|
Lopamudraa
| |
| Thursday, February 22, 2007 - 12:09 pm: |
|
|
हातशेवया मिळतात. पण त्या तश्या पाटावर करत असतील का, याची मला शंका आहे. >>>दिनेश्दा पाटाच्या शेवया आणि हात शेवया हे दोन वगवेगळे प्रकार आहेत. आता नलिनि म्हणते तसे पाटावर न करता बायका मशिन वर करतात. (हा जाड शेवयांचा प्रकार असतो) बारिक हव्या असतील तर फ़क्त हातांनी करतात. आई अजुनही हातानी करुन्च पाठवते मला. मशिन वर कदाचित तितक्या बारिक येतात की नाही महित नाही. पाटावर शेवया करणारी शेवयीचे दोन धागे पाटाच्या बजुन खालि येतात ते तोडुन पटापट समोर पांढरे कापड टाकलेल्या खाटेवर टाकले जाताए. उन्हाळ्यात खान्देशात हेद्रुष्य अजुनही बघायला मिळते. श्य्मालि ने सांगितल्या प्र्माणे कुरडयी चा गहु वेगळा असतो तर शेवयीचा गहु वेगळा असतो. पोळ्यांच्या पिठाचा गहु वेगळा असतो, आता नाव आठवत नाही.
|
Dineshvs
| |
| Thursday, February 22, 2007 - 12:23 pm: |
|
|
लोपा, मी पाटाच्याच शेवया म्हणत होतो. पण आमच्याकडे एकाच बाजुने शेवई वळत असत. दोन्ही बाजुने म्हणजे फारच कौशल्याचे काम कि. आता आमच्याहि घरी बाजारात मिळणार्या बारिक सुतासारख्या शेवयाच वापरतात. मुंबईत त्या भाजलेल्याहि मिळतात, त्यामुळे फार वेळ परतावे लागत नाही. ( आजच दुपारी खीर खाल्ली मी. ) माझ्याकडे एक पास्ता मशीन होते. त्यात दोन रोलमधे अगदी पातळ अशी लांब पोळी लाटुन यायची. मग नागमोडी रोल च्या मधे घालुन, हव्या त्या जाडीचा पास्ता तयार करता यायचा. हौसेने थोडे दिवस वापरले. पण खुप जड असल्याने, भारतात आणता आले नाही.
|
Bee
| |
| Wednesday, June 20, 2007 - 8:13 am: |
|
|
सरगुंड नावाचा एक प्रकार असतो. तो मैद्यापासूनच बनवलेला असतो. विदर्भात हा प्रकार मी पाहिला आहे. सरगुंड गव्हाच्या वाळलेल्या धांड्यांवर केला जातो. म्हणजे ती जी चोपडी काडी असते ना गव्हाची ती घ्यायची तिच्यावर मैद्याचा छोटा गोळा फ़िरवत जायचा. ह्याचा आकार chromosomes ची जी शिडी असते ना चक्रीकार तसा दिसतो. मग दुधात ह्याची खीर करतात.
|
मगी व हक्का न्यूडल्स सुद्दा मैद्याच्याच असतात का त्या कश्या करतात
|
maggi/hakka noodles मैदयाच्याऐवजी कणकेच्या करता येतील? कश्या?
|
Dineshvs
| |
| Saturday, September 01, 2007 - 6:21 am: |
|
|
मॅगी किंवा तत्सम नुडल्स बनवण्यासाठी मैदा, मीठ व पाणी यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करतात. जर अंडे घालायचे असेल तर तेही यावेळी घालतात. टिकवण्याच्या दृष्टीने यात काहि तर घटक व गोंद घातला जातो. मग मळुन मशीनवर त्याची सारख्या आकाराची पट्टी लाटली जाते. पुढे त्याचे जरुरीप्रमाणे लांब तुकडे करुन वाळवले जातात. हक्का नुडल्स ज्या रिबीनीप्रमाणे चपट वा चौकोनी असतात, त्यांची प्रोसेस इथे संपते. मॅगी सारख्या इंस्टंट नुडल्स या तळल्या जातात. मैद्याबद्दल बराच बोलबाला झाल्याने, आता या नुडल्स आट्याच्या व तांदळाच्याही मिळतात. त्या इतक्या चिवट नसतात.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|