|
Moodi
| |
| Monday, November 28, 2005 - 10:00 am: |
| 
|
हे कुठे लिहावे हे न कळल्याने इथेच लिहित आहे. आता थंडीमध्ये भारतात सर्वत्र आवळे भरपुर आलेत. याचे सोन्यासारखे गुणधर्म सर्वाना माहित असल्याने ते वेगळे सांगायची गरज नाही. खाली २ कृती देत आहे त्याप्रमाणे ते टिकवुन ठेवावे. कृती १ : आपल्याला पाहिजे तेवढे आवळे अन त्याच्या १/४ आले चांगले धुवुन नीट कोरडे करुन घ्यावे. ( म्हणजे पावशेर आवळ्याला तळहाताएवढे आले पाहिजे तर आधी कपड्याने अन नंतर किचन पेपरने कोरडे करावे. आल्याचे साल काढावे ठेवले तरी चालते नंतर आवळा अन आले वेगवेगळ्या भांड्यात ताटात किसावे. नंतर दोन्ही एकत्र करुन त्यात काळे अन पांढरे मीठ घालावे. ( काळे मीठाला शेंदेलोण अन पांढर्याला सैंधव म्हणतात बहुतेक.) अन चांगले कालवुन घ्यावे. हे सर्व हवाबंद डब्यात बंद करुन फ्रिझरमध्ये ठेवावे. शक्यतो plastic च्या डब्यात ठेवावे, स्टिल वा काचेच्या डब्यात ठेवु नये. पाहिजे तेव्हा चमचाभर मिश्रण काढुन ते गरम पाण्यात उकळुन गाळुन घ्यावे त्यात चवीपुरती साखर घालुन त्याचे सरबत करावे. हे आवळा-आले मिश्रण फ्रिझरमध्ये २ वर्षे सहज टिकते. कृती २: मोरावळा: आवळे, साखर. आवळे धुवुन चांगले कोरडे करुन किसावे. किसाच्या अडीचपट साखर घ्यावी. म्हणजे एक वाटी किसाला अडीच वाटी साखर घ्यावी. हे दोन्ही एकत्र मिसळून ३-४ तास ठेवावे. साखरेला नंतर बरेच पाणी सुटले की हे मिश्रण मंद आंचेवर शिजत ठेवावे. बोटाला चिकटले म्हणजे साधारण एकतारी पाकाइतपत झाले अन वर बुडबुडे आले की. खाली काढुन ठेवावे. थंड झाले की बाटलीत भरावे. आवडीनुसार वेलदोडा पुड घालावी. बाटली बाहेरच ठेवावी. फ्रिजमध्ये ठेवु नये. फ्रोझन आवळ्याचे ही असे करता येते
|
Tanya
| |
| Monday, November 28, 2005 - 10:17 am: |
| 
|
अय्या मुडी... सही, मागे दिनेशनी पण आवळा सरबताची कृती दिली होती. एक शंका... पावशेर म्हणजे पाव किलो का??? आणि आवळ्यांना मिठ लावुन ठेवल्यावर लगेच फ़्रिझ करायचे का? की त्यांना मिठाचे पाणी सुटल्यावर freez करायचे??
|
Moodi
| |
| Monday, November 28, 2005 - 10:24 am: |
| 
|
तान्या पावशेर म्हणजेच पावकिलो. अन हे मिश्रण लगेच भरावे. आपल्या जुन्या च्यवनप्राशच्या रीकाम्या डब्यातही छान टिकते. मात्र फ्रोझन म्हणजे भारताबाहेर जे सुपरमार्केट मध्ये मिळतात ते आवळे असतील तर तास भर आधी काढुन मग धुवुन पुसुन घ्यावे. कारण बाहेर काढल्यानंतर त्याला आपल्या हवेमुळे गोठलेले पाणी बाहेर येतेच.
|
Bee
| |
| Monday, December 19, 2005 - 8:26 am: |
| 
|
मूडी, मोरावळ्याची जी कृती लिहिली आहेत त्यात तू आवळा किसून घ्या असे लिहिले आहे. मी तर नेहमी अख्खा मोरावळा खाल्ला आहे.
