Bee
| |
| Wednesday, March 08, 2006 - 5:53 am: |
| 
|
दिनेश, मी नेहमी अंदाजेच पाणी आणि कणिकही अंदाजेच घेतो. pilsburry चे पिठ वापरतो. इतर कुणाला हा अनुभव आलाय का? कणिक मळवून झाल्यानंतर ती झाकून ठेवावी की ओल्या कापडात गुंडाळून ठेवावी? मला नरम गरम चपात्या शिकायच्या आ हे त... दिनेश, ग्लुटेन हा काय प्रकार आहे?
|
Nandita
| |
| Wednesday, March 08, 2006 - 8:18 am: |
| 
|
अरे बी ते रेडिमेड पिठ वापरण्या पेक्षा चक्किवरुन दळुण आणत जा गहू, चक्की म्हणजे 'पिठाची गिरण' किंवा सगळ्यात सोप्पा उपाय लग्न कर 
|
Jayavi
| |
| Wednesday, March 08, 2006 - 9:24 am: |
| 
|
बी, मी सुद्धा पिल्सबरी आटा वापरते. ही कणिक भिजवताना जरा घट्ट भिजवावी लागते आणि जास्त वेळ भिजवून ठेवू नकोस. १० मिनिटं सुद्धा पुरे. पण घट्ट भिजव. आणि मग १० मिनिटांनी अर्धा चमचा तेल घालुन मळून घे. मस्त मऊ होते कणिक. नंदितानी सुचवलेला लग्नाचा उपाय सगळ्यात सोप्पा आहे
|
Moodi
| |
| Wednesday, March 08, 2006 - 9:37 am: |
| 
|
बी ग्ल्युटेन म्हणजे गव्हात असते ते, एवढे शास्त्रीय नाही सांगता येत पण त्याने गव्हाच्या पीठाला मऊपणा अन तार येते. अन हो पिल्सबरी सर्वात ग्रेट, दुसरे वापरु नकोस. या पीठात हळु हळु पाणी घालुन भिजवुन १० मिनिटेच ठेव, झाकुन ठेव, हे असे ओल्या कपड्यात गुंडाळु नकोस. अग नंदिता देशाबाहेर चक्की कुठुन असणार ग? असती तर मी पण उड्या मारत गेले असते सर्व धान्ये घेऊन.. बी आता देशात जातोयस तर बॅंड वाजवुनच ये तुझा, अन हो उगाच चिकित्सा करु नकोस जास्त मुलगी पहाताना. 
|
Tanya
| |
| Wednesday, March 08, 2006 - 9:47 am: |
| 
|
बी... मी देखिल pilsburry च वापरते. माझ्या चपात्या छान होतात. जयावी मुडी म्हणते त्याप्रमाणे करुन बघ.
|
Bee
| |
| Wednesday, March 08, 2006 - 10:39 am: |
| 
|
तान्या मी तुला फ़ोन करुन विचारणारच होतो तू कुठले पिठ वापरतेस, त्याच्या चपात्या नीट होतात का? धन्यवाद! मी कणीक मळवतानाच तेलही टाकतो कारण हाताला अगदी कोपरापर्यंत पिठ चिकटते तसे नाही केले तर. आमच्या इथे आहे चक्की पण ते लमसम दळण घेतात, पाचेक किलोचे घेत नाहीत. शिवाय आपल्या सारखे गहू इथे कुठे मिळणार दळायला. असो. सर्वांचे मनापासून आभार! पूर्वतयारीबद्दल बोलुयात.. आ. स्व. च्या
|
मूडी, बी, आता पुढच्या वेळेस जेव्हा भारतात याल तेव्हा परत जाताना घरघंटी घेऊन जा. म्हणजे ज्वारीच पीठ थालिपीठाची भाजणी ताजी ताजी, बेसन सर्वच घरी दळता येईल तुम्हाला. हव असल्यास आजूबाजूच्या लोकांची दळणं पण आणू शकता दळायला! 
|
आणि बी, कोपराला कशी चिकटते कणिक? इतक कोपरापर्यंत चिकटेपर्यंत कणकेत हात घालतोस की काय?
|
Shyamli
| |
| Wednesday, March 08, 2006 - 12:03 pm: |
| 
|
बी फुड प्रोसेसर घ्या बघु आधी... कणिक मस्त मळलि जाते त्यात....
|
बी, "अन हो उगाच चिकित्सा करु नकोस जास्त मुलगी पहाताना." अस मूडी म्हणाली ते खरय अगदी. नाहीतर पराठ्यावर चाट मसाला वरून म्हणजे कसा आणि त्याचे प्रकार एक प्रकार दोन अशा प्रकारची चिकित्सा जर तिच्याशी बोलताना केलीस तर कठीण आहे हो
|
वर्हाडात मनगटाला कोपर म्हणतात का?(माझे अज्ञान दूर करायचे आहे....) की कणिक भिजवण्याचे भांडे कोपर आत जाईल इतके खोल आहे? बी दिवा घे रे,मोठ्ठाऽऽऽऽ. नाही......बी मधे दडलेल्या एक लहान मुलाकडे दुर्लक्ष करा. (जेवण झाल्यावर मी मायबोली वाचणार नाही, कानाला खडा.)
|
~~~~~कणकेतून जेंव्हा मी पोळ्यासाठी गोळा काढतो तेंव्हा तो हातावरील शेवया जशा करतो तसा लांबतो. त्या शेवया ईतक्या लांब होतात की कोपराला चिकटतात. असे म्हणायचे आहे त्याला. तुम्ही पोरी म्हणजे ना
|
अस्सं होय... धन्यवाद गं अंजली. बी, सरळ दुर्लक्ष कर रे माझ्या पोस्टकडे.
