|
Dineshvs
| |
| Tuesday, February 28, 2006 - 4:49 pm: |
| 
|
फ़्लॉवरचे लोणचे. कॉलीफ़्लॉवरचे बारिक तुकडे करावेत. मधला दांडा कोवळा असेल तर तोहि बारिक करुन घ्यावा. जर हे तुकडे दोन कप भरुन असतील तर ते ताटात पसरुन त्याला अर्धा चमचा हिंग, एक चमचा मीठ व एक चमचा तिखट लावुन ठेवावे. एक चमचा मोहरीची डाळ जरा भाजुन त्यात घालावी. ती नसेल तर एक चमचा मोहरी जरा भाजुन, मिक्सरमधुन फ़िरवुन घालावी. अर्धा चमचा साखर घालावी. अर्धा कप तेल गरम करुन त्यात अर्धा चमचा मोहरी घालावी व गॅस बंद करावा. मग त्यात एक चमचा हळद, अर्धा चमचा हिंग व एक चमचा हळद घालावी. तेल कोमट झाले कि ते फ़्लॉवरवर ओतावे. अर्धा चमचा लिंबु फ़ुल त्यात घालावे. ( लिंबुफ़ुल बाजारात तयार मिळते. त्याला सायट्रिक acid पण म्हणतात. याचे साखरेसारखे स्फटिक असतात. लिंबाचे काम भागवु शकते. चिमुटभर स्फटिक, अर्ध्या लिंबाचे काम भागवतात. ) हे सगळे काचेच्या भांड्यात भरुन दहा बारा तास बाहेर ठेवावे, व नंतर फ़्रीजमधे टिकवावे. नो फ़्रॉस्ट फ़्रीजमधे हे पंधरा दिवस टिकते. ताबडतोब खायला हरकत नाही, पण दोन चार दिवसानी खार सुटला कि आणखी चवदार लागते.
|
Leenas
| |
| Monday, December 29, 2008 - 11:37 am: |
| 
|
याच लोणच्यात गाजराचे तुकडे घातले तर चालतील का? म्हणजे गाजर फ़्लॉवर अस एकत्र?
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|