|
मेथीची दाणे मी मोड आणून त्याचा पुलाव करते,आणखी काही करु शकतो का?मेथी दाणे चांगले म्हणून त्याचा जास्तीत जास्तं उपयोग करायचा आहे.
|
Boli
| |
| Wednesday, March 01, 2006 - 8:15 pm: |
|
|
मोड आलेल्या मेथ्या आणि ओले नारळ एकत्र करुन त्यात चविनुसार मिठ आणि भरपुर लिम्बु पिळायचे. salad किव्हा कोशिबिर म्हणुन खाता येइल.
|
Savani
| |
| Thursday, March 02, 2006 - 1:18 am: |
|
|
रोज मेथी खाल्ली जावी यासाठी आणखी एक गोष्ट करता येइल. आपण रोज जे तुरीच्या डाळीचे साधे वरण करतो तेव्हा त्यात थोडी मुगाची डाळ पण टाकावी. म्हण्जे तुरीची डाळ बाधत नाही. आणि त्यात ४ दाणे मेथ्यान्चे टाकावे. कडवट पणा कळुन सुद्धा येत नाही. मी तर रोज असेच वरण करते.
|
मेथी, बद्दल वाचले मी मेथीला मोड आनुन मठाची उसळ करतो तशी करते फ़ार छान होते तसेच जळगाव कडे लेवापाटील समाजात खुप प्रकारे मेथी चा उपयोग केला जातो उदा. कळ्ण्याचि भाकरीच्या पिठात किवा मेथी हळ्द टाकुन भाकरीचे पिठ दळुन आणतात, मला नक्कि पध्द्त ई माहीत नाही पण मी सुध्दा ज्वारीच्या पिठात मेथी टाकते, शिवाय मोड आलेली मेथी जर रोज मुठभर खाल्लि तर चश्माही जातो, माझे वडिल कच्ची मोड आलेली मेथी रोज खातात. शिवाय डायेबेटीक नी अशी मेथी खाणे खुप चांगले असते प्रयोग नक्कि करुन बघा. मी जळ्गाव्ला मैत्र्रीणी कडे, खुप वेगवेगळे पदार्थ खाल्ले आहेत.
|
Lalu
| |
| Thursday, March 02, 2006 - 2:26 pm: |
|
|
सावनी ने म्हटल्याप्रमाणे आमटीच्या फोडणीत नाहीतर डाळ शिजवताना त्यात चिमूटभर मेथ्या टाकायच्या. मोड आलेल्या मेथीचे लोणचेही करतात. ते विकत मिळू शकते. मी कोल्हापूरहून एकदा आणले होते. मिरचीचा ठेचा वगैरे करताना पण थोड्या तेलावर परतलेली मेथी घातली की छान चव येते. दाक्षिणात्य लोक बाळन्तीणीला डोसा करतात त्या पीठात मेथी पण भिजवून वाटलेली असते डाळीबरोबर.
|
Chetu08
| |
| Thursday, March 02, 2006 - 3:05 pm: |
|
|
Arch, mi karte moda aalelya methaynchi bhaji.khupach chhan hote. bharpur kanda, lasun, ola khobra aani kothimbir aani thoda jasta gul ghalaycha.
|
Dineshvs
| |
| Thursday, March 02, 2006 - 4:08 pm: |
|
|
कडधान्यासारखेच मोड काढायचे मेथीला. ज्वारी, गहु आणि मेथी याना मोड काढुन केलेली ऊसळ पण खुप छान लागते. गहु, ज्वारी १८ तास भिजवुन मग फ़डक्यात बांधुन ठेवायची. दोन दिवसात छान मोड येतात. मेथी, मोहरी, मुग याना एकत्र मोड काढुन त्याची कोशिंबीर छान लागते. त्यात दहि, तुळशीची पाने, व हिरवी मिरची घालायची.
|
Arch
| |
| Thursday, March 02, 2006 - 4:24 pm: |
|
|
लालू म्हणते त्याप्रमाणे मी सगळ्या भाज्यांच्या आणि आमटीच्या फ़ोडणीत थोडे मेथीचे दाणे घालते. दोसा करतानापण डाळ भिजवताना डाळीत मेथिचे दाणे टाकते. पण फ़क्त मेथिची उसळ किंवा पुलाव कधी केला आणि खाल्ला नाही. पण नक्की करून बघीन.