|
Moodi
| |
| Monday, December 19, 2005 - 10:07 am: |
| 
|
बी सध्या गारव्यामुळे अन तू आवळे उकडुन घेतलेस त्यामुळे ते लगेच एका दिवसात खराब होणार नाहीत, पाक चांगला झाला होता ना? मी पण मोरावळ्यात आवळा फोडी न करताचा खाल्ला आहे, पण तो आवळा काट्याने वा सुरीने टोचुनच घ्यावा लागतो अन १ दिवसभर चुन्याच्या निवळीत ठेवतात. असो मला नाही वाटत की लगेच तो खराब होइल असे. तो पाक परत एकदा उकळुन बघ. अन आवळ्याच्या उकडल्यावर फोडी होऊ शकतात, त्यात घाबरण्यासारखे नाही काही. कुणी किसुन तर कुणी फोडी करुनच करतात. वेळ मिळेल तसे होते. अन पाहिजे तर तो काचेच्या बरणीत ठेव पण बाहेरच ठेव म्हणजे मुरेल
|
Bee
| |
| Monday, December 19, 2005 - 10:17 am: |
| 
|
मूडी, धन्यवाद! मी जे विचारले त्याचे उत्तर राहिले लिहायचे तुझ्याकडून. मिनोती म्हणते आहे, माझी कृती चुकली. तान्या मला सांगत होती, आवळे न उकळता त्याला सुईने टोचण्या पाडून दोनतारी पाकात आवळे टाकायचे. तू लिहिलेस की आवळा किसायचा पण मी घरी, गावी, दुकाणात आजवर अख्खा आवळाच मोरावळ्यात पाहिला आहे. तेंव्हा मोरावळ्याचे दुसरे एखादे version आहे का हे माहिती करायचे आहे. मी अर्धे आवळे बाजूला काढून ठेवले. मला माहिती होते, काहीतरी चुकणार म्हणून. असो.. कुणाला आवळा पूर्ण घालून केलेल्या मोरावळ्याची कृती माहिती असेल तर लिहाला का.. मूडी, हा भाग Equater पासून 2 Degree खाली आहे. आमच्याकडे बारोमास पाऊस असतो. तसे कधी उजाडतेही छान. पण गारवा थंडी हे जर अनुभवायचे असेल तर फ़क्त इथल्या trains, buses, malls, shops, offices, libraries etc . बाहेर पडल्यानंतर उबदार, दमट तर कधी सादळ वातावरण असते. छत्री कायम जवळ असू द्यावी लागते. पावसाचा इथे नेम नसतो..
|
Tanya
| |
| Monday, December 19, 2005 - 10:32 am: |
| 
|
अरे बी... मी तुला मागे सांगितल होत की, आवळे सुईने टोचुन किन्वा सुरीने बारीक छेद करुन, कुकरमध्ये पाणी न घालता वाफवुन घे. आणि मग साखरेचा २ तारी पाक करुन त्यात वाफावलेले आवळे लवंगा साखरेला मुंग्या लागु नयेत म्हणुन बहुदा घालतात)घालुन तो पाक जरा घट्ट होईतो करुन मग खाली उतरवून जरा room temp. आला की बरणीत भरुन ठेव.
|
Veenah
| |
| Monday, December 19, 2005 - 11:27 am: |
| 
|
तनया, अख्ख्या आवळ्यान्साठी साखरेच प्रमाण सान्गतेस का? की मुडीने सान्गीतल्याप्रमाणे अडीच पट साखर घ्यावी?
|
Tanya
| |
| Monday, December 19, 2005 - 12:04 pm: |
| 
|
विना... आवळ्यांच्या double साखर घेते. पण मूडीताईने सांगितलेले प्रमाण वापरुनही पाक चांगलाच होईल. बी... दोनतारी पाक करताना साखरेइतकेच पाणी न घेता साधारण निम्म्या प्रमाणात पाणी घे.
|
Jagu
| |
| Saturday, January 20, 2007 - 6:27 am: |
| 
|
आवळा मावा कसा बनवतात ? (ह्यात आवळे गोड असतात पण पाक नसतो)
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|