबर पावपटीने साबुदाण्याचे पीठ घ्यावे. साबुदाणे कोरडे भाजुन त्याचे पीठ करावे. हे पापड छान होतात. पावाचा चुरा मिसळला तरी चालेल. हा पण पाव पटीत मिसळायचा. पण हे पापड हलके होत नाहीत.
|
Savani
| |
| Tuesday, April 04, 2006 - 3:58 pm: |
|
|
दिनेशदा, धन्यवाद. मी विचार करतीये की पुढच्या w/e ला करून बघावे थोडे पापड. काही special टीप्स असतील तर जरूर द्या.
|
Dineshvs
| |
| Wednesday, April 05, 2006 - 3:53 pm: |
|
|
पोहे घरी भाजायचे असतील तर भाजल्यावर पेपर वर काढुन ठेवायचे. तो पोहा दोन बोटाने सहज कुस्करला जावा, ईतपत भाजलेला असावा. जर सगळे पापड एकावेळी नाही जमले तर कोरडे पीठ ठेवुन द्यावे. कधीही पापड करता येतात. पहिल्यांदा लाटताना जर विरी गेली, म्हणजेच पापडाचे तुकडे पडायला लागले तर साबुदाणा अवश्य घालावा. जर त्याचे पीठ करायला वेळ नसेल तर पापडाचे पीठ भिजवण्यासाठी जे पाणी ऊकळायचे, त्यातच चमचाभर भिजवलेला साबुदाणा घालायचा. शिवाय कोरडे पीठ चांगले तिखट लागेल ईतपत लाल तिखट घालायचे, कारण तळल्यावर ते पापड जरा फिके होतात. या कोरड्या पिठाचे दहि वा तेल घालुन डांगर करता येते.
|
Moodi
| |
| Sunday, July 09, 2006 - 1:52 pm: |
|
|
दिनेश खानदेशातील बिबड्या हा पापडांचा प्रकार खाल्लात का कधी? तोंडात टाकताक्षणी विरघळतो, अप्रतीम चव अन खुसखुशीत लागतो. हे बघा त्याचे वर्णन. खानदेशातील लेवापाटलांच्या घरचा हा खास आवडता पापड. http://www.saamana.com/2006/july/08/Link/fulora3.htm
|
Dineshvs
| |
| Sunday, July 09, 2006 - 5:31 pm: |
|
|
छान आहे प्रकार. नाचणीची शेव मी पण करतो. पापड लाटण्यापेक्षा ते सोपे जाते. गिरुच्या आईने बांधुन दिले होते नागलीचे पापड मला. त्यांच्याकडे भाकर्या नाही खात नागलीच्या, पण पापड खातात. मी तळण हा प्रकारच सोडुन दिल्याने, मी ते पापड भाजुन आणि कच्चेच खाऊन संपवले.
|
Savani
| |
| Sunday, July 09, 2006 - 9:21 pm: |
|
|
अहाहा! बिरड्या. तोंडाला पाणी सुटलं. आहेत घरात थोड्या. आज सन्ध्याकाळी तळल्याच पाहिजेत. ज्वारीच्या बिरड्या जेव्हा करतात तेव्हा त्याचा चीक सुद्धा छान लागतो. बिरड्या तळायच्या नसतील तर भाजून सुद्धा मस्त लागतात.
|
Nalini
| |
| Thursday, July 13, 2006 - 12:01 pm: |
|
|
तळण हा प्रकारच सोडुन दिला आहेस म्हटल्यावर आम्हाला कसे तळलेले खायला मिळणार?
|
Dineshvs
| |
| Thursday, July 13, 2006 - 12:52 pm: |
|
|
माहेरवाशीण गौर आली कि तिचे सगळे लाड करायचे असतात बरं. चुका चाकवताच्या भाजीपासुन कढी वडी पर्यंत.
|
Are wa..me shodhat hote ani ethe milale..Dinesh me anlele pohe jad ahet..mhanje Tandulahun todech chapte..tyache papad hotil na...pls mala sanga mhanje udya parvach karta yetil...
|
Miseeka
| |
| Friday, July 14, 2006 - 8:39 pm: |
|
|
Dinesh,Vikatchya Poha Papdala Lal rang aasto tasa ghari kelelya papdala yeto ka? ki viktcya poha papdat lal rang mix kelela aasto.
|
Dhanashri
| |
| Thursday, March 08, 2007 - 8:52 am: |
|
|
BaTaaTyaache pres paapad अर्धा कीलो साबुदाणा - आदल्या दिवशी सकाळी साबुदाण भिजत घालावा. रात्री एक वाटीला तीन वाट्या पानी या प्रमाणात उकळलेले पाणी घालावे. ईतर साहित्य: वाटलेली हिरवी मिरची,मीठ,जीरे पावडर - दुसरया दिवशी सकाळी साबुदाणा,उकडलेल्या बटट्याचा खीस,हिरवी मिरची,जीरे पावडर एकत्र करुन पुरण यंत्रातुन काढावे.मिक्सर मधुन काढल्यास चिकट होते. - आता जमिनीवर प्लास्टिकचा कागद पसरावा.वरील मिश्रणाचा लिम्बा एवढा गोळा घेऊन अंगठ्याने हलक्या हाताने दाब देऊन पसरवा. साधारण पापदएवढा. जास्त पातळ करु नये. नाहितर पापड तळल्यावर करपतो. हे लगेच कडक उन्हात वाळवावेत.
|
Dineshvs
| |
| Thursday, March 08, 2007 - 4:54 pm: |
|
|
मीसिका, बरेच दिवस उत्तर द्यायचे राहुन गेले. काश्मिरी मिरचीचे तिखट वापरले कि येतो तसा रंग. पोह्याच्या पापडाच्या पिठात, आपल्याला वाटते त्यापेक्षा जास्त तिखट घालावे लागते. कारण तळल्यावर तिखटपणा थोडा कमी होतो. सगळ्याच पिठात, म्हणजे लाटताना जे पिठ वरुन घेतो, त्यातहि तिखट मीठ घालावे लागते. पोह्याच्या पापडासाठी जर नऊ पेले पिठ असेल तर त्यातले चार पेले पिठ वरुन लावण्यासाठी बाजुला ठेवावे लागते. धनश्री, छान आहे कृति.
|
धन्यवाद दिनेश जी तुम्ही इथे खूप छान रेसिपीस लिहिता.मी नेहमी वाचते पोस्ट
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|