|
Moodi
| |
| Thursday, September 22, 2005 - 2:38 pm: |
|
|
व्हर्हाडी मटण साहित्य : अर्धा किलो मटण, २ मोठे कांदे,१ लसणाचा गड्डा,१ इंच आले, ७ - ८ लाल मिर्च्या, ७ - ८ मिरे, ४ लवंगा, दालचिनी १ -2 तुकडे, तमालपत्रे ५ - ६, अर्धा चमचा शहाजीरे, अर्धा वाटी सुके खोबरे कीस, धणे जीरे पावडर, कोथिंबीर, टॉमेटो, हळद मीठ व मटण मसाला ( विकतचा ) कच्च्या मसाल्याचे वेगळे वाटण करावे, म्हणजे ते मसाले कच्चेच किन्वा किन्चीत तेलात भाजुन बारीक करुन बाजुला ठेवा. नंतर टॉमेटो, कोथिंबीर,आले लसुण, मिरची यांचे वेगळे वाटण करावे. तसेच कांदा तेलात लालसर भाजुन खोबरेही त्यात नंतर भाजुन ते वेगळे ठेवा. कृती : प्रथम प्रेशर पॅनमध्ये ( यात मटण छान शिजते ) तेल तापवुन त्यात कांद्याचे वाटण परतले की मग आले लसणाचे वाटण टाका. परतुन मग त्यात मटण टाकण्यापूर्वी २ चमचे तिखट पावडर अन किन्चीत साखर टाका, म्हणजे लालसर रंग येईल.मग मटण टाकुन परता. अन सर्वात शेवटी टॉमेटोचे वाटण टाका अन त्यात वाटाणाचे उरलेले पाणी घालुन शिजवा ३ शिट्ट्यात तयार. मात्र कुकरमध्ये करत असाल तर पाणी कमी घाला.
|
Ami79
| |
| Saturday, February 02, 2008 - 7:15 am: |
|
|
हेच सावजी मटण आहे का?
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|