|
Mita
| |
| Friday, March 10, 2006 - 8:47 pm: |
| 
|
आता तव्याचा विषय निघालाय म्हणून आठवले,मला पण आत्तापर्यन्त २ तवे फ़ेकुन द्यावे लागले इतके चिकट होतात आणि कडेला ते ग्रीस जमते कित्ती घासले तरी निघत नाही. इकडे US मधे काय वापरता तुम्ही तवा घासायला?? सध्या साधा लोखंडाचा तवा आणला आहे. मी चपातीला वरुनच तेल लावते,कडेने अगदि कधीतरी १५ दिवसातुन एकदा जेव्हा पराठे करते तेव्हाच. माझा मेन प्रश्न हा आहे की तवा कशाने घासायचा??
|
Karadkar
| |
| Friday, March 10, 2006 - 9:17 pm: |
| 
|
मीता, मी तवा घासायला ते 3M चे green scrubbers असतात ते वापरते. अर्थात मझा तवा circulon चा आहे. पाण मझा थोडा घाण झालाय गेल्या ५-६ वर्षात पण टाकण्या लायक नाही. ते oven cleaner कोणी वापरलय का तवा घासायला?
|
Moodi
| |
| Friday, March 10, 2006 - 9:59 pm: |
| 
|
कराडकर तु म्हणतेस ते खरे आहे, मी पण एकदा पराठे करताना तव्यावर तेल सोडले अन तो सारखा पुसावा लागला. मी पोळीला तेल ती भाजुन काढल्यावरच लावते. वापरलेल्या टी बॅग्ज पैकी एखादी ती फेकण्या आधी तवा, तेलकट कढई किंवा भांडे याला आतुन फिरवावी अन मग ते लिक्वीड सोपने धुवावे. म्हणजे त्याचा सगळा ओशटपणा जातो. मी नेहेमी करते असे.
|
Seema_
| |
| Sunday, March 12, 2006 - 9:12 pm: |
| 
|
इकडे US मधे काय वापरता तुम्ही तवा घासायला?? >>> walmart मध्ये aluminiuam /steal cleaner नावाखाली एक छोटासा पावडरीचा डब्बा मिळतो . त्यान अगदी चकचकित निघतो तवा . इतर steal ची भांडी ही फ़ार चिकट झाली असतील आणि liquid soap न निघत नसतील तर ह्या पावडरीन अगदी कमी कष्टात निघतात भांडी . अगदी करपलेली सुद्धा . 
|
Mita
| |
| Sunday, March 12, 2006 - 11:17 pm: |
| 
|
सीमा,मिनोती,मूडि thanks ग पटकन reply दिल्याबद्दल.
|
Moodi
| |
| Thursday, September 07, 2006 - 12:06 pm: |
| 
|
रैना एक सुचवु का? प्रयत्न करुन बघ. मी नॉनस्टीक भांडी(तवा, पॅन वगैरे) आधी वापरलेल्या टीबॅग्जने नुसत्या फिरवुन घेते(तेलाचा हात आपण टिनला लावतो ना तसा) मग स्पंजच्या मऊ बाजूने लिक्वीड साबण घालुन ती घासुन मग कोमट पाण्याने धुवून घेते. दुसरे म्हणजे पदार्थ( आम्लेट, डोसा वगैरे) केल्याबरोबर साध्या पाण्याने लगेच धुवायचे. ठेवायचे नाही. कारण जरा जरी उशिर झाला की मग उरलेले अन्न कडक बनते. निघत नाही लवकर. टीबॅग्जने ओशटपणा जातो आणि साबणही कमी लागतो. मात्र माईल्ड सोप हवा.
|
Raina
| |
| Thursday, September 07, 2006 - 12:12 pm: |
| 
|
वा मुडी- खूप खूप धन्यवाद! शुभस्य शीघ्रम आजच करुन पाहते.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|