|
Moodi
| |
| Sunday, October 02, 2005 - 3:40 pm: |
|
|
पोपटीच्या दाण्यांची झणझणीत आमटी पावशेर पोपटीचे दाणे, 1-2 लाल टोमॅटो, १ मोठा कांदा, आले, लसुण, हिरवी मिरची अन कोथिंबीर याचे वाटण साधारण पाऊण वाटी, भरपुर तेल, लाल तिखट कृती : फोडणीत नेहेमीपेक्षा जास्त तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात हिंग जीरे मोहरी हळद सर्व टाकुन बारीक चिरलेला कांदा अन टॉमेटो टाकुन परतावे. नंतर आले, लसुण, कोथिंबीरीचे वाटण टाकुन चांगले परतावे. नेहेमीपेक्षा जास्त तिखट ( अर्थात सोसले तर ) अन चवीपुरते मीठ टाकुन हलवुन घ्यावे. अन लगेच त्यात गरम उकळते पाणी आपल्याला ज्या प्रमाणात रस्सा पातळ हवाय त्या प्रमाणात टाकावे. अन मग पोपटीचे दाणे त्यात टाकुन भांड्यावर झाकण ठेवावे. नंतर दाणे पुर्ण शिजल्यावर गॅस बंद करुन भांडे खाली उतरवुन झाकुन ठेवावे. वाढण्यापूर्वी ओला नारळाचा किस अन चिरलेली कोथिंबीर पेरावी. अन सोबत एक लिंबाची फोड द्यावी. चोखंदळ खाणारे लिंबाचा वापर करतीलच. याच पद्धतीने ओले हरभरे, वाटाणे यांची आमटी करता येईल.
|
Veenah
| |
| Friday, February 10, 2006 - 2:13 pm: |
|
|
मुडी, पोपटीचे दाणे म्हणजे ओल्या वालाचे दाणेच ना ग? कारण मी आत्ताच ओले वालाच्या दाण्याची तुझ्या ह्या कृती प्रमाणे आमटी केली आहे. फारच छान झालीय.
|
Moodi
| |
| Friday, February 10, 2006 - 2:23 pm: |
|
|
अग वीणा मी नाही पाहिले हे दाणे कधी. पण कोकणात याच्या शेंगा भाजतात हुरड्यासारख्या.
|
Savani
| |
| Friday, February 10, 2006 - 2:25 pm: |
|
|
मूडी अग हा पोपटी काय प्रकार आहे? तुझी रेसिपी इतकी छान आहे पण पोपटी म्ह्ण्जे काय तेच माहित नाहिये. इकडे इन्डियन स्टोअर्स मध्ये फ़्रोझन असे कसलेतरी दाणे मिळतात, बहुदा वालपापडी चे दाणे असावेत. तेच पोपटी चे दाणे का?
|
Moodi
| |
| Friday, February 10, 2006 - 2:27 pm: |
|
|
सावनी मला खरच नाही माहिती. ही रेसेपी मुळची विदर्भातली आहे, मी मात्र वाटाणे टाकले याच्या ऐवजी. दिनेश ना माहित असेल ही पोपटी कशी दिसते ते.
|
Dineshvs
| |
| Friday, February 10, 2006 - 3:57 pm: |
|
|
कोकणात जी पोपटी केली जाते त्यात वालाचे म्हणजेच पावट्याचे दाणेच वापरतात. मूडि माझे एक निरिक्षण आहे, विदर्भातला कुठलाहि पदार्थ, जरा जास्त तेल घालुनच करावा असे लिहिलेले असते, ईथेच नाही, ईतरत्रहि. कोकणात मात्र ऊगीच नावाला तेल, घालतात. मुळात असतेच कुठे तेल, कोकणात ?
|
Arch
| |
| Friday, February 10, 2006 - 6:21 pm: |
|
|
कोकणात पोपटी म्हणजे वालाच्या शेंगा एका माठात भरतात आणि त्यावर वालाचा पाला भरून तो माठ मातेने लिंपून बंद करतात. नंतर तो माठ जमीनीत अर्धवट पुरून बाहेरून पालापाचोळा पेटवून देतात. ६-८ तासात त्या शेंगा छान भाजल्या जातात पण कोरड्या होत नाहीत. नंतर ते दाणे आम्ही खोबर्याबरोबर खायचो. मोहाचा नारळ असला तर मज्जाच मज्जा
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|