Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
सालपापड्या

Hitguj » Cuisine and Recipies » विविधा » वाळवण, साठवण आणि आठवण » वाळवण » सालपापड्या « Previous Next »

Karadkar
Friday, November 18, 2005 - 7:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी एक आजी (वडीलांची काकु) सालपापड्या एकदम सुंदर करायची. कोल्हापुरला घरात कट्टा होता आणि तिला गावाकडे खाली बसुन काम करायची सवय आणि उंcई कमी त्यामुळे मग ती सरळ कट्ट्यावर चढुन बसे.

आदल्यादिवशीची तयारी मलाएवढी आथवत नाही पण तांदुळ भिजत घातलेले आठवतात. त्यावर ती रगड्यावर बसुन मस्त पैकी ते वाटायची. त्यावेली माझी आजी( वडिलांची आई) तिला मदत करायची. आमचा रगडा एकदम powerful आहे.

ते झाले कि मग त्यादिवसाcए काम संपले. मग खसखस निवडणे, मोठ्या सुया ठेवणीतुन काढुन त्या धुवुन ठेवणे, मोठ्या स्टील च्या ताटल्या धुवुन ठेवणे, मोठे पातेले (ज्यात पाणी तापवुन सालपापड्या वाफवल्या जात), सुती साडी, हे सगळे गोळा करुन धुवुन ठेवणे. मग मेणकापड पण स्वcछ धुवुन ठेवले जाई.

मग दुसरेदिवशी सकाळी आजी अंघोळ करुन लवकर सालपापड्या करयला घ्यायची. स्टीलच्या ताटली मधे एक चमचाभर पिठ घालुन मग ती गोलगोल फिरवुन मग त्यात चिमुटभर खस्खस घातली जाई. मग ते दोन्ही बाजुने वाफ़वुन घेतले जाई. आणि मग माझी पिटळणी ते वाळावत घालण्या साठी होई. ते काम खरे तर माझी आजी करी पण मग मला त्या सालपापड्या खायला प्रचंड आवडत. वालवत टाकताना मग एखादी मटकावली जात असे. मग दुपारी दोनई आज्या मिळुन त्या अर्ढ्या वाळलेल्या साल्पापड्या दुमडत कारण त्या साठवायला सोप्या पडत. मग परत मी तिथे पण लुदबुड करत असे. करण मग त्यावेळी पण खायला मिळे.

ह्या सगळ्या आठवणी मी ५ वर्षाची असतानाच्या आहेत.



Dineshvs
Saturday, November 19, 2005 - 3:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सालपापड्या करताना पण गव्हाप्रमाणेच तांदुळ तीन दिवस भिजत घालायचे असतात. रोज पाणी बदलायचे. तिसर्‍या दिवशी बारिक वाटायचे. मिक्सरवर तितके बारिक वाटले जात नाही. म्हणुन घोळ गाळुन घेतला तर बरा.
स्टीलच्या थाळ्याच याला वापरत. फ़णसाची पाने पण गोल कापुन घेतली तर चालतात. तेलाचा पुसट हात लावुन पीठ पातळ पसरायचे. खसखस किंवा भिजवलेला साबुदाणा पण घातला तरि चालतो. मग मोठ्या भांड्याला कापडाचा दादरा बांधुन त्यात पाणी ऊकळायचे त्यावर आधी या ताटल्या सुलट्या आणि मग ऊलट्या ठेवायच्या. पारदर्शक झाल्या कि सोडवायच्या. आणि वाळत घालायच्या. या जितक्या पातळ कराव्यात तितके कौशल्याचे काम समजावे.
या पण ओल्या खायला छान लागतात. त्यावर कच्चे तेल आणि लाल तिखट घालुन खायच्या.

नेमस्तक. या बीबीचे नाव वाळवण आणि साठवण असे ठेवायला हवे. करणार का तेवढं म्हणजे आणखी बरेच पदार्थ लिहिता येतील.


हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators