Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
एकदम सोपे कलमी वडे ...

Hitguj » Cuisine and Recipies » उपाहार » वडे, भजी » एकदम सोपे कलमी वडे « Previous Next »

Moodi
Thursday, January 19, 2006 - 1:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कलमी वडे.

साहित्य : १ कप ओले ताजे किंवा फ्रोझन हरभरे, अर्धा टीस्पुन मीठ, १ टीस्पुन एकत्र धणेजीरे पुड, अर्धा टीस्पुन काळी मिरेपुड, चिमुट साखर,अर्धा टीस्पुन लाल तिखट,कोथिंबीर, १चमचा बेसन.

कृती : हरभरे रात्रभर पाण्यात भिजवुन सकाळी ते पाण्यातुन उपसुन निथळून मऊ वाटावे. त्यात बेसनासहीत बाकीचे सर्व जिन्नस घालावेत अन थोडे पाणी घालुन गोल चपट्या टिक्क्या कराव्यात. या टिक्क्या थोडा वेळ फ्रिझमध्ये ठेवुन सुकवाव्यात अन मग तळाव्यात म्हणजे कुरकुरीत होतात. पाहिजे तर shallow fry करा. अन टॉमेटो सॉसबरोबर द्या.
आवडत असल्यास आले लसुण पेस्ट अन हिरवी मिर्चीचे वाटण घालू शकता.



Supermom
Thursday, January 19, 2006 - 2:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी किती छान रेसिपी दिलीस ग. रविवारी करतेच.खूप हरभरे आहेत घरी.

Moodi
Thursday, January 19, 2006 - 2:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम यात ओवा टाक थोडा भरडुन आवडत असेल तर म्हणजे बाधणार नाहीत, काहीजणाना पचत नाही हरभरा.

Anuli
Thursday, January 19, 2006 - 3:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

moodi recipe chan ahe. pan US madhe harbhare kuthun milnar? dusare ase kai vaparta yeil?

Moodi
Thursday, January 19, 2006 - 3:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनुली फ्रोझन हरभरे मिळतील तुला, पण यात सुके हरबरे नाही घालायचे. ओले हिरवे घालायचे. या ऐवजी मग ताजे मटार किंवा फ्रोझन वाटाणे वापर.

Lalu
Thursday, January 19, 2006 - 3:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Indian store च्या frozen भाज्यांच्या सेक्शन मधे मिळतात हरभरे.

Dineshvs
Thursday, January 19, 2006 - 4:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या घाट्यांची मजा घाटी लोकानाच माहित.
माझी कोकणातली मामी म्हणायची, काय ते पोपटासारखे कच्चे दाणे खाता ?


Nalini
Thursday, January 19, 2006 - 6:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, अगदी बरोबर. .. ..

Karadkar
Friday, January 20, 2006 - 6:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश अगदी बरोबर आहे. अपण जितक्या चविने हे खातो तितके कोणिच नाही.

Karadkar
Friday, January 20, 2006 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन एक रेसिपी सांगु का या पोपटाच्या खाण्याची?

हे दाणे लोखंडाच्या तव्यावर थोडे तेल घालुन परतायचे. वरुन मीठ, लाल तिखट घालायचे. काळसर होईल थोडे आणि कदाचित थोडा ठसका पण लागेल. खाली काढायचे आणि त्यावर लिंबु पिळुन खायचे (आपल्या हितगुजचा लिंबु नाही बरंका !!! लिम्बु दिवे घेशिलच. )

बघा अवडतय का. आम्ही शेतात रहातो आणि शेतकरी असला मेवा ढिगाने आणुन टाकित पूर्वी तेव्हा मम्मी नेहेमी करायची शाळेतुन आल्यावर खाण्यासाठी.

Gajanandesai
Friday, January 20, 2006 - 10:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या आमच्याकडं.
कालच गावाकडून एक गाठोडं भरून आलंय घाट्यांचं. आपून पार्टी करुया!:-)


Manuswini
Wednesday, February 01, 2006 - 10:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो माझी आजी अगदी असच म्हणयची कोकणी ठसक्यात, छे आम्ही नाही खात तो हरभरा पोटाला वातड ते घाटी च खातात ( हे गमतिने बरे ती म्हणायची जेव्हा आम्ही मुल तिला सांगायचो की आजी आपण का ना असा हरभरा भाजत :-) )

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators