Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
बटाट्याचा कीस

Hitguj » Cuisine and Recipies » विविधा » वाळवण, साठवण आणि आठवण » वाळवण » बटाट्याचा कीस « Previous Next »

Dineshvs
Sunday, November 20, 2005 - 5:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बटाट्याचा किस.

पुर्वी बटाट्याचा किस बाहेरुन विकत आणायची पद्धत नव्हतीच. आणि त्या मानाने करायला सोपा असा प्रकार आहे हा.
यासाठी रात्री बटाटे अर्धे कच्चे ऊकडुन घ्यायचे. सकाळी ते सोलुन घ्यायचे. अर्धवट ऊकडले असल्याने, सोलायला जरा त्रासच होतो.
मग किसणीवर एकाच दिशेने ओढत लांब लांब किस घालायचा. हा किस खडखडीत वाळला कि डब्यात भरुन ठेयाचाचा. ऊपासाच्या दिवशी हा तळुन त्यात मीठ, लाल तिखट आणि तळलेले शेंगन्दाणे घालुन खायचे. हौशी बायका त्यात साबुदाणा आणि खोबरे पण घालत. हा साबुदाणा पण तयार करुन घ्यावा लागे.
त्यासाठी साबुदाणा खिचडीला भिजवतो तसा भिजवुन घ्यायचा. मग सकाळी तो ताटात पातळ पसरुन कुकरमधे वाफ़वुन घ्यायचा. असा वाफ़वला कि तो घट्ट वडीसारखा होतो. मग तो लगदा थंड पाण्यात घालायचा. थोड्या वेळाने हलवले कि साबुदाणा मोकळा होतो. तो मग निथळुन पसरुन वाळवायचा. याच साबुदाण्याचा चिवडा, बुंदीचे लाडु वैगरे करता येतात. वापरण्यापुर्वी तळुन घ्यायचा.
बटाट्याचा किस करायची मग सोपी रित आली. (ऊकडलेले बटाटे किसता किसता फ़ार चिकट होत असत.) त्यासाठी रात्रीच कच्चे बटाटे पाण्यात किसुन घ्यायचे. रात्रभर तो किस पाण्यातच ठेवायचा. सकाळी ढवळुन धुवुन घ्यायचा. तवकील हवे असेल तर पाणी गाळुन स्थिर ठेवायचे.

मग मोठ्या पाण्यात पाणी ऊकळुन त्यात मीठ व तुरटी टाकायची. चाळणीत हा किस घालुन ती चाळणी ऊकळत्या पाण्यात थोडा वेळ धरायची. किस पुर्ण शिजण्या आधीच तो बाहेर काढुन वाळवायचा. हा किस हलका व शुभ्र होतो.
याच प्रकारे वेफ़र्स करतात. तसेच जाळीचे वेफ़र्स पण करतात. पन्हळीसारखा पत्रा असलेली एक किसणी असायची. त्यावर बटाटा एकदा ऊभा आणि एकदा आडवा फ़िरवला कि असे जाळीदार वेफ़र्स तयार व्हायचे.
हा किस पण कच्चा खायला छान लागतो.

हा किस आयत्यावेळी थोडावेळ पाण्यात भिजवला तर त्याचा ऊपासाचा ओला किस करता येतो. तसेच मीठ वापरले नसेल तर या किसाचे पीठ करुन बटाट्याचा शिरा करता येतो.


Anuli
Monday, November 21, 2005 - 12:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

majhi batatyacha kees karaychi padhat..hya padhtine agdi mokla ani halka kees hoto. Kees karaycha asel tyachya adlya divashi ratree batatyanchi sale kadhun ghyaychi. meeth chavipramane ghalun pani uklat thevayche. changli ukali ali ki tyat batate takayche ani jhakan thevayche. ani 5-7 min ni gas band karaycha. ani batate ratrabhar tasech thevayche. dusrya divashi plastic chya kagdavar kisnine ekach bajune kees ghalat jaycha. mhanje mokla hoto. ani khadkhadit un dakhvayche. vatlyas 2 divas unhat thevava. hya padhtine kelela kees atishay mokla, shubhra ani mukhya mhanje tyala chan meethachi chav lagte.
jar pani uklavat thevaychya adhi turti firvaychi asel tar thodishi kalji ghyavi. karan jar turti jasta jhali tar kees talalyanantar to lalsar hoto. mhanun turti kami firvavi.

Kahikhas
Tuesday, November 07, 2006 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थोडी मदत हवी आहे. मी केलेला बटाट्याचा कीस तळल्यानंतर काळा पडतो. मुळिच फुलत नाही. मी दिनेशदांनी लिहीलेल्या पहिल्या पद्धतीने कीस केला आहे.

Dineshvs
Tuesday, November 07, 2006 - 4:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काहिखास, काहि खास कारण नसावे ? हा हा हा !!!

Bee
Wednesday, November 08, 2006 - 2:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बटाट्याचा किस आधी पाण्यात भिजवून ठेवावा लागतो. मग तो किस उपसून त्यातील पाणी निथळून किस थोडा तळण्या इतपत कोरडा आणि सुटा झाली की मग तो तळावा. किंवा किस कोमट पाण्यात घालून त्यात तुरटी घालावी. अगदी पांढरा शुभ्र किस तळल्या जातो. चिप्स करताना देखील बटाट्याच्या चकत्या गरम पाण्यात तुरटी घालून थोडा वेळ त्या उकळाव्या.

Savani
Wednesday, November 08, 2006 - 1:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काहीखास,
जर तुरटीचं प्रमाण जास्त झालं तर तळल्यानंतर कीस काळा पडतो. तुरटी नुसती एकदा पाण्यातून फ़िरवावी. न फ़ुलण्याचं कारण म्हण्जे कदाचित कमी ऊन दाखवलं गेलय का?
कडक उन्हात कीस वाळवायला लागतो. दमट हवा नको.


Meggi
Wednesday, November 08, 2006 - 2:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काहीखास, बटाट्याचा किस एका उन्हात वाळला पाहिजे. म्हणजे काळा पडत नाही. वाळवताना जवळ जवळ न घालाता सुटा घालावा म्हणजे नीट वाळतो.

Chakali
Wednesday, September 05, 2007 - 2:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थोडीशीच वेगळी क्रुती, पण असा चिवडा खुप मस्त प्रकार आहे उपसा साठी.


http://chakali.blogspot.com/2007/09/batata-chiwada.html

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators