Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 14, 2006

Hitguj » Cuisine and Recipies » ब्रेड, पोळी, पराठे » पोळ्या » पुरण पोळ्या » Archive through March 14, 2006 « Previous Next »

Paragkan
Wednesday, August 31, 2005 - 7:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maaJyaasaazI yaMda pasa-la kr .. mhÜrlyaavaoLI pM>Ilaa yaošna. :-)

Priya
Wednesday, August 31, 2005 - 7:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

pragaÊ pazvato. kalaca Aaid%yanaohI maola kÉna kLvalaM Aaho. :-O

ip`yadiXa-naIÊ ekTIca yaoNaar AahosaÆ dÜna purot mhNaalaIsa mhNauna ivacaarlaM. :-)

AroÊ Cana caalaola ]VÜga sau$ kolaa tr² maayabaÜlaIkraMnaa sas%yaat idlyaa kI referrals BarpUt imaLtIla. :-O


Punyanagarikar
Wednesday, August 31, 2005 - 7:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aamacyaa ‘(aMnaa’ ik naO gaUL pÜL\yaaca AavaDtat. ik<aI mhTlaM ‘purNa pÜLI K}na trI baGaa’ tr nahI mhNatat.
tovha maaJyaaca tovhZ\yaa Qar. :-)


Junnu
Wednesday, August 31, 2005 - 7:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aga tirhI tuJyaa navaáyaacyaa vaaTcyaa hI saaMgauna zovaÊ mhNajao ]rlyaa tr GarI Gao}na jaata yaoitla kI tulaa. *wink*
]VÜga sauÉ Jaalaa kI kLvaaÊ mhNajao lagaoca order dota yao[la. :-)

Psg
Monday, March 13, 2006 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डाळ शिजवून झाली की लगेच पुरण करावं का, की डाळ गार झाल्यावर केल तरी चालत? उद्यासाठी कोणाकोणाची काय तयारी झाली आहे? :-)

Moodi
Monday, March 13, 2006 - 11:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग पुनम इथे बघ. प्रियाने सांगीतलय सविस्तर.
/hitguj/messages/103383/104771.html?1125492940 .

Moodi
Monday, March 13, 2006 - 11:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो कापो लिहीणार होता ना इथे त्याच्या बायकोने केलेल्या पुपोची कृती? विसरला वाटत.

Deemdu
Monday, March 13, 2006 - 11:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम डाळ गार होईपर्यंत ती दांडारुन जाते म्हणुन डाळ गरम असतानाच गुळ घालुन चतका देउन घ्यावी आणि रटरटत अली की जायफळ आणि वेलची पुड घालावी:-)

माझी पु.पो. अगदी म्हणजे अगदी छान होते. मी १० वीत गेल्यापासुन पु. पो. करते पहील्यावेळच्या सोडल्या तर माझ्या पु. पो आजपर्यंत एकदाही माझ पुरण बिघडल नाही की माझी पोळी फुतली नाही :-)


Moodi
Monday, March 13, 2006 - 11:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा दिमडु मस्त!! तुझ्या हातच्या पुरणपोळ्या खायला यायला हवे.
पुनम गुळ आधीच किसुन ठेवलेला बरा, लगेच घालता येतो तो डाळीत.


Deemdu
Monday, March 13, 2006 - 11:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी ये तर खरी, पुरणाची पोळी आणि कारल्याची भाजी ही आमच्या जोशी घराची म्हणजे माहेरची खासीयत आहे. पु. पो. काय किंवा कारल्याची भाजी काय जशी बाबांची पणजी करायची तशीच आजी शिकली, आजी कडुन आई आणि आई कडून मी :-)

अगदी ८० वर्षांच्या माझ्या आजे सा बाईंपासुन ३ वर्शांच्या माझ्या मुलापर्यंत सगळे ह्या दोन्ही गोष्टी खुप आवडीने खातात.


Psg
Monday, March 13, 2006 - 11:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डी, कारल्याच्या भाजीची रेसिपी दे की ग.. आणि thanks for the reply :-) सून पुपो करते म्हणजे सासरी सगळ्यांच्या good books मधे लगेच जाऊन बसलीस ना?

Moodi
Monday, March 13, 2006 - 12:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिमडु मग जरूर येईन, कारले तर माझ्याही खुप आवडीचे. तुझ्या या दोन्ही कृती टाक वेळ झाला की.

Deemdu
Monday, March 13, 2006 - 12:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे घ्या कारल्याची भाजी
/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=103383&post=762834#POST762834

Sharmila_72
Monday, March 13, 2006 - 1:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, मूडी, दीमडु मी कधी गरम तर कधी गार अस वाटते पुरण. depends on mood and time पूनम म्हणते ते खरय गरम असतानाच वाटल तर सोप जात अस तिच्या सासूबाई म्हणाल्या. दीमडु, जरा तुझ्या काही टीप्स असतील तर दे ना. मी वाचल आहे प्रियाने सांगितलेल. तु पण तसच करतेस कि अजून काही निराळी पद्धत आहे? कणिक किंवा मैदा जो काही असेल तो कसा भिजवतेस? किती सैल ठेवतेस.
मला तशी जमते पुरणपोळी. पण कधीतरी फुटते. आकार अगदी गोल गरगरीत येत नाही. आणि विशेष म्हणजे आपल्या आज्यांच्या हातची चव येत नाही.


Sharmila_72
Monday, March 13, 2006 - 1:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीमडु, आताच तुझा profile पाहीला. म्हणुन विचारतेय की तू तेलावर लाटतेस पोळी की पिठावर? सीकेपी लोक तेलावर लाटतात, अजिबात पीठ घेत नाहीत. त्यासाठी केळीच पान घेत असत. हल्ली पत्रे मिळतात खास त्यासाठी. मला बिल्कुल जमत नाहीत तेलावर. आई एक्स्पर्ट आहे माझी यात

Prady
Monday, March 13, 2006 - 1:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर्मिला मी देऊ का काहि टिप्स? अर्थात आई च पाहून.ती खूप छान करते पुरण पोळ्या.पूर्ण मैद्याची पोळी करायची असेल तर तो मैदा चान्गला मळून घ्यायचा आणी दोन चार वेळा पोळपाटावर चान्गला आपटून घ्यायचा आणी नन्तर हा गोला पूर्णपणे बुडेल एवढ तेल घेऊन त्यात बुडवून ठेवायचा. दर वेळी पोळी लाटताना त्यातूनच हव तेवढा मैदा काढून घ्यायचा. आणी पोळी लाटताना फ़ुटू नये व हवी तेवढी पसरवता यावी यासाठी पोळीचा उन्डा प्लास्टिक शीट्स मधे ठेऊन लाटावा. आपली ग्रोसरी ची पिशवी कापून तिच्या मधे लाटायच. पिठी कमी लागते,पोळी हवी तशी पसरवता येते आणी फ़ुटतही नाही. इतर भरून करायचे पराठे जसा आलू पराठा वगैरे पण असा लाटता येइल.

Deemdu
Tuesday, March 14, 2006 - 4:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर्मिला, मी मैद्याची पोळी कधीच केली नही,
साधी पोळीची कणिक मीठ न घालता भिजवायची जशी पोळीला भिजवतो तशी आणि मग ती थोडं थोडं मीठ, तेल आणि पाणी लावत लावत उलट्या हाताने म्हणजे तळव्याच्या उलट्या बाजुने बोटांनी दाब देत देत मऊ करायची. मग एक्दोन वेळेला ती परातीत आपटायची. कणिक इतकी मऊ झाली पाहीजे की तीला तार सुतते. मग ह्या भिजवलेल्या कणकेवर थोडस तेल सोडुन ५ मिन. तशी ठेवुन द्यायची.
आणि हो पोळी पिठावरच लाटायची, मी तर त्याला सुध्धा कणीकच वापरते.


