|
रुमाली वड्या सारणासाठी साहीत्य : १ नारळ, २ टीस्पून खसखस, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, गरम मसाला ओल खोबरं रंग न बदलता भाजायच, त्यात खसखस भाजून घालावी. कोथिंबीर, मीठ, मसाला घालून मिक्स करावे. कव्हरासाठी साहित्य: २ वाट्या डाळीच पीठ, थोडी हळद, तिखट, मीठ, ३ वाट्या पाणी. सर्व एकत्र करून gas वर ठेवून हलवत रहाणे. घट्ट झाल्यावर झाकण ठेवून एक वाफ आणावी. स्वच्छ रुमाल ओला करून पसरावा. त्यावर वरील मिश्रण थोडे पसरावे. त्यावर सारण पसरावे. त्रिकोणी वळकटी करावी. थंड झाल्यावर वड्या कापून तळाव्यात (shallow fry) . या वड्या करताना पीठाच्या गुठळ्या होणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. तसेच तळताना सारण बाहेर येणार नाही अशा बेताने तळाव्यात.
|
Veenah
| |
| Monday, January 30, 2006 - 1:30 pm: |
|
|
तुला किती वेळा थॅंक्यू म्हणू ते सांग! मी वड्यांची वाटच पहात होते! अगदी हीच कृती हवी होती मला. ह्यात शेवळं घालून पण करतात ना ग?
|
हो, शेवळ घालून पण करतात. त्यासाठी नेहमी करतो तशी शेवळाची सुकी भाजी करून घ्यायची. आणी वरील प्रमाणे डाळीच्या पीठाच मिश्रण करुन त्यात ही तयार भाजी घालायची आणी gas वर ठेवून हलवत रहायच. बाकी सर्व वरीलप्रमाणेच. आणि thank u काय म्हणतेस ग. आता कर या वड्या आणि सांग मला कशा झालेल्या ते.
|
Suniti_in
| |
| Monday, January 30, 2006 - 6:11 pm: |
|
|
वड्या छानच वाटतात. पण शेवळं काय असत?
|
Veenah
| |
| Tuesday, January 31, 2006 - 8:26 am: |
|
|
सुनिती शेवळं एक रानभाजी आहे. पहीला पाऊस पडला की मिळते.... दिनेश, शेवळाच्या भाजीची माहिती कशी सांगायची?
|
Mrinmayee
| |
| Saturday, March 18, 2006 - 12:02 am: |
|
|
Sharmila, chhanach aahe vadyanchi kruti. Maazhi aai saranat taaji lavan-dalchini pood, jarashi aala-lasnachi paste (optional) aani limbacha ras ghalte. Tasach shijavnyapoorvi pithat hinga aani thoda gul ghatlyavar daalichya pithacha typical ugra vaas jaun chav improve hote. Jitka zatkan garam peeth rumalavar pasrun, saran bharun valkati karta yeil titka bara, nahi tar vadi tutoon padte. Arthat, tutlelya vadyanchi khamanga chav delkhil badhiya lagate. Nonvegetarians hyat suka kheema dekhil ghalu shaktaat.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|