|
Moodi
| |
| Wednesday, February 08, 2006 - 1:43 pm: |
| 
|
टॉमेटॉचा सॉस. दिनेश हे नवीन सदर चालू केलय बघ मी. यात लिहा सॉसविषयी.
|
Dineshvs
| |
| Wednesday, February 08, 2006 - 5:00 pm: |
| 
|
जो हुक्म सरकार. तर दीड किलो लालबुंद टोमॅटो घ्यावेत. बारिक कापावेत. फ़ार बिया असल्या तर काढुन टाकाव्यात. घेतानाच ते वजनदार व दळदार बघुन घ्यावेत. त्यात पाव किलो कांदे कापुन घालावेत. हे सगळे एका स्टीलच्या भांड्यात एकतर करावे. त्यात एक टेबलस्पुन मीठ घालावे. आठ दहा मिरीदाणे जरा कुटुन घालावेत. दोन काश्मिरी मिरच्या तुकडे करुन घालाव्यात, त्यातला बिया काढुन टाकाव्यात. अर्धा चमचा मोहरीपुड घालावी ( ऐच्छिक ) त्यात ३०० एमेल रेड वाईन व्हीनीगर घालावे. हे जरावेळ तसेच ठेवुन साधारण तासभर मंद आचेवर सतत ढवळत शिजवावे. मग दुसर्या भांड्यावर स्टीलची मोठी गाळणी ठेवुन थोडे थोडे मिश्रण घालुन रगडुन फ़क्त रस घ्यावा. त्यात ७५ ग्रॅम साखर व २ टेबलस्पुन लाल तिखट घालावे. मंद आचेवर ठेवुन साखर विरघळल्यानंतर ५ मिनिटे ऊकळावे. साधारण घट्ट झाला कि ऊतरवावे. ऊन्हात वाळवलेल्या बाटल्यात हा भरावा. नीट टिकवायचा असेल तर त्यासाठी हा ऊपाय करावा. एका मोठ्या भांड्याच्या तळाशी कागद वा नॅपकिन घालावा. त्यात या बाटल्या रचाव्यात. त्यांच्या गळ्यापर्यंत पाणी घालावे. व हे भांडे साधारण वीस मिनिटे सिमर करावे. मग घट्ट झाकणे लावावीत. तुम्ही जर तयार बाटल्यावरील घटक वाचलेत तर त्यात कधीकधी केळे घातलेले असते. कच्ची केळी, पाव किलो घालायला हरकत नाहीत, त्याने दाटपणा येतो. तेवढे टोमॅटो कमी करावेत. लाल रंगहि घालायला हरकत नाही. लसुण आवडत असेल तर तो शिजतानाच घालावा. लाल भोपळ्याचे तुकडेहि केळ्यासारखे घालता येतात. तयार सॉसमधे खुपदा तो असतोच. टोमॅटो सॉसला केचप म्हणतात.
|
Savani
| |
| Wednesday, February 08, 2006 - 5:22 pm: |
| 
|
दिनेश, रेसिपी चान्गली आहे. जरा निवान्त वेळ काढूनच करायला हवे आहे. vinegar preservative म्हणून टाकायचे आहे ना?
|
Dineshvs
| |
| Wednesday, February 08, 2006 - 5:40 pm: |
| 
|
हो त्यासाठीच. व्हीनीगर शिवाय टिकवायचे असेल तर वेगळे प्रिझरवेटिव्ह घालावे लागेल.
|
Prarthana
| |
| Monday, November 13, 2006 - 6:17 am: |
| 
|
साईट्रिक आसिड चालेल का?
|
Dineshvs
| |
| Monday, November 13, 2006 - 5:37 pm: |
| 
|
सायट्रिक आम्लामुळे, आंबटपणा येईल. तसेच ते प्रीझरवेटिव्ह नाही. उकळल्यानंतर व्हीनीगरचा वास जातो.
|
Psg
| |
| Tuesday, June 12, 2007 - 6:16 am: |
| 
|
दिनेश, मिरीदाणे आणि लाल मिरची इतकाच मसाला असतो? दालचिनी नसते घालायची? आणि व्हिनेगार व्यतिरिक्त अजून काही preservative असेल तर सांगा प्लीज. तेवढ्यासाठी अख्खी बाटली घ्यावी लागते व्हिनेगारची हा केचप किती टिकेल?
|
Dineshvs
| |
| Wednesday, June 13, 2007 - 4:26 am: |
| 
|
Psg बाकि मसाला आपल्याला हवा तो घालता येतो. लसुण वैगरेही घालता येतात. व्हीनीगर तसे फुकट जात नाही. अगदीच नाही तर सिंक साफ करायलाहि वापरता येते. रंगीत कपडे धुण्यासाठी वापरता येते. सोडियम बेंझॉईट सारखी काहि प्रिझरवेटिव्ह बाजारात मिळतात. पण त्याच्याही अख्खा बॉक्सच घ्यावा लागणार ना ?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|