Deemdu
Tuesday, March 14, 2006 - 4:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि हो आडनाव जरी चिटणीस असल तरी मी CKP नाही :-)
माझ सासर मुळ कोल्हापुरच, तिथे त्यांच पहील आडनाव पेंढारकर होत पण ते शाहु महाराजांच्या पदरी चिटणीसगीरी ( हा माझ्या नवर्‍याचा शब्द :-) ) करायचे म्हणून हे आडनाव :-)
बाकी पेंढारकर म्हटल्यावर मी कर्‍हाडे हे ओघानेच आल :-)
तस तु मला hybrid म्हणालीस तरी चालेल कारण आई typical कोकणस्थ, बाबा देशस्थ आणि मी कर्‍हाडे:-)


Sharmila_72
Tuesday, March 14, 2006 - 6:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रज्ञा, थँक्स एरवी मी मैदा चांगला मळुन तिंबते. ह्या वेळेस तुझ्या सांगण्याप्रमाणे मस्त आपटून घेतलाय पोळपाटावर (नवीन), धोबी कपडे धुताना आपटतात तसा!
दीमडू, धन्यवाद! तुझ्या टीप्स पण आहेत लक्षात.
पूनम वाचला तुझा पोस्ट पोळपाटाच्या बीबी वरचा. अगं उत्साह असला तरच पदार्थ चांगले होतात. मी जर माझा मूड असेल तरच घालते हे असले घाट. कंटाळा आला असेल तर चक्क विकत आणते. अर्थात भारतात आहे म्हणून शक्य आहे विकत आणुन खाण.
आणि पुरणपोळ्या तर मूड असेल तरच कराव्यात. कंटाळा आला असेल तर अजिबात करु नयेत.


Psg
Tuesday, March 14, 2006 - 7:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरय, करता करताच कंटाळा यायची शक्यता असते! त्यामुळे आधीच कंटाळा आला असेल तर बिघडायच्याच! :-)

Moodi
Tuesday, March 14, 2006 - 9:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरय शर्मिला अन मूडी आल्यावर तिला पण खायला घालाव्यात.

Sharmila_72
Tuesday, March 14, 2006 - 10:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, खरच ये गं माहेरपणाला. करुन घालीन तुला भरपूर पुरणपोळ्या, वर हव्वं तितकं साजूक तूप. वाटल्यास उकडीचे मोदक पण करेन जोडीला.
इथे आंबे यायला लागले मूडी. भाव विचारायची हिंमत झाली नाही अजून मला. तुम्हाला तिथे कधीपासून मिळतील गं इंडीअन स्टोअर मध्ये?

इथले लोक भले नाचत असतील abroad , abroad म्हणत. पण तुम्ही तिथे राहून किती गोष्टी miss करता ते कळत गं मला. भारतात असताना या गोष्टी जितक्या जाणवत नाहीत तितक्या तिथे गेल्यावर जाणवतात. जांभळ, बोरं, ताडगोळे.... आपली माणसं...


Moodi
Tuesday, March 14, 2006 - 10:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर्मिला धन्यवाद ग, जरूर येईन. एवढे आगत्याचे निमंत्रण कुणी टाळेल का?
अन काय गमावतो ते शब्दात सांगता येत नाही.

आंबे आता मे जुन मध्ये येतील.
बाकी मेल मध्ये बोलते नाहीतर मॉड भाऊ येतील


Moodi
Tuesday, March 14, 2006 - 12:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही घ्या पुपोची नवी लिंक. झक्कास.

http://www.esakal.com/static/ruchiplt394.html .

Chetu08
Tuesday, March 14, 2006 - 2:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Lalu,
Mi karnar aahe ga telpolya
Ye khayla.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators