|
Dineshvs
| |
| Tuesday, January 24, 2006 - 5:14 pm: |
| 
|
गोड भात सरत्या थंडीत खाण्यासाठी एक खास पदार्थ. तामिळ लोकात शक्रे पोंगल नावाने साधारण असा एक प्रकार करतात. कारवारी लोकात पण साधारण असाच प्रकार असतो. त्याचे हे थोडे वेगळे रुप. पाऊण कप तांदुळ धुवुन निथळत ठेवावे. एक कप मुगडाळ निवडुन घ्यावी. जर स्वच्छतेबद्दल फ़ारच शंका असेल तर, धुवुन निथळावी, नाहितर तशीच कोरडी वापरावी. कुकरमधे एक चमचा तेल गरम करुन त्यात एक दोन लवंगा, एखादी वेलची घालावी. चमचाभर मेथीदाणे घालावेत. मग त्यात मुगडाळ खमंग परतावी. त्यात धुवुन निथळलेले तांदुळ घालावेत. तेहि जरा परतावेत. मग त्यात दोन तीन चमचे पांढरे वा काळे तीळ घालावेत. मग त्यात एखादे रताळे वा पाव किलो लाल भोपळ्याच्या फ़ोडी वा एखादे गोड सफरचंद वा पाव किलो गाजरे फ़ोडी करुन घालावीत. सगळे परतुन त्यात साडे तीन कप पाणी घालुन कुकर बंद करावा. प्रेशर आल्यावर सहा मिनिटे शिजवावे. कुकर निवु द्यावा. ऊघडुन त्यात कपभर गुळ, अर्धा कप ओले खोबरे, चिमुटभर मीठ घालुन घोटावे. मंद आचेवर जरा शिजु द्यावे. शेवटी तुप घालुन ऊतरवावे, व गरमागरम खावे. थंडीत हा प्रकार खायला खुप छान लागतो. घटक पदार्थ आवडीनुसार कमीजास्त केले तरी चालतील. गुळाचे प्रमाणहि आवडीनुसार. खजुर, बेदाणे, काजु पण घालता येतील. हा पदार्थ खिरीप्रमाणे पातळसर असावा. फ़ार आटवु नये कारण थंड झाल्यावर तो घट्ट होतो.
|
Seema_
| |
| Wednesday, January 25, 2006 - 5:42 am: |
| 
|
recipe मस्तच आहे दिनेश ही.उद्याच करुन बघिन.
|
Prajaktad
| |
| Wednesday, October 03, 2007 - 9:09 am: |
| 
|
चांगला होतो हा भात...लहान मुलांना आवडतो.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|