|
मटण चॉप्स.. साहित्य :- अंदाजे १२ ते १५ पिस मटणाचे चॉप्स. लसुण १० ते १२ पाकळ्या, तिखट, गरम मसला १० ते १२ काळिमिरी, ६ ते ७ लवांगा, ४ दालचिनिचे तुकडे ( मध्यम आकाराचे), ४ दगडफ़ुल, धणे २ चमचे, २ चमचे बडिशेप, २ ते ३ तेजपत्ता, दिड वाटी ओळा नारळ ( खवुन घेतलेल), अर्धी वाटी सुके खोबरे किसुन घेतलेले), ५ ते ६ मध्यम आकाराचे कांदे, मीठ अवीनुसार तेल कृती :- प्रथम कढई तापवुन त्यात तेल टाकुन कांदा लालसर होईपर्यंत भाजुन घ्यावा आणि त्यात सर्व गरम मसाला आणि लसुण टाकावे. सरतेशेवटी सुके आणि ओले खोबरे टाकुन भाजुन घ्यावे. हे सर्व मिश्रण थंड करुन वाटुन घ्यावे. आत्ता मोठे टोप घेवुन ( कॉपर कोटेड असल्यास चांगले) त्यात तेल टाकुन हे सर्व वाटण टाकावे, त्यात हळद, मसाला टाकुन चांगले परतुन घ्यावे. हे सर्व चांगले परतुन घेउन एक वाफ़ काढावी ( वाफ़ काढताना टोपाच्या झाकणात पाणि टाकावे, ह्याने मटण चांगले शिजते). एक वाफ़ कढल्यावर मीठ ( चविनुसार) आणि पाणि टाकुन शिजत ठेवावे पण ते पुर्ण सुके करावे. झाले मटणाचे चॉप्स तयार
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|