|
Tanya
| |
| Wednesday, March 08, 2006 - 1:34 pm: |
| 
|
बी... मीही हेच सांगणार होते की सरळ एक F.P. घे बर, जास्त कटकट नाही, कणिक मळल्या मळल्या लगेच चपात्या करु शकतोस.
|
पोळ्या करण्यासाठी लग्न कर >>> हे कधी बदलणार? 
|
Maitreyee
| |
| Wednesday, March 08, 2006 - 6:56 pm: |
| 
|
हो ना! बी आधी कणिक नीट मळायला शीक बरं, मला नाही वाटत ग्लुटेन बिटेन चा काही प्रॉब्लेम असेल! बी तू पाणी बदाबदा ओतत असणार कणिक मळताना दुसरं काय ~D आता वापरत असशील त्याच्या निम्मे करून पहा पाण्याचे प्रमाण 
|
Seema_
| |
| Wednesday, March 08, 2006 - 7:06 pm: |
| 
|
bee अरे food processor घे . लग्न करुन उगाच आणखी झंझट . कशाला ते ?. निवांत रहा मस्तपैकी . ~D आता FP वापरन्यापेक्षा हात चालवण कस योग्य आहे त्यावर लालु एक सल्ला देईल बघ तुला . ~D
|
Mumbhai
| |
| Thursday, March 09, 2006 - 3:29 am: |
| 
|
पोळ्या करण्यासाठी लग्न कर >> आणि आता लग्न म्हणजे काय असले कायपण नका विचारु :D आणि हो तो मोठ्ठा दिवा जवळच ठेवा
|
अरेच्च्या? हा बीबी पण भारीच हे की! फुल्ल एच एच पी व्ही!
|
Bee
| |
| Thursday, March 09, 2006 - 5:15 am: |
| 
|
माझ्याकडे एक उंचसे पातेले आहे, त्याचा व्यास थोडा मोठा आहे. जर परातीत पिठ मळले तर ते बाहेर उसळी घेते म्हणून मी ह्या उंच सखोल पातेल्यातच पिठ मळवतो. पिठ सांडत नाही आणि घरातील उपद्रवी मुंग्याचा त्रास जरा कमी होतो. साहजिकच कणीक मनगटाच्या वर जाऊन कोपरार्यंत पोहचते. आता मनगट म्हणजे जिथे आपण घड्याळ बांधतो आणि कोपर ढोपर म्हणजे जिथे आपण हात दुमडतो. कळले का कशाला काय म्हणतात रचना आणि सीमाचे दोघींचेही म्हणने पटले साध्या पोळ्या करण्यासाठी बायको कशाला आणि लग्न न करुन आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे. सीमाला स्वानुभव दिसतो आणि रचनाला संसारात पोळ्या बिळ्या लाटायच्या नाहीत. रचना तुझ्या यजमानांचे काही खरे नाही. असो.. मला ह्याबाबतीत धोपट मार्गच स्विकाहार्य वाटतो, जाऊ गेले तर ते God damn स्वातंत्र्य, ते असूनही कोण कुठे सुखी आहे.. निदान सौ कडून पोळ्या तर मिळतील आयत्या तान्या, मला घ्यायचा आहे FP पण विलंब करतो आहे कारण त्याला स्वच्छ ठेवणे आणि ते धारदार पाते धुणे जिकरीचे वाटते. चला आता मात्र आ. स्व. पू. बद्दलच बोलुया नाहीतर शिल्पा बीबीचा विषय वळवायला expert आहे. पण आजकाल मात्र ती लहान पोरांच्या बीबीवरच मुक्कामी असते.
|
\\\ कोपर ढोपर म्हणजे जिथे आपण हात दुमडतो. \\ माझ्या मते, कोपर म्हणजे जिथे आपण हात दुमडतो आणि ढोपर म्हणजे गुडघा जिथे आपण पाय दुमडतो.
|
Mumbhai
| |
| Thursday, March 09, 2006 - 5:44 am: |
| 
|
एक नम्र विनंती कोपर ढोपर म्हणजे काय आणि माझे लग्न ह्यासरख्या विषयांची चर्चा इथे नको त्या करिता त्वरीत नविन BB उघडावेत. विषयांतराबद्दल क्शमस्व
|
Bee
| |
| Thursday, March 09, 2006 - 6:18 am: |
| 
|
मुम्भाई, विषयांतर नको ही विनंती मान्य आहे पण नविन बीबीची कल्पना रुचली नाही. ह्या ना त्या कारणाने बीबीचे विषय मागे पडतात आणि नविन काहीतरी सुरू होते. हे आजचेच नाही तर गतकालापासून सुरू आहे. आम्ही सर्वजण आपापल्या परिने स्वतःला आवरायचा प्रयास करतो शिवाय नेमस्तकगणही आमची कानऊघडणी करून जातात, आम्हाला वारंवर बजावतात तरी पण चुका होतातच. त्याबद्दल क्षमस्व!
|
Moodi
| |
| Thursday, March 09, 2006 - 2:16 pm: |
| 
|
इथे बघा सगळ्या मायबोलीकरानो. http://www.ramrampavna.com/html/pakkruti/cooking_tips.asp .
|
Prajaktad
| |
| Thursday, March 09, 2006 - 4:45 pm: |
| 
|
माणुस (हा id असणारा मायबोलिकर)कुठे आहे?त्याला सांगा बी साठी step bye step पोळि / चपाति चे फोटो टाकायला.
|