|
Dineshvs
| |
| Monday, December 26, 2005 - 3:56 pm: |
| 
|
कोलंबी आणि फ़्लॉवरची भाजी. दोन मोठे चमचे सुके खोबरे खमंग भाजुन घ्यावे. मग थोड्या तेलावर एक कांदा ऊभा चिरुन परतुन घ्यावा. कांदा कढईच्या बाजुला दाबुन तेल गळु द्यावे. मधे आलेल्या तेलात एखादी लवंद, दालचिनीचा तुकडा घालावा. त्यात अर्धा चमचा धणे व तेवढीच खसखस परतुन घ्यावी. मग कांदा मिसळावा व भाजलेला किसहि परतावा. खमंग वास येईस्तो हे परतावे. मग थंड करुन वाटुन घ्यावे. एक वाटी सोललेली कोलंबी घेऊन तिला हळद, तिखट, मीठ लावावे. अर्धा ईंच आले, तीन चार लसणाच्या पाकल्या, दोन तीन मिरच्या आणि थोडी कोथींबीर एकत्र वाटुन ते वाटण कोलंबीला चोळावे. मग तेलात कोलंबी चांगली परतुन घ्यावी. फ़्लॉवरचे तुरे कापुन घ्यावेत. तेलावर हिंग मोहरीची फ़ोडणी करुन त्यात एक कांदा बारिक चिरुन घालावा. तो सोनेरी झाला कि, एक टोमॅटो फ़ोडी करुन घालावा. तो परतुन त्यावर फ़्लॉवर घालावा. परतुन हळद, तिखट व धणे जिरे पावडर घालुन परतावे. थोडे पाणी घालुन फ़्लॉवर शिजु द्यावा. मग वाटलेला मसाला घालावा, मीठ घालावे. थोडासा गुळ घालावा. मग कोलंबी घालुन जरा आटवावे, वरुन कोथिंबीर घालावी. फ़्लॉवरच्या जागी नवलकोल घालता येईल
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|