|
Chetu08
| |
| Friday, March 03, 2006 - 2:19 pm: |
|
|
Renu, Mi methya gar panyat bhijawte. 10-12 tasane upasun fadkyat bandhun thevte. pani purna nighun gele ki oven madhe bulbchya khali ti purchundi thevte. masta mothe mothe mod yetat. Tel tapvun tyat mohari, kadhipatta aani olya mirchya aani lasun ghalaycha. mag kanda paratavaycha, kanda thoda nehmipeksha jasta galaycha. mag tyat methya + halad +mith aani gul ghalaycha. ole khobra ghalaycha. mi hi bhaji preesure pan madhye karte. tyamule 1-2 shityanmadhech hote. nantar bharpur kothimbir kapun ghalaychi. ek mahatwachi goshta mhanje methya agdi thodyach bhijwaychya. Nehmichya kaddhanyasarkhe 1-2 wati nako. khup jasta hotat.
|
मुंबईत जी मेथीची जुडी मिळते, ती आणी मेथी दाणे या मध्ये काय relation अहे? मी भाजीच्या मेथीबद्दल नाही म्हणत आहे....दुसरी मेथी मिळते... US मधे नाही दिसली
|
Mita
| |
| Monday, March 27, 2006 - 6:45 am: |
|
|
सायली त्या छोट्या छोट्या मेथीच्या पेंड्यांबद्दल बोलते आहेस न तू? ती मेथी मोठि पूर्ण वाढ झाली की मोठि भाजीची मेथी बनते. आणि मेथीदाण्यापासुनच ही मेथी तयार होते.
|
Dineshvs
| |
| Monday, March 27, 2006 - 3:42 pm: |
|
|
तिला मुंबईत समुद्री मेथी किंवा बारिक मेथी म्हणतात. मेथी दाण्यापासुनच होते. सहसा मुंबईच्या बाहेर दिसत नाही कुठे. तिच्या जुड्यांचे ढिग नेहमी ऊलटे ठेवलेले असतात. समुद्रकिनार्यावरची वाळू आणुन ती धुवुन घेतली तर तिच्यात मेथी दाणे पेरुन हि भाजी घरी तयार करता येते. पहिली दोन पाने दिसली कि ऊपटायची. मेथी बोंबिल, केळी मेथी वैगरे करता येते. अर्थात नुसती परतुन पण हि छान लागते.
|
Tanya
| |
| Monday, March 27, 2006 - 3:50 pm: |
|
|
दिनेशदा... हल्ली इथे ती बारिक मेथीपण मिळायला लागलीय. आम्ही नुसत्या कांद्यावर परतुन करतो. थोडीशीच होते. बर्याच वर्षानी चाखायला मिळाली. या मेथीच्या लागवडीसाठी फक्त समुद्राची वाळुच वापरायची की साधी मातीपण त्यात मिसळायची.
|
Arch
| |
| Monday, March 27, 2006 - 3:53 pm: |
|
|
ही मेथी आमच्या कोकणात, माडाच्या खालच्या आळ्यात लावतात. दर सोमवारी आमच्याकडे ह्याची पातळभाजी असायची. पण ही जरा जास्त कडू असते न नेहेमीच्या मेथीपेक्षा?
|
Dineshvs
| |
| Monday, March 27, 2006 - 4:11 pm: |
|
|
Tanya हि नुसत्या रेतीतच पेरतात. जास्त वाढवायची नसल्याने मातीची गरज नसते. शिवाय रेतीमुळे ती नीट ऊपटता येते. तसे आपण समजतो तितकी रेती निकस नसते. कलिंगडासारखी पिके रेतीतच घेतात. Arch ही जरा कडु असते खरी पण परतली कि नाही कडु लागत. कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, आणि ओले खोबरे एवढेच लागते या भाजीला. तुमच्याकडे पातळ भाजी असते म्हणुन कडु लागत असेल, पण या भाजीत बोंबील किंवा केळे घालुन छान होते. शिवाय क्वांटिटी वाढते.
|
Milindaa
| |
| Monday, March 27, 2006 - 4:28 pm: |
|
|
कसली लागते ही मेथी.. अहाहा.. पण प्रचंड पित्तकारक असते.
|
Deemdu
| |
| Tuesday, March 28, 2006 - 4:54 am: |
|
|
पण हे मेथी दाणे कोशिंबीरीसाठी वापरायचे म्हणजे ते कडु लागत नाहीत
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|