|
Raigad
| |
| Monday, February 13, 2006 - 3:04 am: |
| 
|
कोबीचे ऊबजे कोबीचा हा एक अगदी साधासा पण छान प्रकार आहे माझा आवडता! तांदूळ भाजून घ्यायचे व पाण्यात भीजत घालयचे सधारण १/२ तास.मग पाणी काढून निथळत ठेवायचे. शेंगदाणे व डाळ्या साधारण १ तास पाण्यात भिजवायचे. कोबी बारीक चिरायचा. थोडं आल बरीक किसून घ्यायचं वाटायच नाही! हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या. पातेल्यात तेलावर कडीपत्ता, जीरं, मोहरी, हिंग यांची फ़ोडणी करून त्यात कापलेला कोबी, आल व मिरच्या घालून परतायचे. थोडा वेळ झाकण ठेऊन कोबी वाफ़वून घ्यायचा.मग मीठ, थोडी साखर घालून त्यात भिजवलेले शेंगदाणे, डाळ्या व तांदूळ घालून परतायचे. मग तांदळाच्या साधारण दुप्पट पाणी घालून पाणी ऊकळले की पातेल्यावर झाकण ठेऊन भाताला वाफ़ आणावी. वर कोथींबीर घालून राईत्याबरोबर गरमा गरम भात खावा!
|
Pendhya
| |
| Monday, February 13, 2006 - 3:33 am: |
| 
|
मानसी, मी असाच कोबीभात करतो, पण त्यात शेंगदाणे आणी डाळ्या नसतात. पुढल्या वेळेस ते टाकुन तयार करीन.
|
Dineshvs
| |
| Monday, February 13, 2006 - 5:29 pm: |
| 
|
वा छान वेगळा प्रकार आहे हा.
|
Dha
| |
| Tuesday, March 28, 2006 - 4:57 pm: |
| 
|
अग, खरच छान आहे. मी उद्याच करुन बघते.
|
डाळ्या म्हणजे नक्की काय?डाळं का?
|
Bee
| |
| Thursday, June 01, 2006 - 7:11 am: |
| 
|
रेणू, जिथे फ़ुटाणे कुरमुरे विकतात तिथे हरभर्या पासून केलेल्या डाळ्या असतात ना.. ज्या खूप कडक नसतात आणि साल काढलेली असतात. आपण चिवड्यात पण टाकतो ना बर्याचदा त्याला डाळ्या म्हणतात. फ़िकट पिवळसर रंगाच्य असात. घरी पण करता येतात. चण्याची डाळ भिजू घालायची नंतर तिला वाळवायची की डाळ्या तयार पण घरी केलेल्या डाळ्यांची चव विकतच्या सारखी खुसखुशीत नाही लागत.
|
थॅंक्स बी.आता आलं लक्षात.पण इथे अमेरिकेत कुठे मिळण्याची शक्यता नसेलच.काल हा प्रकार करून बघितला मी. डाळ्या न घालता देखील हा भात छान झाला.
|
Junnu
| |
| Thursday, June 01, 2006 - 2:58 pm: |
| 
|
अग indian store मधे मिळतात ना डाळ्या.
|
Prady
| |
| Thursday, June 01, 2006 - 3:40 pm: |
| 
|
रेणु शहाणे, कुठे गायब झाला होतात आपण. हल्ली नगरात फेरी नसते आपली. कशी आहेस? बरी आहेस ना. इथे इतक्या दिवसांनी दिसलीस म्हणून राहावलं नाही. म्हण्ट्लं जरा हाय करावं.
|
काय नावने मिळतात indian store मध्ये?
|
Seema_
| |
| Thursday, June 01, 2006 - 4:48 pm: |
| 
|
रेणु जिथे चिवड्याचे पोहे, चिरमुरे ठेवलेले असतात तीथे मिळतात डाळे . नाव काय मी पाहिल नाही . बघुन ओळखता येईलच ना तुला .
|
Raigad
| |
| Monday, July 03, 2006 - 10:40 pm: |
| 
|
डाळ्या म्हणजे मला हरभर्याची डाळ म्हणायची होती... अर्थात ही न घालता देखील चांगला होतो हा भात!
|
हा भात आणि टोमाटोचे सार असा बेत केला होता मी काल...खूप छान लागतो हा भात.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|