|
Parijat30
| |
| Monday, January 23, 2006 - 10:17 pm: |
|
|
साहित्य ब्रेडच्या ८ slices, किसलेले चीज १ कप, हिरव्या मिरच्या,कोथिंबीर,कांदा हवी असल्यास शिमला मिरची मिरेपूड मीठ चवीनुसार पिझ्झा सिझनिंग (optional) कृती १. हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, शिमला मिरची, कांदा बारीक चिरुन घेणे. २. किसलेले चीज, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, शिमला मिरची, कांदा, मीठ, मिरेपूड आणि पिझ्झा सिझनिंग एकत्र मिसळावे आणि त्याचे ८ सारखे भाग करावे. ३. ब्रेडच्या स्लाईस तव्यावर एका साईडने भाजुन घ्याव्या. ४. ओव्हन १८० º C वर प्रिहीट करावे. ५. आता ब्रेडच्या न भाजलेल्या साईडवर चीज मिश्रण पसरवुन ओव्हनमध्ये ठेवा. जोवर चीज वितळुन हे ब्रेड सोनेरी रंगाचे होत नाही तोवर होऊ द्यावे. ६. नंतर प्रत्येक स्लाईस त्रिकोणी कापून आपल्या आवडीच्या सॉसबरोबर किंवा ऑमलेटबरोबर किंवा मुडीनी सांगितलेल्या बेक्ड वेजिटेबल बरोबर खा.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|