|
Veenah
| |
| Monday, February 13, 2006 - 4:18 pm: |
| 
|
फ्राईड आईस्क्रीम : (८ जणांसाठी ) साहित्य ८-९ चमचे (scoops) व्हॅनिला आईस्क्रीम, १/२ कप किसलेले सुके खोबरे, १/२ कप ब्रेडक्रम्स, १ कप साखरेचा पाक, तेल तळण्यासाठी कोटींग बॅटरसाठी साहित्य: २ टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, २-३ टेबलस्पून पीठ, चिमूटभर मीठ, १ टीस्पून तेल, पाणी. कृती: पीठासाठी पाणी सोडून इतर साहित्य मिक्स करून घ्या. त्यात हळुहळु पाणी घालून घट्ट पेस्ट तयार करा. एका भांड्यात खोबर आणि ब्रेडक्रम्स एकत्र करा. घट्ट व्हॅनिला आईस्क्रीम्चा गोळा घेऊन त्याला बनवलेल्या पेस्टमध्ये बुडवा. मग, ब्रेडक्रम्सच्या मिश्रणात घोळवा. एका स्टिल प्लेटमध्ये हे गोळे घेऊन त्यांना अर्धा तास फ़्रिजमध्ये ठेवा. घट्ट झाल की पुन्हा बाहेर काढून वरील कृती करा. मात्र, यावेळेस फ्रिजमध्ये एक तास ठेवा. भांड्यात तेल गरम करा. त्यात एका वेळेला २ आईस्क्रिम बॉल तळून घ्या. वरील आवरण ब्राऊन होऊ द्यात. सगळे बॉल तळून झाले की साखरेच्या पाकात घालून सेकंदाच्या आत बाहेर काढा व पटकन खा. सूचना: आइस्क्रीम एकदम घट्ट असावं पातळ नसावं याची काळजी घ्या.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|