Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
दशम्या..

Hitguj » Cuisine and Recipies » ब्रेड, पोळी, पराठे » दशम्या.. « Previous Next »

Bee
Thursday, February 23, 2006 - 8:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दशम्या भोपळा घालून करतात का? नसेल तर मग भोपळा घालून जो पोळ्यांचा प्रकार असतो त्याला काय नाव आहे? वेल.. मला सध्या तरी दशमीची कृती हवी आहे. दशमीच्या दिवशी दशम्या तर आपण करत नाही मग दशम्या हे नाव का :-)

Veenah
Thursday, February 23, 2006 - 11:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, भोपळा घालून पुर्‍या करतात आणी त्याला घारगे म्हणतात.
दशमी म्हणजे दूध किंवा उसाचा रस घालून केलेली कुठल्याही पीठाची भाकरी किंवा पोळी.
उसाच्य रसाच्या दशम्या खूप छान लागतात.. २-३ दिवस सहज टिकतात त्यामुळे प्रवासात पण उपयोगी पडतात.
उसाचा रस एक वाटी असेल तर चार वाट्या कणीक घ्यावी चवीला किंचीत मीठ घालावे. दोन चमचे तेल किंवा तूप घालून फक्त उसाच्या रसानेच पोळीच्या पीठाप्रमाणे कणीक भिजवावी. पातळ लाटून तूप सोडुन दोन्ही बाजूने भाजावी.
काकवी किंवा गुळ-चूनाबरोबर मस्त लागते.


Moodi
Monday, July 10, 2006 - 11:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मैत्रीणीच्या आईने एक प्रकार केला, एकदम झणझणीत अन चविष्ट. हा दशम्यांसारखा प्रकार मात्र लसुण अन सुके खोबर्‍याच्या तिखटजाळ चटणीबरोबर किंवा कैरीच्या लोणच्याबरोबरच मस्त लागेल. भाजी नकोच.

कणकेत त्यांनी तेल, मीठ, २ ते ३ चमचे लाल तिखट, तीळ अन बाळंतशेपा घातल्या. नेहेमीसारख्या पोळ्या / दशम्या केल्या. गंमत म्हणजे ट्रीपमध्ये बाकी लोकांनी आणलेला डबाच सगळ्यांना पुरल्याने तिच्या या दशम्या मात्र उरल्या अन तिने थोड्या मला अन बाकी दुसरीला दिल्या. घरी जाऊन जेव्हा मी त्या चटणीबरोबर खाल्ल्या, तेव्हा ती चवच विसरु नाही शकले. यात खूप तिखट असले तरी बाळंतशेपा असल्याने त्या पोटाला अजीबात बाधल्या नाहीत. बाळंतशेपांची चव कुणाला आवडणार नाही पण झणझणीत खाऊन बघायचे असल्यास जरुर घालाव्या. अन पाहिजे तर बेसन पण घालावे.


Chandrika
Tuesday, July 11, 2006 - 12:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'BaLanthashopa' kasa disatho? Dusare nav kay? Ova ka? Please sanga koNitari. Thanks

Moodi
Tuesday, July 11, 2006 - 12:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंद्रिका ह्या बाळंतशेपांना suva/ Deel Seeds असे नाव आहे. साधारण बडीशेपेच्या आकाराच्या, त्याच रंगाच्या असतात या. चव तशीच पण जरा ओव्यासारखी तिखट लागते. तू असमानतारा कधी खाल्ले आहेस का? जिभेला चुरचुरणारे? थोडे तसे लागते हे. या शेपा स्त्रीयांच्या प्रसुतीनंतर सुपारीत वापरतात, त्याने पोटातील वात / गॅस निघुन जातो. विविधा विभागात मी याची सुपारी लिहीलीय.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators